Wednesday 16 May 2012

"यु नो व्हॉट": ४


के ...कबूल!
त्यांना 'सेक्सी' किंवा 'म्हातारे' म्हणायला माझी चक्क फाटतेय! 
म्हणजे आधीच्यांचं ठीक होतं:
इफ्तिकार तर गेलाच बिचारा! 
आणि मार्गु अण्णा किंवा ज्युडू बेबी कुठे मला आयुष्यात भेटायला...ते मस्त राहत असतील हॉलीवूड: सन स्ट्रीट बुलेवा नाय तर लंडन: वेस्ट एंडला! 
मी इकडे त्यांच्या नावाने काय तारे तोडतोय त्यांना काय घंटा कळायला??

पण 'डॉक्टर' कधी तरी कुठे पार्ल्यात बिर्ल्यात किंवा शिवाजी मंदीरला भेटू शकतात. 
आणि त्यांनी ती सर्जनच्या सुरीसारखी लख्ख घारी नजर रोखून आपली फेमस मान हलवली की...संपलंच
माझ्यासारखा नाचीझ-नोबडी तर वितळूनच जाणार जमिनीत...म्हणजे कंपोस्ट खतच एकदम!!!

पण ते एस इ एक्स वाय आहेतच!
(ही फेलो ब्लॉगर अपर्णाची लहान मुलांसमोर बोलताना वापरायची आयडिया..टू गुड ना ??)

लहानपणी कॉलनीत कुठेही गणपतीत प्रोजेक्टरवर एकच पिक्चर असायचा : 
"जानकी"  
फुल टू फिल्मी पिक्चर: डॉक्टरांवर खुनाचा आळ... अबला जानकी ... डोळ्यात धो धो पाणी वगैरे. 
पण ते मिल मजुराच्या डार्क ब्लू युनिफॉर्ममधले गोरे घारे डॉक्टर मला जाम आवडायचे.
आणि सीमा 'श्रीराम' लागूंना गाणं म्हणतेय "विसरू नको...श्रीरामा मला" म्हणजे कसलं क्लेव्हर ना??

मग थोडं कळायला लागल्यावर 'सामना' पाह्यला आणि वेडाच झालो1 
ते मास्तर.. त्यांची भणंग जिगर आणि तो प्रश्न...डॉक्टर-स्पेशल थरथरत्या आवाजातला: 
"पण मारुती कांबळेचं काय झालं?"

आणि मग डॉक्टरांचा तो लेख आला "देवाला रिटायर करायला" सांगणारा;
त्यानं सगळ्यांनाच हलवलं गदागदा...
इतका ठाम, क्लिनिकल आणि मुद्देसूद लेख वाचून देव असला तरी त्याने  चूपचाप व्ही आर एस घेतली असणार बहुधा! 

त्यांचं अंधश्रद्धा निर्मुलन समितीचं कार्य असो किंवा व्यक्तिगत दुखाशी केलेला धीरोदात्त सामना 
rationalism is the way of his life...always!
त्यांची ती फालतू रूढी आणि चिंधी-चोर बाबा-बुवांवरची स्वच्छ मतं ऐकली/वाचली की...थंड पाण्यानी झडझडून अंघोळ केल्यासारखं काहीतरी वाटतं राव!!!

त्यांच्या आत्मचरित्राचं नाव पण कसलं ढासू आहे..."लमाण"!
मी तर करपलोच ...हे नाव आपल्या आत्मचरित्राला का नाय सुचलं म्हणून.
(तसा तर मी 'सिक्स्थ सेन्स'चा शेवटचा ट्विस्ट आपल्याला का नाय सुचला म्हणून पण करपलो होतो...असो!) 
"लमाण" मधली त्यांची ती डॉक्टरकी आणि नाटकामधली तगमग; 
आणि किलीमान्जारोच्या शिखरावर त्यांना झालेली एपिफनी तर परत परत वाचण्यासारखी. 

आजकालची त्यांची ती खादीची अर्ध्या बाह्यावाली पैरण आणि शुभ्र पांढरा लेंगा पण कसला दिसतो त्यांना.. 
"मित्र" मध्ये सरस दिसले ते ह्या क्लटर-फ्री लूक मध्ये!

त्यांच्याच 'पिंजरा' मधलं वाक्य थोडं वळवून लेखन सीमा करतो...
आमाला नक्को मिस्सळ ..आमाला हवा शिर्रा ssssssss 'म' :)

ता. क. (जास्तच समजतंय मला...कंपोस्ट खत नक्की!!! )

-नील आर्ते 



6 comments:

  1. ha s-e-x-y mhatara sarvat jast patala...........

    ReplyDelete
  2. Yo Arti g-l-a-d u liked it :)

    ReplyDelete
  3. हा हा....आलास का तू पण एस इ एक्स वाय वर...:D

    हा एपिसोड आवडला कारण बहुतेक मराठी (आणि परत एस इ...ब्ला ब्ला...:)) म्हणून की काय? बाकी मी देवाला रिटायरचा लेख आणि त्यांचं आत्मचरित्र दोन्हीही वाचलं नाहीये.....oops...
    पण थोडक्यात सांगायची तुझी शैली नेहमीच आवडते...त्यासाठी टोप्या उडवा...i mean Hats off... :)

    अवांतर...आता लवकरच शाळेत गेली की मुलं स्पेलिंग शिकतील तेव्हा काय करायचं इस्के लिए है कोई आयडीया सरजी???

    ReplyDelete
  4. Thanks Aparna...made my day..me blushing blushing :D

    भराभरा कळत्या होणार्या मुलाचं म्हणशील तर :
    शिकू देत ना स्पेलिंग...एक दिवस तुला अर्थ पण विचारतील या अशा आणि हजार इतर गोष्टींचे...त्या वेळी सुचेल तसं डील करायचं!!!

    डिस्क्लेमर: हे एक {पेरेनिअल बॅचलर = उंटावरला शहाणा} सांगतोय!
    तेव्हा advise subjected to market risk ;)

    ReplyDelete
  5. Nil .... Kai Bolu Aata....Kasale Lihiles Aahes Tu, Mastach....Pan Ek Saangayache Hote, To PINJARA Madhala Dialogue Hya Lekhat Suit Hot Naahi Buva .

    ReplyDelete
  6. Sanju,

    aapla favourite dialog ahe yaar to!!!

    ReplyDelete