Saturday, 17 September 2011

मुंबई कोलाज : गिरगाव

मुंबई कोलाज :
हे आहेत माझ्या डार्लिंग मुंबईच्या विविध भागांतले वास , आवाज , रंग आणि स्पर्श... एखाद्या कोलाज सारखे एकाच वेळी तरतरी आणणारे आणि हुरहूर लावणारे. चालू करतोय गिरगावपासून :

गिरगाव : चर्नीरोडचा ब्रिज , गायवाडीतला चिक्कीवाला , प्रार्थना समाजातला उदबत्तीचा वास, ओपेरा हाउस वरचे हिऱ्यांचे सौदागर आणि फाफडा जिलेबी (अतिरेक्यांच्या %#$% चा %^$%^ ), ती पत्रिकांची दुकाने, सी पी टॅन्क वरच्या गायी, चाळींच्या शेरीतला आंबूस वास आणि राजुदादाच्या सेंटचा घमघमाट, फडकेवाडीचा गणपती, प्रकाशची ती सूक्ष्म टेबल्स आणि स्वर्गीय साबुवडा, मिणमिणत्या चिमणीतला गंडेरीवाला. 
शेणवे वाडीतले राडे आणि मठाबाहेरचे गजरे....आणि या सगळ्यात असूनही नसलेला समुद्र!

उद्या (दादर इस्ट )


2 comments:

 1. खूप छान...सखीचा वडा, पोहे आणि सका पाटीलमध्ये अभ्यास करणारी पोर हे पाहिलं होतास का गिरगावात...:)

  all these Mumbai posts of yours are going to make me so nostalgic......:(

  ReplyDelete
 2. अपर्णा आयडिया तीच आहे :
  तुम्ही कोलाजमध्ये आपल्याही आठवणी जरूर टाका !
  आणि आवडलेले एरिया सुद्धा

  ReplyDelete