तुम्हाला कधी असं झालंय? म्हणजे आपण एखादा यम्मी पिक्चर (किंवा नाटक किंवा पुस्तक वगैरे) उगीचच वेळ काढूपणा करत ताजा ताजा गरम असताना बघत नाही.(पुणुलेच्या भाषेत मा sssssss ज)...
आणि मग सवडीने अवचित कधीतरी बघुन झाल्यावर वाटतं...अरे यार इतके दिवस आपण का टाइमपास करत होतो? कसे राहिलो याच्याशिवाय?? कसे जगत होतो?? इ. इ.
(म्हणजे तसं रियलायझेशन मला अंमळ उशीरा ड्रायव्हिंग शिकल्यावरही झालं होतं आणि, तब्बल दहा वर्षांनी हॅरी पॉटर वाचल्यावर सुद्धा).
सो...साई सुट्ट्यो!!! :)
आणि मग सवडीने अवचित कधीतरी बघुन झाल्यावर वाटतं...अरे यार इतके दिवस आपण का टाइमपास करत होतो? कसे राहिलो याच्याशिवाय?? कसे जगत होतो?? इ. इ.
(म्हणजे तसं रियलायझेशन मला अंमळ उशीरा ड्रायव्हिंग शिकल्यावरही झालं होतं आणि, तब्बल दहा वर्षांनी हॅरी पॉटर वाचल्यावर सुद्धा).
प्रत्येक गोष्टीचा टाईम यावा लागतो हेच खरं.
मुदलात 'माकडाच्या हाती शॅम्पेन' बघू बघू म्हणत राहून गेलेलं...
एकतर मला हटके नाववाल्या 'प्रोटॅगॉनिस्ट्स्'चं भारी फॅसिनेशन...
आणि इकडे तर काय पुस्तक, पेन्सील, चाकू, माकड, काकडी वगैरे...हैदोसच सगळा!
पण फायनली "बदाम राणी गुलाम चोर" बघितला आणि मी काय मिस करत होतो ते कळलं!
आणि इकडे तर काय पुस्तक, पेन्सील, चाकू, माकड, काकडी वगैरे...हैदोसच सगळा!
त्यांची ती फाड-फाड विधानं, दुहेरी लेयर्स वर चालणारा प्लॉट,
आणि रिलेशनशिप्सचा लख्ख आरसा दाखवणारे अफाट सीन्स...मस्तच.
बरेच जण म्हणतात त्या प्रमाणे ती डॉ. विवेक बेळेन्च्या नाटकाचीच मूळ जादू असेल कदाचित,
पण पुस्तक-पेन्सिल च्या रंगीत सीन मधले ब्लॅक अॅन्ड व्हाईट चाकू आणि माकड,
"ह्यो पायजे का तुला त्यो पायजे" चा साउंडट्रॅक इ. नक्कीच सिनेमाध्यमाचे बोनस!
शिवाय क्लोज-अप्स ची सोय असल्याने पुष्कर, उपेंद्र, मुक्ता, आनंद सगळ्यांनाच फटकेबाजीला फुल्ल स्कोप!
उदाहरणार्थ पानवाल्याकडून मोड घेण्याचा सीन...तुफान!
एकंदरीत काय जलसाच...
मागे मी लेडी इन द वॉटर"...च्या निमित्ताने सिनेमावर न लिहीण्याविषयी बोललेलो,
पण 'पेन्सिल' बाइंनी म्हणूनच ठेवलयना, "मी भूतकाळात केलेल्या विधानांची कोणतीही जबाबदारी भविष्यात घेत नाही"सो...साई सुट्ट्यो!!! :)
नोट्स टू मायसेल्फ: "काटकोन त्रिकोण" बघणे...प्रॉन्टो!
-नील आर्ते
हे क्काय?? आता आमी कसं बगायचं हे??
ReplyDeleteबाकी तो साई सुट्ट्योवाला पॅरा वाचून मज्जा आली. :)
पर्णा,
Deleteपूर्ण पत्ता दे सी. डी. कुरिअर करतो.
खरंच मस्ट सी पिक्चर आहे.
NIL...Atishay chhaan Lihile Aahes, Kharokharach !!!!
ReplyDeleteThnks Dada :) !!!
Deleteमराठी नाटकांच्या आठवणीने हळहळतोय :(
ReplyDeleteहे,
Deleteभारतवर्षात (ते सुद्धा मुंबई + पुण्यात ) असूनही मला नाटक बघितल्याला जमाना झालाय.
अतुल कुलकर्णीच "समुद्र" ४-५ वर्षांपूर्वी बघितलं होतं.
चित्रपट उत्तम आहे. मी नाटक पाहिले नाहीये आणि ते अजूनपर्यंत का पहिले नाहीये याचा ते पाहिल्यावर पश्चाताप होईल कदाचित.
ReplyDeleteमला फक्त शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटला. बाकी अभिनय आणि कथानक उत्तम.
सागर,
Delete"गैर" पाहिलास का? मस्तच!
पश्चताप-दग्ध व्हायला आदर्श :)
नाटक मस्त होतं आणि मी ताजं ताजं असतानाच पाहिल होतं माज न करता ;)
ReplyDeleteचित्रपट वाईट होता .
I am just missing too many plays yaar....
Deletemovies u can atleast catch up later someplace else!
प्रत्येक गोष्टीचा टाईम यावा लागतो हेच खरं....kharay. अतुल कुलकर्णीच "समुद्र" kasal bhaari hot.
ReplyDelete