Sunday, 9 August 2015

(देह-फुलं: २) थरथर

निर्मोही टिळक-मंदीर लायब्ररीतून बाहेर पडली आणि हे ssss धो धो पाउस चालू झाला…
खुशीत हसली ती, "पड बाबा पड"!
छत्री नव्हतीच तिच्याकडे, दोन मिनटं टपाखाली उभी राहून ती पाउस बघत राह्यली…
हरखून…
छोटू बाळासारखी…
'थांबावं का दहा मिनटं? होईल पाउस कमी?? की भिजावं सरळ???
पहिलाच सणसणीत पाऊस आहेय या वर्षाचा…

मागच्यावर्षी समीप बरोबर भिजलेलो आपण कुठे कुठे:
मरीन ड्राइव्ह, नॅशनल पार्क, 
राजमाची… 
ट्रेकला चालता चालता… 
बाकी सगळे मुद्दामहून पाठी-पुढे राह्यलेले…  
आणि ती दोघं… एकटीच… भिजत-थरथरत… 
पानांचा आणि ओल्या मातीचा गच्च वास येणाऱ्या वाटेवर… ती त्याला थरथरत बिलगलेली!
विल्स नेव्ही-कटचा वास येणारं त्याचं ओलसर टी शर्ट आणि भिजकी दाढी… 
त्यातले ते त्याचे जाडसर ओठ… 
आधी दोघांची नाकं चुरमडली एकमेकांवर… मग ओठ आणि मग जिभा!

शिरशिरी आली निर्मोहीला…
आख्ख्या देहाला समीप आठवला…
कोणाला तरी गुदमरून टाकणारी गच्च मिठी मारावीशी वाटत होती!तिनं खोलवर श्वास घेतला:
नुकतंच घेतलेलं 'रात्र काळी घागर काळी', पर्स, घड्याळ, मोबाईल प्लास्टिकच्या पिशवीत टाकलं…
आणि चिं. त्र्यं. ची 'लक्ष्मी' आठवत ती पावसात घुसली.

दोनच मिन्टांत चिंब भिजली ती… इनर्ससकट…
गार सपकाऱ्यानी सगळा आळस पळून गेला, छान तरतरीत वाटायला लागलं.
पावसाची गाज ऐकत चालत राहिली ती…
प्लास्टिकची पिशवी घट्ट पकडून…
समीपचे स्पर्श आठवत!


गल्ल्या-बोळांतून चालत ती नेहरू-रोडवर बाहेर आली आणि तिनं रिक्शाला हात केला,
'बांद्रा ईस्ट' तिनं फर्मावलं… रिक्शा फरफरत चालू झाली.

रिक्शावाला छानच होता, मध्यमवयीन, हसऱ्या डोळ्यांचा… समीपच्या भाषेत "भय्या".
'कुठे असेल याची बायको? गावाकडे?? यु.पी. - बिहारला???
त्याला आठवत असतील आपल्या बायकोचे स्पर्श?
की इथेच मुंबईत असेल ती?
असू दे मुंबईतच.'
तिनं मनापासून 'विश' केलं…

रिक्शा आपली पाऊस कापत हायवेवरून पळत होती…
एअरपोर्टचं काटेरी कुंपण पाठी टाकत ते वाकोल्याच्या फ्लाय ओव्हरवर आले…
झालं फ्लाय-ओव्हर संपलाच…
आता टीचर्स कॉलनी आणि मग दोनच मिन्टांत खेरवाडीचा राईट…

तेव्हढ्यात अचानक गुर्र फुस्स असे काय काय आवाज यायला लागले.
रिक्शावाल्यानं पाठून रों-रों येणारी वाहनं चुकवत गाडी कशीबशी लेफ्टला घेतली आणि रिक्शानं जीव टाकला.

त्यानं जीवाच्या करारानं दांडा खेचला…
एकदा - दोनदा - पाचदा
पण रिक्शा ढिम्म!

'स्साला कल ही काम किये थे…' तो ओशाळं पुटपुटला आणि वाकून खाटखूट करायला लागला.
तेव्हढ्यात दोन तीन रिक्शा स्लो होत आशाळभूतपणे रेंगाळल्या…
जावं का दुसरी रिक्शा पकडून? किती वेळ लागेल कोण जाणे??
ओले कपडे पण चावायला लागले होते आता…
पण तिचा जीव होईना त्याला एकट्याला टाकून जायचा…
अशी रिक्शा टॅक्सी बंद पडली की लगेच दुसरी पकडून निघून जाणं भारी रुथलेस वाटायचं तिला!
समीप फिस्सकन हसायचा पण ती थांबून रहायची…

एकटा काय करेल बिचारा भर पावसात… अजून थोडा वेळ वाट बघूयात… होईल चालू…
आणि अचानक रिक्शा चालू झाली…आणि परत जीव टाकणार…
तितक्यात त्यानं जीव खाऊन अ‍ॅक्सिलरेटर फुल्ल रेस दिला…
ग्रोंव ग्रोंव आवाज करत रिक्शा थडथडत होती…
रिक्शा… आणि आतली निर्मोही सुद्धा…
त्या रेसमुळे तिची कंबर, भिजक्या मांड्या गदगदत होते…
आणि सुखाची कंपनं पसरत होती तिच्या शरीरात…
तिनं हळूच पिशवी दाबून धरली मांड्यात… घट्ट!
ड्रायव्हर आपला नादात रेस देत होता… जोरात… आणि जोरात…
आणि निर्मोही रिचवत होती ती कंपनं मणक्यातून… खाली…
सुखाच्या लहरींवर लवलवत…

रिक्षानी आता व्यवस्थित जीव पकडलेला…
ड्रायव्हरचा जीव भांड्यात पडला त्यानं रेस कमी केला आणि गिअर टाकत आनंदाने पाठी नजर टाकली…
जीव पिसासारखा हल्लक होत होता निर्मोहीचा आणि डोळे अर्धूक मिटलेले…
अर्धवट कण्हत ती पुटपुटली, "और रेस करो… और."

त्याला एक क्षण काय समजेचना… बावचळायला झालं…
पण लगेच लख्ख उमजून तो हसला… समजूतदार…
एका आदिम मानवाची तगमग दुसऱ्या आदिम मानवाला कळावी तसं…

त्यानं गिअर परत न्यूट्रल केला आणि रिक्शा थडथडून रेस केली!


-नील आर्तेआफ्टर-थॉट: एलिप्सिस नसता तर आपण काय ब्लॉग लिहू शकलो नसतो… … …

14 comments:

 1. जय एलिप्सिस ...
  बाकी, आपण सारे निर्मोही

  ReplyDelete
  Replies
  1. "जय एलिप्सिस " :)
   funny part is I had just scribbled elipsis part & was not meant to be in published blog...
   But I just overlooked it & may be it's nice to stay ..thanks to u.

   Scarier part is there were some other highly inflamable scribbles too... luckily I erased them before publishing :)

   Delete
  2. Somehow I liked the afterthought. I mean how many times I used it without knowing .. you introduce me to the word for it - Ellipsis. Thank you.

   And the rest of inflammable scribbles are more than welcomed at my Mailbox..

   Delete
  3. sure thing ...will keep you posted ;)

   Delete
 2. सुंदर लिहिलंय !

  ReplyDelete
  Replies
  1. Liked the story, but a bit bold for my balbodh and kiddish taste. So big a thing expressed in so few words!! Wish I could write something so intense in minimum words.

   Delete
  2. Thanks Harshal ..Thanks Anagha Ma'm
   I too had my share of doubts before writing something bold but then we writers strive to bare our heart & soul ...
   So I thought what the heck :)

   Delete
 3. अशक्य जमून आलीये हि कथा..
  आदिमानवाची तगमग, आफ्टर थॉट आणि एकूणच सगळं अल्टिमेट !!!

  ReplyDelete
 4. आणि हो, एका स्त्रीच्या शूज मध्ये शिरून तू हि कथा लिहिली, कौतुकास्पद!!
  कथेला अनावश्यक लांबण न लावता तू नेमक्या, मोजक्या शब्दात मांडलीस हे हि प्रशंसनीय!!
  आणि लास्ट बट सर्टनली नॉट द लिस्ट, नैसर्गिक उर्मी आणि सेन्सुअस ह्यामधली सीमारेषा तू नेमकी पकडलीस ... प्लस हिला एरॉटिक स्टोरी करण्याचा मोह तू टाळलास हे तुझ्या लेखनातलं कौशल्य!!

  लिखते जाओ भाई, हम पढ रहे है :-)

  ReplyDelete
  Replies
  1. :) Just repeating my reply to one of the comments above:
   >>>>>
   I too had my share of doubts before writing something bold but then we writers strive to bare our heart & soul ...
   So I thought what the heck :)
   >>>>>

   Delete