निखिल घाणेकर माझा मित्र आणि फार मस्त मुलगा.
चांगला लिहिणारा-वाचणारा, मराठी साहित्याविषयी चांगल्या अर्थाने कन्व्हिक्शन असणारा तरीही भाबड्या कल्पना ना बाळगणारा.
त्याचं हेच कन्व्हिक्शन कोलाहल ह्या त्याच्या कादंबरीतून मिळतं.
म्हणजे एक तर कादंबरी लिहिणं हे एक मोठ्ठं कन्व्हिक्शन आणि ती कादंबरी नेटाने वाचकांपर्यंत पोचवणं हे दुसरं मोठ्ठं कन्व्हिक्शन. सो पहिलेतर निखिलला सलाम आणि अंगठा-तिसरं-चौथं बोट मिटवत केलेली हेवी मेटलची हॉर्न साइन!
कारण ह्या दोन गोष्टींत तो बऱ्यापैकी यशस्वी झालाय असं म्हणता येईल.
(दुसरी आवृत्ती संपली)
आता कादंबरीविषयी थोडं:
काहीतरी विचित्र योगायोगाने ही कादंबरी माझ्याकडे साधारण मे-जूनमध्ये २०२४ मध्ये आली.
तेव्हा व्यक्तीश: मी थोडा ट्रिकी म्हणता येईल अशा मनस्थितीत होतो.
आता कदाचित ते कादंबरीविषयी न होता निलाजरेपणे माझ्याविषयी होईल.
बट व्हू द फक वी आर किडींग?
एव्हरीथिंग इज अबाऊट "मी ओन्ली" खरं तर.
रिप-रिप वाले मेसेजेससुद्धा.
स्पॉयलर वॉर्निंग:
पुढे कादंबरीविषयी स्पॉयलर्स असू शकतील सो सावधान.
वाटल्यास कादंबरी वाचून परत इथे येऊ शकता.
कादंबरी चांगल्या अर्थाने माईल्ड आहे.
त्यातली (बहुतेक) पात्रं बऱ्यापैकी समंजस आहेत. म. म. व. आहेत. त्यांना खायच्या भ्रांतीसारखे मोठे प्रश्न नाहीत.
पण हातपाय न हलवता बसून खायची श्रीमंती सोय नक्कीच नाही.
जगण्याचे, पैसे कमावण्याचे आणि त्यासाठी लढतानाच नाती फुलवण्या-निभावण्याचे ताण ह्यात आहे.
पण आधीच म्हटल्याप्रमाणे कादंबरीत बहुतेकवेळा माईल्ड प्लेझंटनेस आहे.
आणि माझ्या भिरभिर मनस्थितीला असंच काहीतरी हवं होतं.
टॉमेटो सूप सारखं फारसं विद्रोही विदारक रॅडिकल वगैरे नसणारं तरीही सुरस.
माझी मन:स्थिती भिरभिर का होती त्याबद्दल थोडंसं.
मागल्या वर्षी माझा जीव सखा मित्र एका अभद्र अपघातात अकाली गेला.
कोलाहल मधल्या नायकाच्यासुद्धा एक अतिशय जवळचा थोड्या चांगल्या पण बऱ्याचश्या वाईट अँगलने वाईट अल्फा-मेल म्हणता येईल अशा मित्राचा अवचित मृत्यू झालाय आणि त्याची सावली कादंबरीभर पडत रहाते.
माझा एक जीवा सखा मित्र वारला जो काही अल्फा वगैरे नव्हता. आणि दुसऱ्या एका सुपर डुपर अल्फा मित्राशी माझं एकमेकांची तोंडं न बघण्याइतपत ब्यक्कार वाजलेलं.
आणि माझ्या आयुष्यातले हे दोन फार महत्वाचे पुरुष वरद (कोलाहलचा नायक) च्या मित्रात एक-मिसळ झालेले.
त्यामुळे मला खूपच जास्त रिलेट होता आलं असं म्हणेन मी.
कादंबरीनं मला वाचतं ठेवलं पण...
असा खूप कोलाहल मला काही जाणवला नाही.
नायक बहुतेक वेळा शहामृगी वृत्तीने कॉन्फ्लिक्ट टाळतो.
तेही ठीक. ते आपलं म.म.व. डिफॉल्ट सेटींग असतं हेही मान्य.
पण त्या शहामृगी वृत्तीनेही कथा फार पुढे किंवा मागे किंवा वळणावर जाते असं काही होत नाही.
असं मला वाटलं.
नायक नायिकेचं जेवणं, आईस्क्रीम खाणं, यु ट्यूब बघणं, पावभाजी-पुलावच्या च्या हार्मलेस पार्ट्या करणं
हे थोडं रिपीटेटिव्ह होत जातं माझ्या मते.
ते बाय डिझाईन असेल बहुतेक पण माझ्या कथे-कादंबरीकडून अपेक्षा ओल्ड स्कूल आहेत.
त्या अपेक्षांचे वजन अर्थात माझ्याकडेच पण त्या पूर्ण झाल्या असं मी म्हणणार नाही.
त्यात शेवटही आला.
पण निखिलच्या प्रवाही शैलीने हे पुस्तक मी तीन-चार महिने तब्येतीत वाचलं आणि आधी सांगितल्याप्रमाणे माझ्या सटपटलेल्या मनाला सावरण्यात कोलाहलची मदत हंड्रेड पर्सेंट झाली.
(पण मग शांतवणाऱ्या कादंबरीचं नाव कोलाहल का? सॉरी निखिल ब्रो फॉर बीइंग अ बीच हिअर :) पण निखिल तेवढा समंजस नक्की आहे)
एकुणात कोलाहल मी जरूर रेकमेंड करेन.
खास करून तरुणाईसाठी.
माझ्या पर्सनल अडनिड्या कारणांपेक्षा ते नक्कीच जास्त सरळसोट रिलेट करतील.
ब्राव्हो निखिल आणि तिसरी आवृत्ती लवकर येऊ दे.