Friday 7 October 2011

मुंबई कोलाज: बॅन्ड्रा वेस्ट


स्टेशनचं ब्रिटीशकालीन गेट आणि समोरचा 'यादगार' फालुदा : 
तिथे लटकवलेल्या नवसाच्या सुरया, फालुद्यावरची माव्याची खापरी आणि कधी कधी पोट खराब झाल्याने लागलेली "गाळण" :),
लकीची बिर्याणी आणि त्यातले खरपूस बटाट,
हिल रोडवरची गर्दी आणि तरतरीत सावळ्या 'माका-पाव' मुली,  
हर्श बेकरी आणि गोडसर मेयोवाला (विनीतच्या भाषेतला :)) "पॉवर" बर्गर.


माउंट मेरी फेअर मधली गजबज, काळ्या चण्यांचा प्रसाद आणि त्यावरून पास केलेले एक लाख "ढामढूम"  जोक्स.
बॅन्ड-स्टॅन्ड वरची कपल्स, छक्के आणि पोलिसांच्या शिट्या.
कॅम्पचा ज्यूस!
बॅन्ड-स्टॅन्ड सी सी डी त  बसून प्यायलेली वाफाळती कॉफी आणि समोरचा उफाळता पावसाळी ग्रे समुद्र.
रॉक्समधले खेकडे पकडायचा वेडसर प्रयत्न, 
आणि कपारीतला लाजरा खेकडा लपल्यावर स्वतःही लपणारा थोडासा "टाईट" पुरी :)

कॅन्डीज मधले गोव्याचा फील देणारे रंगीबेरंगी दिवे आणि बनाना मिल्क-शेक.
लीलावतीमधली बाबांची अ‍ॅन्जिओग्राफी आणि फाटलेली %$#@.

रफिक भायच्या 'सेकण्ड चान्स' मधले अशक्य सुंदर स्टायलीश शूज,
कार्टर रोडवरचे गडगंज श्रीमंत पण 'वन्टाय ,वन्टाय' करत जीवाला जीव देणारे वैभवचे मुस्लीम मित्र.
स्टमक मधलं चायनीज!

गेइटी-गॅलेक्सी मधले समोसे आणि शेवटचा शो सुटल्यावर कब्रस्तानाजवळून भीत भीत मारलेला शॉर्ट्कट.

सेंट सबॅस्टीयन स्कूल मधले शामकचे डान्स क्लासेस.
जरी मरी मंदिर आणि बांद्रा तलावातली बदकं.

लिंकिंग रोड, चपलांची दुकानं आणि मुलींचे घासाघीस करून घामेजलेले पण अख्ख्या जगाची दौलत मिळाल्यासारखे फुललेले चेहेरे :)

एका दिवाळीत मी आणि नमानी केलेली बेहोष खरेदी आणि शेवटी रात्री १२ वाजता स्टाफ बरोबर बंद केलेलं शॉपर्स स्टॉप!

ह्यूज,फेंडी, कॅज्युअल्स, किंक, साय ब्रांश, रुचिरा (हे पोरींचं फेवरेट) .......असंख्य ट्रेंडी कपडे वाली बुटीक्स,
आणि जगातले सगळे ब्रॅन्ड्स!

मी कधी एल. ए. ला गेलो नाही (खरं तर अजून विमानातच बसलो नाहीये :) ) पण असं ठाम वाटतं की लिंकिंग रोड, पाली हिल, कार्टर रोड नक्की एल. ए., सनसेट बुले व्हा, बेवर्ली हिल्स सारखं असणार.
कदाचित थोडं कमी स्वच्छ पण शुअर शॉट जास्त प्रेमळ!


(लवकरच मेरी जान वांद्रे पूर्व )

2 comments:

  1. काय लिहू असे झालंय
    अख्ख वेस्ट तू अस काही रेखाटल आहेस की जस एखाद ढिंच्याक स्टायलिश पेंटिंग....

    निल्या साल्या सोड रे ते कोडिंग फीडिंग....साल्या एक तर रायटर हो किंवा फिल्म डायरेक्टर...

    तुझ जग बाहेर आहे चार भिंतीत कुजू नकोस रे.......

    ReplyDelete
  2. मुंबई तर आपली लाडकी...
    मस्त लिहिलेस...ब्लॉग उलथा-पालथा घालतो आता

    ReplyDelete