खरं तर एक पॉलीसी म्हणून मी सिनेमावर लिहीत नसतो!
म्हणजे कसं आहे माहितीये का कि एका मंगळसूत्र चोराला पब्लिकने पकडलं!
ओके म्हणजे त्याचा गुन्हा निर्विवाद!
पण आधीच लोक त्याला एवढा एक्स्पर्टली मारत असतात की आपण काय मारायचं यार? ते रीडण्डन्टच होणार ना?
तसंच काहीतरी,
म्हणजे गणेशदादा मतकरी, मयंक शेखर, करण अंशुमान, आपले हेरंबराव ओक वगैरे
वगैरे इतकं झकास, मनापासून (आणि बऱ्याचदा डिट्टो आपल्याच मनातलंसुद्धा) शिणुमावर लिहित असतात की आपण का कष्ट घ्या?
पण आज अगदीच रहावत नाहीये:
एक तर हे वेडसर एच. बी. ओ. + स्टामू वाले शुक्रवार-शनिवार रात्री महाटुकार सिनेमे लावतात पण वीक-डे ला रात्री मात्र ** जळवायला ढासू सिनेमे.
अशीच मंगळवारी रात्री साडेअकराची वेळ...डबेवाल्या मावशीनी डब्यात खिमा दिलेला, नन्तर एक आक्खं फाईव स्टार चेपलेलं...पुणूल्यात थंडीची चाहूल लागलेली...म्हणजे एकंदरीत डोळे खजुराहोच्या हॉटीन्सारखे अर्धोन्मिलीत वगैरे झालेले.
आणि इतक्यात "लेडी इन द वॉटर" चालू झाला!
पहिलाच थोडासा आपल्या वारली पेंटिंग्जसारखा अॅनिमेटेड इन्ट्रो आवडून गेला.
आणि अडकलोच ना राव!
म्हणजे कसं माहितीये का...एका मिक्सर मध्ये जी एंच्या मिथककथा, बटाट्याची चाळ, विनोदकुमार शुक्ल आणि अर्थातच एम. नाईट. घ्यावा आणि दोनदा फुर्र करावं.
मग जे काही तयार होईल ते कोणताही पूर्वग्रह न घेता बघत बसावं.
खर तर जगभरात क्रिटिक्सनी फुल परतलेला या सिनेमाला...चाललासुद्धा नाही फारसा.
पण मला मात्र समहाऊ जमला!
पॉल जियामत्तीचा खिन्न पण सालस सोसायटीचा हरकाम्या,
फिलाडेल्फिया अपार्टमेन्ट मधले एकसे एक नग चाळकरी, (त्यातही चायनीज चंट पोरगी आणि तिची सर्किट आई टू गुड!)
आणि अर्थातच श्यामलनचे पेटंट रेड हेरीन्ग्स.
डोळ्यांवरची झोप आवरून बघावासा वाटणारा सिनेमा म्हणजे चांगलाच...माझ्यापुरता तरी!
मग भले रिव्ह्यूज काहीही असोत!
(ता. क. दुसर्या दिवशी ऑफिसला १ वाजता उगवलो...खिक्क :) !!!)
-नील आर्ते

:)) नीलराव आर्ते यांचे आभार !
ReplyDelete'लेडी इन द वॉटर' बघितला नाहीये मी. इंटरेस्टिंग वाटतोय. :)
खरच बघ!
Deleteतसा तर मला "द व्हिलेज" ही आवडला होता...
त्याला सुद्धा बर्याच जणांनी तासला होता.
सिनेमा एवढा आवडला नाही.
ReplyDeleteत्याच्या सिक्स सेन्स ला साजेल अशी निर्मिती परत त्याच्याकडून झाली नाही.
त्याच्या कथेत हटकून बायबल मधील कथेचा किंवा एखाद्या कल्पनेचा उल्लेख असतो.
उदा डेविल हा सिनेमा
ठीक असतात त्याचे सिनेमे
निनादा,
Deleteमला अनब्रेकेबल, साईन्स, व्हिलेज, डेव्हिल, लेडी इन द वॉटर सगळे आवडले...("लास्ट एअर बेन्डर" मात्र खरंच क्रॅप ...कार्टूनच मस्स्त!)
सिक्स्थ सेन्सला टॉप करणं खरच कठीण आहे रे ...
तो इतका इतका इतका भन्नाट आहे की एम नाईटचे पुढचे चांगले पिक्चर पण तुलनेत लेम वाटतात
पण ते होणारच ....
रोलीन्ग बाईन्नी आता काहीही लिहिलं तरी आपल्याला ते "हरू" एवढ आवडण कठीणच आहे.
किंवा सत्या काही रामूला नंतर मॅच करता आला नाही ...तसच काहीतरी
अर्थात याला चोख दुसरी बाजू आहेच.
म्हणजे जंजीर, दिवार, शोले, चीनी-कम आणि खूप काय काय देणारे बच्चन साब
किंवा व्यक्ती-वल्ली, असामी, चाळ, हसवणूक देणारे पु. ल.
जिकडे आपल्याला ३-४ बेस्ट झक्कत निवडायला लागतातच!!! :)