Sunday, 2 November 2014

"नि इदिया!" च्या निमित्ताने

एक पोस्ट वाचून आपल्याला खूप काही भसाभसा लिहावसं वाटणं हे मस्तच!
म्हणजे हा त्या पहिल्या मुळ पोस्टचा विजयच तेव्हा माझ्या मैत्रिणीची मुळ पोस्ट इथे वाचा
http://shabd-pat.blogspot.in/2014/11/blog-post_2.html
म्हणजे मी भसाभसा लिहायला मोकळा:

तर…
'हे काहीतरी घडणार' च्या मागे होणारी घरंगळ वगैरे एकदम पटेश पण मी कुठे तरी एक गोष्ट वाचली होती.

म्हणजे एका माणसाला कोणतरी सांगत की नर्मदेच्या सुक्या पात्रात हटकून परिस आहे…शोधला की मिळतोच.
तर हा आपला चालू होतो लोखंडाचा तुकडा घेऊन:
उचल गोटा… लाव लोखंडाला … नाय झालं सोनं… दे फेकून.
'व्हाइल-लूप' मध्ये चालू राहतं हे दिवस-महिने-वर्षं.
माणूस आपला शोधतोय-शोधतोय कणाकणाने फ्रस्ट्रेट होत.
शेवटी त्याची हटते आणि तो नाद सोडून द्यायचा ठरवतो …
पात्रातून बाहेर निघताना सहज लोखंडावर नजर टाकतो तर तो तुकडा केव्हाच सोन्याचा होऊन गेलेला असतो!

ह्यातून मी इतकच घेतलं की मोठे इव्हेंट्स वगैरे ठीकाय पण त्यांना जास्त भाव नाय द्यायचा…
म्हणजे स्वत:चं मोठ्ठ घर वगैरे मस्त पण कधी कधी स्वच्छ दाढी केल्यावर पण तितकच मस्त वाटतं…मला पण असं वाटायचं की मी  स्वत:चं मोठ्ठ घर घेईन मग सगळं लोन फेडीन मग एक छानसा कट-ग्लास घेईन आणि माझ्या त्या मोठ्ठ्या सर्व लोन फिटलेल्या घरात आरामखुर्चीत बसून मस्त ग्लासात मस्त स्कॉच पिईन

पण वरची गोष्ट वाचल्यावर स्कॉच चान्स मिळेल तेव्हा पिउन टाकली. घर-वर तो होता रहेगा :)
(ढासू कट-ग्लास मात्र घेतलाय :))

म्हणजे माझ्या हिशोबाने हे "बिग" काहीतरी घडायचं तेव्हा घडेल पण तोपर्यंत आपली मस्त नाटकं-बिटकं बघावीत, लेड-झेपलिन ऐकावं, छान भांग पाडावा,  मुलींना स्माईल द्यावं वगैरे :)

आणि मला असा दाट संशय आहे की हे 'बिगोबा' म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या छोटया छोट्या गोष्टींचीच सम आहेत बहुतेक :)

खूप सुखी वगैरे डोन्ट नो… पण…  
रात्री पुण्यातल्या शांत लष्करी रस्त्यांवरून थकून घरी येणं आणि गाडीत रेडिओवर रॉक अवर मध्ये क्वीन्स-राईशचं 'सायलेंट ल्युसिडीटी' लागणं  हे त्या वेळचं सुख! नथिंग मोअर नथिंग लेस!!6 comments:

 1. :) ek daruchi ad aathavli... it's your life.. make it large... chote chote pal jiye jao... bada kuch apne aap banega...

  ReplyDelete
 2. >>कधी कधी स्वच्छ दाढी केल्यावर पण तितकच मस्त वाटतं…

  Thats so Neil ... ;)

  ReplyDelete
 3. "पण वरची गोष्ट वाचल्यावर स्कॉच चान्स मिळेल तेव्हा पिउन टाकली. घर-वर तो होता रहेगा">>> हे जबरदस्त स्टेटमेंट आहे. आयुष्यातल्या प्रायॉरिटीज आणि त्यांच्यासाठी मिळणारा वेळ यांचं गणित घालणं महा-अवघड आहे महाराजा! बरं, हे असलं गणित ना शाळा-कॉलेजात शिकवतात, ना घरा-दारात. असंच कुठून कुठून पुस्तकं नि ब्लॉग शोधायचे, आणि जगण्याचं स्किल कमवत जायचं, असंच काहीतरी झालंय ना? या गोष्टीसाठी मनापासून थँक्स... :-)

  ReplyDelete
  Replies
  1. Mandar, it was fun all the way writing this:
   So pleasure is mine :)

   Delete