Saturday, 12 July 2025

सांगली साताऱ्यातला शेरलॉक

हे एक चांगलं डिटेक्टिव्ह पुस्तक फारसं नोटीस झालं नाहीय बहुतेक. 

आपल्या सगळ्यांच्याच कलेक्टिव्ह अनुत्साहाचं थोडं क्षालन करण्यासाठी ही जुजबी ओळख:

अगदीच अनोळखी लेखकांचं पुस्तक मीही उचलत नाही शक्यतो. 

पण ह्याची प्रस्तावना चाळतानाच, "एक वाचक म्हणून मला हे लांबण प्रस्तावना आवडत नाहीत सो कीपिंग इट शॉर्ट" 

किंवा तत्सम अर्थाचं लेखकाचं वाक्य वाचलं आणि ह्या लेखकाशी आपली नाळ जुळू शकेल असं वाटलं...

अदमास चुकला नाही आणि मजा आली. 

लेखक त्यानेच सांगितल्याप्रमाणे शेरलॉकचा (आणि 'सुशी'चा सुद्धा ) प्रचंड फॅन आहे 

आणि तो प्रभाव फार चांगल्या मार्गाने ह्या छोटेखानी पुस्तकात सुरस झिरपलाय. 

त्याचा मानसपुत्र डिटेक्टिव्ह अल्फा (ह्या नावामागची कथा पुस्तकातच कळेल) ची ही पहिली ओरिजिन्स नॉव्हेला. 

अगदीच मेनस्ट्रीम झालेली मुंबई - पुणे शहरं सोडून निवडलेला सांगली-साताऱ्याचा सेटअप मला फार आवडला. 

शेरलू अण्णांसारखेच पण आपल्या मातीतले निरीक्षण - निष्कर्षाचे मनोहारी माग अल्फा त्याचा मित्र प्रभवच्या साथीने काढत जातो. 

शैली थोडी अधिक रंजक आणि वेल्हाळ कदाचित करता आली असती पण आहे ते ही छानच. 

ऑर्थर कॉनन डॉयलचीही शैली मला अशीच वाटते.  

तोही फार काही इमोशन्स किंवा कथाबाह्य अदाकारीच्या (उदाहरणार्थ स्टीफन राजा किंग ) फंदात पडत नाही.  आणि शेरलू अण्णांच्या ऍडव्हेंचर्सच्या खुमारीत त्यामुळे फार काही फरक पडत नाहीच. 

मीही ह्या सिरीज मधील बाकी ऍडव्हेंचर्स वाचणारे. 

तुम्ही वाचल्या नसतील तर जरूर वाचा. 

ता. क. 

मी थोडं नेटवर सर्च केलं आणि ही सिरीज थोडीफार लोकप्रियता बाळगून आहे. 

तसं असल्यास छानच. लोकप्रियता अजून वाढो. 

लेखकाला आणि क्राईम-थ्रिलर जॉनरला खुप प्रेम आणि शुभेच्छा !!!

 


    

       




 



Wednesday, 2 July 2025

जारण्ण सॉरी जारण

मी शनिवारी रात्री स्विमींग केल्यावर बरेचदा युफोरिक म्हणता येईलशा आनंदी अवस्थेत असतो. 

त्याचं सविस्तर कारण सवडीने लिहीनच. 

पण ह्या शनिवारी तसंच उत्साहात ८: ३० ला पूल बाहेर पडता पडता बुक माय शो चेक केलं.  

९ चा हब मॉलला "जारण"चा शो दाखवत होता. 

अगदीच कट टू कट होतं पण सॉर्ट ऑफ उन्मादातच बुक केलं आणि रिक्षा शोधू लागलो. 

नशीबाने एका भैय्याजीने जोगेश्वरीच्या ट्रॅफिकमध्ये सुद्धा सेक्सी रिक्षा चालवून डॉट ९ ला मॉलच्या दारात टच केलं. 

त्याचे आभार!

धाकधूक करत स्क्रीनला पोचेपर्यंत ९:५ झाले पण सुरुवात बहुतेक चुकली नाही.  

सो थँक गॉड आणि सॉरी भारतमाता (जन गण चुकवल्याबद्दल)   

फार फार फार मजा आली. 

हृषीकेशच्या लिखाणाचा फॅन मी आहेच आता डायरेक्शनचा सुद्धा झालो. 

खास करून त्याची बरीच दृश्यं तुम्हाला कथेला पुढे नेणाऱ्या सच्च्या-फसव्या हिंट देऊ पहातात ते मस्तच. 

कसं ते तुम्हाला पाहूनच कळेल. 

सगळ्यांची ऍक्टिंग सुद्धा टॉप क्लास. 

अमृता लाजवाब. आमचा पिनकोड बहुतेक सेम आहे सो मी उगीचच कॉलर एक्स्ट्रा टाईट करून घेतली. 

अनिता दाते तुंबाडमध्येच आवडलेली इथेही छोट्या पण क्रिटिकल रोलमध्ये तूफान 

बाय द वे सेमी अवांतर तिच्या गेटअपला चंद्रमोहन कुलकर्णींचं हे चित्र रेफरन्स म्हणून वापरलं असावं असं मला आपलं वाटत राहिलं. 

फार आवडतं चित्रं आहे हे माझं. 

चित्रपटातले आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या धारपांचे आणि त्याहूनही लाडक्या व्यकीचे (विंक विंक) आणि तिच्या काही ऍक्शन्सचे रेफरन्सेसही चपखल. 

इंटरव्हलसुद्धा गणेश मतकरीने म्हटल्याप्रमाणे नॅरेटिव्हची गरजच असल्यासारखं अचूक वेळी येतं. 

सो समोसे खायला गिल्टी नाही वाटलं,     

तो एक्स्ट्रा n मात्र मला काही झेपला नाही. 

पण असतील काही गणितं.  

मी आपलं मनात जारण्णचं  "जारण" केलं आणि मगच पिक्चरची मजा घेतली.    

तुम्हीही जरूर घ्या.