हे एक चांगलं डिटेक्टिव्ह पुस्तक फारसं नोटीस झालं नाहीय बहुतेक.
आपल्या सगळ्यांच्याच कलेक्टिव्ह अनुत्साहाचं थोडं क्षालन करण्यासाठी ही जुजबी ओळख:
अगदीच अनोळखी लेखकांचं पुस्तक मीही उचलत नाही शक्यतो.
पण ह्याची प्रस्तावना चाळतानाच, "एक वाचक म्हणून मला हे लांबण प्रस्तावना आवडत नाहीत सो कीपिंग इट शॉर्ट"
किंवा तत्सम अर्थाचं लेखकाचं वाक्य वाचलं आणि ह्या लेखकाशी आपली नाळ जुळू शकेल असं वाटलं...
अदमास चुकला नाही आणि मजा आली.
लेखक त्यानेच सांगितल्याप्रमाणे शेरलॉकचा (आणि 'सुशी'चा सुद्धा ) प्रचंड फॅन आहे
आणि तो प्रभाव फार चांगल्या मार्गाने ह्या छोटेखानी पुस्तकात सुरस झिरपलाय.
त्याचा मानसपुत्र डिटेक्टिव्ह अल्फा (ह्या नावामागची कथा पुस्तकातच कळेल) ची ही पहिली ओरिजिन्स नॉव्हेला.
अगदीच मेनस्ट्रीम झालेली मुंबई - पुणे शहरं सोडून निवडलेला सांगली-साताऱ्याचा सेटअप मला फार आवडला.
शेरलू अण्णांसारखेच पण आपल्या मातीतले निरीक्षण - निष्कर्षाचे मनोहारी माग अल्फा त्याचा मित्र प्रभवच्या साथीने काढत जातो.
शैली थोडी अधिक रंजक आणि वेल्हाळ कदाचित करता आली असती पण आहे ते ही छानच.
ऑर्थर कॉनन डॉयलचीही शैली मला अशीच वाटते.
तोही फार काही इमोशन्स किंवा कथाबाह्य अदाकारीच्या (उदाहरणार्थ स्टीफन राजा किंग ) फंदात पडत नाही. आणि शेरलू अण्णांच्या ऍडव्हेंचर्सच्या खुमारीत त्यामुळे फार काही फरक पडत नाहीच.
मीही ह्या सिरीज मधील बाकी ऍडव्हेंचर्स वाचणारे.
तुम्ही वाचल्या नसतील तर जरूर वाचा.
ता. क.
मी थोडं नेटवर सर्च केलं आणि ही सिरीज थोडीफार लोकप्रियता बाळगून आहे.
तसं असल्यास छानच. लोकप्रियता अजून वाढो.
लेखकाला आणि क्राईम-थ्रिलर जॉनरला खुप प्रेम आणि शुभेच्छा !!!

No comments:
Post a Comment