Saturday 17 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ३)

ड्रायव्हर तोपर्यंत बाइकवाल्याकडे पोचला होता.
बाइकवाला आधी निपचित वाटला... पण हळूहळू उठून उभा राहीला.
फारसं लागलं नव्हतं त्याला फक्त शॉक बसला होता.
जाड जीन्स घसपटून फाटली होती आणि थोडंसं खरचटलं होतं.
डोक्याचं कलिंगड फुटण्यापासून अर्थातच वाचलं होतं आमच्या ड्रायव्हरच्या कृपेने.
ड्रायव्हरनं त्याला एकदा चेक केलं वरपासून खालपर्यंत.
"ठीक है तू?"
"अं... अं... हा!", बाइकवाला उत्तरला. अजूनही थोडा सदम्यातच होता तो.

ती अशी टोळासारखी बाईकवर बसत... वॉंव वॉंव करत हेलकावे देत गाडी चालवणारी 'बंटाय' पोरं असतात ना,
तस्साच होता तो.
तोंडावर मुरुमं... साळींदरासारखे कापलेले केस आणि कडक्या.
बाइकलाही फारसं काही झालेलं नव्हतं.
फक्त लेफ्टचा इंडिकेटर तुटला होता.
आम्ही त्याला बाईक उभी करायला मदत केली.
बाईक दोन किक मध्ये चालूही झाली.
               
 बाइकवाला अजूनही सदम्यातच होता.
  "थ... थ... थॅंक्यू भाईजान", तो चाचरत बोलला...  

आणि आमच्या डायव्हरनं त्याची कॉलर पकडली,

"नेक्स्ट टाइम हेल्मेटके सिवा दिखा ना मै खुद ठोकूंगा तेरेको. समझा? चल निक्कल."
बाईकवाल्यानी आज्ञाधारकपणे मान डोलावली, चुपचाप मागे अडकवलेलं हेल्मेट डोक्यात घातलं आणि तो छू झाला.

 "चलो साब अपना गाडी रॉंग साईडमे है. ठुक जायेगी", ड्रायव्हरनं माझ्या खांद्याला हलकेच स्पर्श केला.

मला त्या वायरी आठवल्या आणि मी त्याचा हात हिसडून टाकला,
"मै नहीं आ रहा हू तुमारे साथ. हे डोक्याचे प्लग्ज... हा हा सगळा काय प्रकार आहे?
फकिंग फ्रीक शो!"
                                               
"अरे चलो साब छोड देता हू आपको बारिश देखो याहूम हो रैली है.", तो अजीजी करत होता.

"नहीं मेरेको नहीं आना है तेरे साथ, मैं उबर बुलाऊंगा.", मी.

 "इतनी बारिशमे कोई नही आयेगा साब.", ड्रायव्हर

"चल के जाऊंगा, या इधरही रुकूंगा लेकिन तुम्हारे साथ नही भाई", मी त्याला निर्वाणीचं सांगितलं.

"आपकी मर्जी" ड्रायव्हरनी खांदे उडवले आणि तो गाडीकडे चालायला लागला.

मी पावसात भिजत तसाच उभा राहिलो...
इतक्यात फोन वाजला.
"इन लेबर ... डन्नो हाऊ कम इट्स वीक अर्ली ... कम फास्ट", केतकीचा मेसेज होता."

मी दोन क्षण तसाच बावचळून थांबलो आणि मग जीव खाऊन धावत गेलो आणि टॅक्सी अडवली.
दुसरा ऑप्शनच नव्हता.

क्रमश:

2 comments: