Sunday, 26 October 2025

प्रायव्हेट पार्ट्स

उबर पहिल्या फटक्यात ऍक्सेप्ट झाली तेव्हा तिनं ठरवूनच जास्त आनंद नाही मानून घेतला. 

तो कॅन्सल करणारच असं समजून तिनं गॅस, गीझर, नळ पटापट चेक केले, पर्स उचलून चाव्या घेतल्या, आठवणीनं डिल्डो आत ड्रॉवरमध्ये टाकला. 

घरकामाला येणारी माधवीताई तशी चिल्ड आऊट होती पण उगीच बबालचा रिस्क नको. 

'सोसायटी'त (म्हणजे समाजात आणि गृहनिर्माण संस्थेतसुद्धा) एकटं रहाणाऱ्या मुलीला बेदरकार 'फक ऑफ' आणि संस्कारी सावधपणा ह्याचं एक ऑप्टीमल कॉम्बिनेशन वागवावं लागतं. ते तिला आताशा सवयीनं जमायला लागलं होतं. 

तसंही एक महिन्यानी ऍग्रीमेंट संपतंय सोसायटीतलं.  

सोडायचाच आहे हा फ्लॅट तेव्हा तर मुद्दामून व्हायब्रेटरचा बॉक्स ठेवायचा कचरा कलेक्ट करताना. 

करपू देत तो खडूस सेक्रेटरी तेज्यायला!

तिला विचारानेच हसू यायला लागलं. 

तिनं दरवाजा ओढून घेतला. 

लिफ्टशी गेली आणि न रहावून परत धावत जाऊन तिनं लॉक चेक केलं. 

तिला दुर्गेशची थोडीशी आठवण आली तो म्हणाला असता, "तू कन्या राशीना! लॉक करणारच तीनदा!!"

तसंही राशी पत्रिका ग्रहण-बिहण दृष्ट-बिष्ट आणि सटली किंवा बरेचदा न-सटली जाती-बीतींचं बिग डील करणाऱ्या दुर्गेशशी आपलं जमलं नसतंच. 

पण त्याच्याबरोबर "यायचो" आपण बहुतेक वेळा ती एक जादू मात्र होती त्याच्याकडे. 

तिला एक कन्फ्युज्ड शिरशिरी आली आणि तिनं लिफ्ट बोलावली. 

सवयीनं एक नजर उबरवर टाकली. 

अरे व्वा चक्क पहिल्या ड्रायव्हरनं ट्रिप कॅन्सल नव्हती केली. तीन मिन्टांत येत होता तो. 

आजचा दिवस चांगला जाणार बहुतेक पण गेटवर गाडी येईपर्यंत काही खरं नाही. 

सेक्रेटरी देसाई वॉक करून परतत होता त्याला उगीचच एक स्मग + बेदरकार + गोड स्माईल देऊन ती गेटवर पोचली. 

गाडी उभी होती... मस्त!

ती पुढचा दरवाजा उघडून झपकन बसली. तिनं सवयीनं हसून ड्रायव्हरला गुड मॉर्निंग केलं. त्यानंही छान हसून परतावा दिला. 

ओ. टी. पी. देता देता तिनं त्याला ओझरतं पाहून घेतलं. 

किंचित विरळ झालेले मागे फिरवलेले केस, बसकेश नाक, छान चमकदार डोळे. 

आवडल्यासारखाच तो तिला. 

आणि मग तिचं लक्ष स्टेअरींगवरच्या त्याच्या उजव्या हाताकडे गेलं. 

उजव्या हाताला मनगटापासून पुढे एक लहानशी पिशवी बांधलेली. 

'नखं वाढवली असणार', तिनं अटकळ बांधली. 

तिच्या एका लांबच्या काकानं वाह्यली होती अशी देवाला नखं. 

लहानपणी भीतीयुक्त अचंबा वाटायचा बाळ काका आला की सगळ्या भाच्या पुतण्यांना.

एकदा तो नखं साफ करायला बसलेला तेव्हा त्यानं पिशवी काढलेली हळूच आणि आतनं बाहेर आलेली ती करडी पिवळी नखं आणि त्यांच्या टोकाशी झालेल्या चकलीसारख्या गुंडाळ्या. 

काहीतरी सरीअल, अतिमानवी, थरारक. 

नवल मासिकावरच्या एखाद्या पानावर अवचित येणाऱ्या श्रीधर अंभोरेंच्या चित्रासारखं. 

पुढे कैक वर्षांनी तुंबाड पहाताना बाळकाकाची ती लांब गुंताडेली नखं आठवत राह्यली तिला राहून राहून. 

एकाचवेळी भयकारी आणि आकर्षकसुद्धा. 

"मॅडम एक सांगू"?

अचानक तिची तंद्री तुटल्यासारखी झाली. 

"असं कोणी सकाळी येऊन बसताना नमस्कार/ गुड मॉर्निंग केलं की छान वाटतं आम्हालाही"

"हो ना?", तिही खुलली. 

"हो नाहीतर बहुतेक भाडी आमच्याकडे बघतसुद्धा नाहीत."

ती परत हलकेच हसली. 

तोही तिला तिच्या विचारांत सोडून ट्रॅफीकचा किचाट सोडवत राह्यला. 

उजव्या हाताची बोटं तो अर्थातच वापरू शकत नव्हता. 

केवळ तळहाताच्या दाबाने स्टेअरींग सांभाळणं अवघड असणार? असणारच!

पण तो मात्र नॉर्मल सफाईने चालवत होता गाडी. 

ती थोड्या अप्रूपानेच बघत राह्यली त्याच्या हाताकडे... 

आणि अवचित तिच्या तोंडून निघून गेलं, "तुम्ही नखं वाढवून देवाला वाह्यलीत का?"

तो हलकेच हसला. 

काहीतरी निवांत व्हाइब्स होते त्याच्यात. 

छान वाटत होतं तिला त्याच्याबाजूला बसून. 

बाहेर सकाळचा वेडझवा ट्रॅफिक होताच पण छान कोवळं ऊनही होतं. 

काचा लावलेल्या ए. सी. उबरमध्ये कोलाहल बाहेर थांबून राह्यल्यासारखा 

"मॅम बरेच लोक मला सेम प्रश्न विचारतात आणि मी हो बोलून विषय संपवून टाकतो. 

पण तुम्हाला मात्र खरं सांगावंसं वाटतंय आज. खूप कमी लोकं अशी बरोबरीनं बाजूच्या सीटवर बसतात. 

बायका तर नाहीच. तुम्ही मात्र वेगळ्या वाटलात. 

नखं माझी तशी नॉर्मल लांबीचीच आहेत."

"मग पिशवीनं का झाकलंय तो हात?"

त्यानं एक मोठ्ठा श्वास घेतला,

"ह्याच्या पुढे थोडा डेंजरस प्रदेश चालू होईल. तुम्हाला सगळं सांगावंसं तर वाटतंय. पण मी पुरुष उबर ड्रायव्हर आणि तुम्ही माझं भाडं ते ही स्त्री.  

आगाऊपणाबद्दल माझी कंप्लेंट झाली तर उबरही जाईल हातातून"

तिनंही काही क्षण ओठ चावत विचार केला. 

पण कुतूहलाचं मांजर शेवटी जिंकलंच. 

माणूस सज्जन वाटत होता काही अचकट विचकट चाळे करेल असं वाटत नव्हतं. 

शिवाय बाहेर लख्ख दिवस होता आणि तिच्या केसांच्या बनमधली अणकुचीदार पिन दणकट शिसवाची होती.

"सांगा बिंधास", ती उत्तरली, "आहे, माझा कन्सेंट."

"नक्की?"

"नक्की!"

"ठीक, आमच्या लग्नाला काल चार वर्षं झाली."

"अरे व्वा हॅपी बिलेटेड ऍनिव्हर्सरी!"

"थँक्यू थँक्यू!

तर... 

कट टू आमची पहिली रात्र:

ड्रायव्हर पुन्हा एकदा चाचरला,

"तरी मी तुम्हाला जमेल तितकं गाळीव करून सांगतोय पण माझ्या मनात मात्र ते लख्ख डिटेलवार उतरून येतंय हे तुम्ही समजून चला."

तिनं मान डोलावली. 

"रात्रीसाठी मित्रांनी कॉन्ट्री काढून बाणेरच्या ऑर्कीडमध्ये रूम बुक केलेली. 

मी तर फुल्ल एक्सायटेड. 

खरं तर तसा मी काही व्हर्जिन वगैरे नव्हतो. 

मित्रांबरोबर एकदा वाघोलीला एका जागी गेलेलो पैसे देऊन पण काय छान नाही वाटलं. 

मग एक गर्लफ्रेंड पण झालेली सांगवीची तिच्याबरोबर तर नीटच लॉजवर गेलेलो दोन तीनदा. 

पण उबर चालवणारा जावई तिच्या घरच्यांना चालणार नव्हता सो ते फाटलंच. 

नीलम मात्र मला कांदेपोहे कार्यक्रमात बघितल्याक्षणीच आवडलेली. 

तिलाही मी आवडलो होतो बहुतेक. 

आमची परिस्थिती बेताचीच असली तरी आजोबा महर्षी कर्व्यांबरोबर राहिलेले. 

त्यामुळे फॅमिली फ्री विचारांची सो देण्या घेण्याचा काही प्रश्न नव्हता. 

अशी गायीसारख्या मोठ्ठ्या काळ्याशार डोळ्यांची, गव्हल्या खिरीच्या खरपूस रंगाची, साक्षात नितंबिनी म्हणावी अशी बायको मिळाली म्हणून मी तर बेफाट खुश होतो. 

इतकी सुंदर सेक्सीच म्हणता येईल अशी मुलगी व्हर्जिन बिर्जीन असेल अशा काही वेडगळ अपेक्षा नव्हत्या माझ्या. 

(मी तरी कुठे होतो)

पण आजच्या रात्रीची वाट मात्र मी पहात होतो हे शंभर टक्के!

ते दूध नी गुलाब पाकळ्या बिकळ्या चुत्यापा माझ्या मित्रांचं नी नीलमच्या मैत्रिणीचं चाललं होतं. 

पण आम्हाला काय इंटरेस्ट नव्हता आणि तसंही ते आमच्यासाठी कमी आणि दोन्ही पार्ट्यांना एकमेकांत सेटींग करण्यासाठी ज्यास्त होतं. सो ते आम्ही धुडकावलंच. 

आम्ही मात्र मस्त जेवून रूमवर रिलॅक्स करत होतो. 

आणि केबलवर "तुंबाड" लागला. 

आता तुंबाड म्हणजे माझा तुफान फेवरेट पिक्चर. "

"द्या टाळी माझाही", ती बोलली. 

"एक नंबर पिक्चर आहे गांडफाड पण प्रचंड सुंदर

नीलमसुद्धा मोठे मोठे डोळे करून बघत राह्यली आणि घाबरून मला बिलगतसुद्धा राहयली."

साधारण हस्तरची एंट्री येते तोपर्यंत नीलमने बिलगून बिलगून माझी हालत खराब करून टाकलेली. 

एका कुठल्यातरी सीनला तिचे मॅक्सीच्या आतले मुलायम बॉम्ब माझ्या दंडावर रुतले आणि न राहवून मी तिला जवळ ओढली. 

एकाच वेळी तिच्याबद्दल प्रचंड माया, अपार वात्सल्य आणि जालीम आकर्षण वाटायला लागलेलं मला त्या क्षणी. 

तिला कुरवाळावं, तिच्या असंख्य पाप्या घ्याव्यात, तिला छातीशी घट्ट धरावं आणि तिच्या स्लिव्हलेस खाकांमधून येणार वास खोल ओढून घ्यावा असं काहीतरी. 

तिची नजर आधी स्थिर माझ्या नजरेत पण नंतर थोडी चलबिचल, किंचित भेदरल्यासारखी.  

पण माझ्यातल्या पुरुषाला ते अजूनच सेक्सी वाटलेलं. 

तिच्या घाबरट डोळ्यांची मी चुंबनं घेतली, मग कपाळाची, ऊदासारखा वास येणाऱ्या केसांची, कानांची, तिच्या अपऱ्या नाकाची आणि मग ओठांची. 

एक लां SSS ब चुंबन घेऊन आमचे ओठ विलग झाले. 

न राहवून पुन्हा मी तिच्या ओठांची च्युईंच्युक आवाज करत मायाळू चिमण चुंबनं घेऊ लागलो. 

ओठ, डोळे, नाक, नाक. कपाळ, नाकपुड्या, ओठ, ओठ, ओठ... 

तिच्या स्तनांच्या उशीत बाळासारखं डोकं खुपसून तिच्या ब्राची पट्टी, कमरेची वळकटी, मॅक्सी मधून जाणवणारी चड्डीची किनार सगळं चाचपडत राहीलो. 

नीलम विरोध करत नव्हती हे खरं. 

प्रतिसाद होता म्हटलं तर पण फार आवेगी नव्हे. 

बाईला हळूहळू मूडात आणणंसुद्धा एक मजा असते. 

आधीचीच्या शरीराची चुकार आठवण मनात चमकून गेली पण गम्मत म्हणजे त्यामुळे मला नीलम अजूनच हवी हवी वाटायला लागली. 

पझेसिव्ह पझेसिव्ह होत तिला कचाकचा चावून टाकावंसं वाटायला लागलं. पण मला तिला पहिल्याच रात्री घाबरवून सोडायचं नव्हतं. 

मी हलकेच तिचा गाउन काढायला गेलो. 

तिनंही डोळे मिटत दोन्ही हात वर केले. 

परत तो घामाचा वेडावणारा वास. 

लग्नासाठी घेतलेले कोरे करकरीत इनर्स!

मॅचींग नसलेले. 

मरून कलरची ब्रा तिला कोरा कोरा वास येत होता. 

स्तनांचे गोल लहानखुरेच होते तिचे आणि मधल्या घळीवर पातळ सोनेरी लव होती. 

खालून मात्र ती बॉटम हेवी किंवा पीअर शेप्ड म्हणतात तशी होती. 

मुलायम पांढरी पँटी घातलेली तिनं आणि त्यावर लहान लहान स्ट्रॉबेरीज होत्या लाल चुटूक. 

समोर त्रिकोणी फुगवटा आलेला आणि आतली केसांची काळी आऊटलाईन जाणवत राह्यलेली मला. 

मी हावऱ्या जनावरासारखं तोंड टाकलं त्या उष्ण त्रिकोणात पँटीवरूनच. 

एखाद्या लहान मुलानं चांदीसारखंच चॉकलेट खायला जावं तसं. 

तीही थोडी यांत्रिकपणे हुंकारत राह्यली. 

दोन (की पाच?) मिन्टं तसाच स्थिर राह्यलो तिच्या मांड्यांत डोकं टाकून. 

आणि मग डोकं वर उचलून तिच्याकडे मायेनं बघितलं. 

तिनं माझे केस चुंबले. 

आणि मी परत वर आलो. तिला घट्ट मिठी मारून तिच्या ब्राची पट्टी खोडकर ओढली. 

सट्टाक!

तिनं लटके रागावून मला चिमटा काढला.  

मी हूक्स काढले आणि तिला दूर लोटलं. 

तिनं स्त्री-सुलभ लाजेने एक क्षण छाती झाकली. 

आणि मग मात्र काहीशा गर्वानंच छाती पुढे काढत ती उद्धट उत्फुल्ल जोडी डौलात माझ्या पुढे केली. 

तिचे स्तन लहानखुरे असले तरी ऑरिओला मात्र मोठ्ठी वर्तुळं होती. 

बॉरबॉन बिस्किटांतल्या क्रीमच्या रंगाची. 

एखाद्या वारकऱ्याच्या भक्तीभावाने मी ते स्तन पकडले आणि त्यांना जवळून निरखू लागलो. 

आख्ख्या ब्रह्मांडाचं सौंदर्य त्या दोन पिंडींमध्ये सामावल्यासारखं. 

त्यांना बघावं की दाबावं की चोखावं की लुचावं? माझं काही ठरेना. 

मग मी आळीपाळीने सर्वच केलं. 

माझा लिंगोबाचा डोंगर आभाळी गेलेला. 

मी तिला हलकेच ढकलून बेडवर पाडायचा प्रयत्न केला. 

पण तो पुरेसा नव्हता. 

मग मी आणखी एकदा डबल जोर लावून तिला बेडवर पाडलं. 

गुडघ्यांवर उभं रहात माझी अंडी खस्सकन खाली ओढली. 

नीलमनी डोळे मिटून घेतले, अंमळ गच्चच. 

मी तिच्या दोन्ही बाजूंना गुडघे रोवत पुढे सरकलो तिच्या पोटापर्यंत आणि तिचा हात घेऊन ताठर शिश्न तिच्या हातात द्यायचा उत्साही प्रयत्न केला. 

तिनं चटका बसल्यासारखा हात मागे घेतला. 

तिचं आख्खं शरीर ताठरल्यासारखं झालं, ओठ थरथरत होते. 

पण ते एक्साइटमेंटनी अशी मी सोयीस्कर समजूत करून घेतली. 

तापल्या आवाजात बोललो, "डोळे उघड ना बघ ना माझा **."

तिनं घाबरत एक क्षण डोळे उघडले माझं टणटणीत झालेलं शिश्न बघितलं आणि भडभडून उल्टी केली. 

मग आख्ख्या अंगाला गचके देत ती मुसमुसत राह्यली. 

मी क्षणभर सुन्न मग गोंधळलेला, हॉर्नी तर होतोच, थोडा रागसुद्धा आलेला. पण हळूहळू ते सगळं निवत गेलं. 

काही मिन्टांनी मी कपडे चढवले. 

नीलमला आत नेऊन साफ केलं. 

उल्टीची चादर बाथरूममध्ये टाकून दिली आणि तिला थोपटत आम्ही दोघंही झोपून गेलो त्या रात्री. 

दुसऱ्या सकाळी दिवशी अर्थातच सगळ्यांनी गमीदार भुवया उडवणं, "झाली का "झोप" नीट", असं विचारणं, माझ्या पाठीत धपाटा मरून डोळा मारणं वगैरे क्लिशेड प्रकार केलेच. 

पण मी आणि नीलमनी सगळ्यांना गोड हसून साजरं केलं. 

पण पुढच्या काही आठवड्या-महिन्यांत मला एवढं मात्र कळलं की नीलमला पुरुषाचं लिंग ह्या गोष्टीचा प्रचंड फोबिया आहे. 

तो का आणि कसा हे कळून घ्यायची घाई करून काही उपयोग नव्हता. 

गोष्टी आणखी बिघडल्या असत्या. 

डॉक्टरांनीही तेच सुचवलं. 

थोडा ताण आलेला आमच्या नात्यात पण अगदी लग्न बिग्न तोडण्याएवढा नाही. 

नीलमला अपराधी वाटायचं. 

मीही थोडा आधी चिरडीला आलेलो थोडा पण नंतर सवय झाल्यासारखी. 

तिला घट्ट मिठी मारून तिची चुंबनं घेत हातानी रिलीज व्हायची सवय पडून गेल्यासारखी झाली मला. 

आणि त्याला नीलमचीही हरकत नव्हती. पण मला मात्र अगदीच लाचार वाटायचं नंतर. 

शिवाय तिचं ती कसं काय भागवत होती का तिला मुळात सेक्सविषयीच घृणा होती हा प्रश्न होताच. 

आमच्या नात्यातल्या ताण सुध्दा थोडा हलका झाला पण पूर्ण गेला नाहीच. 

वेळ सगळीच धारदार टोकं बोथट करतो हळूहळू. 

पण काहीतरी राहून गेलंच होतं. 

बाकी तशी माझी ती उत्तम काळजी घ्यायची मीही तिची हौस मौज पुरवायचो. 

एक मात्र आम्ही केलं वानवडीच्या एका शांत गल्लीत छोटा ब्लॉक घेतला आणि फॅमिलीपासून गोडी गुलाबीनं वेगळे राह्यला लागलो. 

आमचं काय चाललंय किंवा काय नाही चाललंय ते आमच्या दोघांपाशीच असू द्यावं. 

माझं उबरनी तसं बरं चाललं होतं. 

हे आपण आपले राजे होऊन ड्राइव्ह करायचं काम आवडतं मला. 

कधी सकाळी आरामात निघावं,

किंवा कधी संध्याकाळी पाच वाजताच होम लोकेशन टाकून घरी येऊन मस्त नीलमनी केलेला आल्याचा स्ट्रॉन्ग चहा पीत बसावं असं काहीतरी. 

त्या दिवशी असंच झालं. 

टळटळीत दुपारी मला बाणेरवरून हडपसरचं भाडं मिळालं. 

त्यांना मगरपट्ट्याला ड्रॉप केलं आणि मला जाम झोप यायला लागली. 

मग मी सरळ ऑफलाईन झालो आणि पंधरा मिन्टांत गाडी वानवडीला घराखाली लावली. 

आमची गुलमोहर रिट्रीट सोसायटी फार छान आहे. 

शांत रस्त्यावर चार पाच रो हाउसेस आणि एक प्रत्येक मजल्यावर एकेक फ्लॅटचं चार मजली अपार्टमेंट. 

एवढ्या छान सोसायटीत आम्हाला भाडं परवडलं पण नसतं खरं तर.  

पण पहिल्या मजल्यावरच्या अपार्टमेंटमध्ये एका मुस्लिम आंटीने तिच्या २ बी. एच. के. लाच दोन सेपरेट दरवाजे काढून एक रूम किचन आम्हाला दिलेला. 

नीलमला दुपारी झोपायची सवय होती सो मी माझ्या चावीनेच आत गेलो. 

बाहेर आमचा हॉल कम बेडरूम आणि आतमध्ये दुसऱ्या खोलीत किचन. 

हॉलमध्येच बेडवर नीलम लवंडली होती आणि तिच्या मांड्यांत दाबून धरलेली उशी होती. 

ती डोळे मिटून हलके हलके कण्हत होती. 

का आणि कुठून कोण जाणे माझ्या डोक्यात सूक्ष्म लालसर संताप चढत गेला. 

ती उशी जणू माझा ककॊल्ड करतेय असं काहीतरी वाटलेलं. 

मला राग येणं कदाचित बहुतेक बरोबर नाही हे मला कुठेतरी आत कळत होतं. 

आणि त्या राग येण्याचाही राग येत होता.  

फ्रस्ट्रेशन म्हणजे हा बाहेरचा राग आतल्या रागात मिसळून दोन्ही राग वाढत चाललेले आणि मी काही न सुचून तसाच गप्प. 

तेवढ्यात नीलम कण्हणं थांबवून लहान मुलासारखं भोकाड पसरून रडायला लागली. 

"पाठ खूप दुखतेय", ती कळवळली. 

तिला पाठीचं क्रॉनिक दुखणं होतंच. 

माझा राग विरून काळजी होत चाललेला. 

"डॉक्टरकडे जायचंय?"

"ती कण्हतच राह्यली."

मी काय करावं ते न सुचून तिला ढकलून कुशी केलं आणि तिची पाठ दाबू लागलो. 

"अयाई गं बरं वाटतंय", ती मनापासून बोलली. 

मी पहिल्या रात्रीनंतर आजच तिला टच करत होतो. जवळ जवळ वर्षाने. 

मला थोडं छान वाटत होतं आणि तिच्या वेदनेत आपण एंजॉय करतोय म्हणून थोडं अपराधीही. 

योग्य दुखरा पॉईंट दाबल्यानंतर ती हलकेच कण्हत होती त्यानी मला अजूनच गरम व्हायला होत होतं. 

तिच्या शरीराचे नवीन नवीन भाग मला अजून अजून दाबावेसे वाटू लागले. 

"पाय दाबू?", मी हलकेच विचारलं. 

तिनं "हुं" केलं आणि मी तिला कुशीची उताणी केली. 

तिच्या पोटऱ्या एखाद्या ऍथलीट सारख्या भरलेल्या होत्या. 

ती तसंही शाळेत खो खो चांगला खेळायची तिनंच सांगितलेलं मला उगीचच आठवलं. 

हलकीशी लव होती तिच्या पोटऱ्यांवर. 

मी पोटऱ्या, गुडघे. तळवे आळीपाळीने घट्टमुट्टं दाबत राह्यलो. 

ती समाधानानं पुटपुटली देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. 

त्या क्षणी माझी खरं तर एकच इच्छा होती पण ते शक्य वाटत नव्हतं. 

तिचा गाउन मांड्यांमधल्या त्रिकोणात थोडा आत घुसला होता. तो मनोहारी त्रिभुज प्रदेश मला वेडा करत होता. 

माझा हात माझ्याही नकळत गुडघे दाबता दाबता वर गेला आणि गाऊनच्या बाहेरून मी तो त्रिकोण हलकेच दाबला. 

ती किंचित उडाल्यासारखी वाटली, किंवा कदाचित भास असेल. मी घाबरून पुन्हा इमानदारीत तिचे गुडघे आणि मांड्या दाबत राह्यलो. 

तिला झोप लागल्यासारखी वाटत होती. मी अलगद तिच्या कपाळाचं मायेनं चुंबन घेतलं. 

तिनं मला जवळ ओढून ओठांवर ओठ टेकवले. 

मी आनंदाने थरारत हलकेच तिच्या बाजूला झोपलो आणि तिला घट्ट जवळ घेऊन तिची मटामटा चुंबनं घेत सुटलो. 

काही क्षणात मलाही नकळत माझा हात तिच्या पँटीत गेला. 

मग मात्र मी थोडा घाबरलो. 

नीलम थोडी जरी अन-कम्फर्टेबल वाटली तरी हात लगेच काढायची मी तयारी ठेवली होती. 

पण तिनं विरोध दर्शवला नाही. 

मी हात हलकेच दाबला आणिती पुन्हा उडाली. 

आपण इकडे हलकीशी टिचकी द्यावी आणि तिकडे लांब आभाळात उडालेला पतंग सर्र्कन वळावा तसं होत होतं हे. 

एवढ्या लांबच्या पतंगाचा कंट्रोल आपल्या हातात आहे ह्याचा नाही म्हटलं तरी अभिमान वाटतोच. 

तसंच काहीसं मला वाटायला लागेलेलं. 

मी पुन्हा एकदा दाबलं पण ह्या वेळेस मात्र ती विशेष उडाली नाही. 

आता मात्र मीच वेडावल्यासारखा झालेलो. 

नीलमला टणकन् उडवायचं एकदा फक्त एकदा ह्या इच्छेनं मला वेढून कवटाळून आवळून टाकलं आणि मी बोट अलगद आणखी थोडं आत टाकलं.  

आताही ती उडाली नाहीच पण तिचं आख्ख शरीर आता झणझणंत होतं. 

मला एकदम माझ्या बारावीची आठवण झाली माझ्या एका मित्रानं कुठून तरी फॉरेनचा एक बँड शोधला. 

ए. सी. डी. सी. की कायतरी नावाचा. 

त्यांचं एक गाणं * तो आम्हाला जबरदस्ती पकडून कानात हेडफोन्स खुपसून नेहमी ऐकवायचा. 

गाणं काय मला फारसं कळलं नाही पण बहुतेक आवडलेलं. 

खास करून त्यात पहिले चालू होणारा इंट्रोचा गिटारचा तुकडा. 

सूक्ष्म थरथरणारी गिटार आणि मध्येच उसळणारा क्राऊडचा आवाज. 

तसंच होत होतं आता. 

नीलम झणझणत होती आणि मध्येच उसळत होती. 

मी जणू माझ्या बोटानी गिटार वाजवत होतो. 

मध्येच मी हात बाजूला घेऊन तिचे गोल गुबगुबीत वळसे मनसोक्तपणे दाबले. पण माझ्या बोटांचा तेवढाही विरह तिला सहन होईना. 

तिनं माझा हात परत खसकन ओढून घेतला.  

मीही आता अजिबात न घाबरता नि:शंक मनाने बोट आत जाऊ दिलं. 

एकाच्या मदतीला आणखी बोटं आली.  

एक बोट आत एक बाहेरून गोंजारतंय आणि बाकीची तीन बोटं आजूबाजूला रँडम धमाल करतायत असं सगळं कायकाय चालू झालं. 

तिचा आतला ओलावा, तो आदिम गुबगुबीत लुसलुशीत स्पर्श आणि तो चुटचुट येणारा आवाज मलाही सुख देत होता. 

पण खरं सांगू का सगळ्यात लोभस होतं ते तिला बघणं!

तिच्या वत्सल शरीराला बिलगावंसं वाटूनही तिला थोडं अंतरावरून बघण्यासाठी मी बाजूला होऊन बोटं चालवत होतो. 

तिचा अंबाडा सैल झालेला, कपाळ आणि वरच्या ओठावर घाम जमा झालेला. 

डोळे मिटलेले. मध्येच ते उघडून असह्य आनंदीपणे मला बघायची आणि परत दुसऱ्या कुठल्यातरी जगात सुख लुटायला निघून जायची. 

त्या तिच्या वेगळ्याच एकाकी पण आनंदाने थबथबलेल्या जगात मला प्रवेश होता तरी का? कोण जाणे. 

कदाचित मी फक्त एक वाहन होतो, किंवा एखादं टूल पण त्याचं मला फारसं काही वैषम्य वाटलं नाही.

कारण गंमत म्हणजे आपण एखाद्याला इतका आनंद देऊ शकतो हे बघूनच माझ्या शरीरात माझ्या पर्सनल आनंदाची कारंजी उडायला लागली होती. 

आम्ही दोघे एकत्र पण आपापला आनंद लुटत होतो असं म्हणूयात हवं तर. 

बरीच मिनटं (की तास?) असंच चालू राह्यलं. 

खरं तर विचित्र अँगलमुळे माझा हात दुखायलाही लागला होता. 

पण तिच्या सौख्यरथाला अडवायची माझी हिम्मत आणि इच्छा दोन्ही नव्हतं. 

बोटांची विविध आणि रँडम परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स वापरून मी तिला फुलवत चेतवत होतो. 

शेकोटीतल्या निखाऱ्यांसारखी ती मध्येच मंद होत होती आणि मध्येच पुन्हा उफाळत होती. 

एका क्षणी ती उफाळलेलीच राह्यली. 

तिनं माझ्या खांद्यावर एक जोरकस चापट फटकाच खरं तर मारला आणि नखं आत रुतवली. 

देवाशप्पथ सांगतो. 

तिच्या देहातून एक्झॅक्टली एखाद्या फुलबाजीसारख्या प्रकाशाच्या झिरमिळ्या उडत राह्यल्या काही सेकंद. 

मग तो मंद सुंदर स्नेहाळ प्रकाश मंद मंद होत गेला. 

तिनं पुन्हा एक चापट मारली ह्यावेळी अजिबातच जोर नसलेली आणि ती निवत निवत निवत गेली. 

नंतर थोड्याच सेकंदांत माझं मीही स्वतःचं स्वतः उरकलंच आणि निर्व्याज बाळासारखे आम्ही दोघेही शांतपणे झोपून गेलो. 

नंतर संध्याकाळी आम्ही निवांत गप्पा मारत घेतलेला चहा, 

रात्री जेवणाला नीलमने केलेलं आंबट तिखट मांदेलीचं कालवण भात, 

झोपायच्या आधी ऐकलेलं "तू किसी रेलसी चलती है" गाणं 

आणि नंतर माझ्या पोटावर हात टाकून झोपलेली नीलम. 

हे सगळं सगळं आजही मला लख्ख आठवतंय. 

माझ्या आयुष्यातली ती सर्वात आनंदाची दुपार नक्कीच म्हणता येईल. 

आमच्या संबंधांतला एक अडकेलला बोळा निघाल्यासारखा झालेला. 

त्या दिवशीची तिची ती तृप्त जडावलेली काया, डोळे, ओठ... 

पुन्हा तिला तसं झिरमिळताना, फुलबाजीसारखं निवत जाताना बघायला मिळावं म्हणून मी माझं आख्खं आयुष्य ओवाळून टाकायला तयार होतो. 

आणि सुदैवाने तसे प्रसंग पुन्हा पुन्हा येत गेले. 

पण किल्ला मात्र माझी बोटंच लढवत होती. 

तेही ठीकच. 

सेक्सच्या ह्या निबिड जंगलात कोणाला कुठे भय वाटेल आणि कुठे निवांत वाटेल ह्याचा काही आडाखा थोडीच आहे?

आणि शेवटी लग्न, मैत्री, प्रेम म्हणजे तरी काय?

आपल्या पार्टनरला खुष होताना बघून होणाऱ्या आनंदाची प्रत वेगळीच असते. 

त्याच आनंदाची मला सवय झाली असं म्हणूया हवं तर. 

तसंही पुरुषांचं समाधानी होणं कम्पॅरिटीव्हली सोपं असतं. 

आनंद सागरात आम्ही दोघांनी नाही मारल्या एकदम उड्या  

आधी हलकेच तिला लोटून देऊन मारली मग मी उडी थोड्या वेळानी तर काय बिघडलं?

नात्याच्या आतली गणितं नात्यातल्या दोघांना ठीक वाटली की झालं, 

त्याचा काही प्रोटोकॉल नसावा, नसलेलाच बरा."      

त्या ड्रायव्हर सफाईदार टर्न घेतला आणि सिग्नलला गाडी थांबवली. 

आता पुढे २०० मीटरवर अजून एका वळणानंतर ऑफीस. 

"ही एवढी मोठ्ठी गोष्ट ऐकली पण हाताच्या पिशवीचं काय?"

तिला थोडं चिरडीला आल्यासारखं झालं. 

तितक्यात तिला कोपऱ्यावरच्या नेहमीचा वेडा दिसला. 

सगळाच विवस्त्र असला तरी कमरेखालचा त्रिकोण मात्र एका पुठ्ठयानं झाकला होता त्यानं. 

तिच्या गाडीवर टकटक झाली. एक किरटं पण प्रगूसारख्या तेजस्वी डोळ्यांचं पोरगं टकटक करत पैसे मागत राह्यलं. 

तेवढयात सिग्नल सुटला आणि ते पोरगं गाड्या चुकवत पलीकडे पळालं. 

पळताना त्याची चड्डी कुल्ल्यांवरून खालीच घसरायची पण त्यानं चपळाईनं ऐन क्षणी वर खेचून घेतली. 

समोरून चालत आलेल्या मुलीचा मोबाईल चुकून खाली पडला. 

तो उचलताना त्या मुलीनं लो कट टॉप मधली छाती अनाहूतपणे रिफ्लेक्स ऍक्शननी झाकली. 

आणि हिला काहीतरी लख्ख कळल्यासारखं झालं. 

तिनं ड्रायव्हरच्या खांद्याला हलकेच स्पर्श केला आणि हलकंसं हसून ती बाहेरच्या लख्ख उन्हात ऑफीस गेटकडे चालू लागली. 

---------------------------------------------- समाप्त ----------------------------------------------        

* टीप

ह्या कथेत उल्लेखलेलं गाणं  ए. सी. डी. सी. ह्या रॉकबँडचं थंडरस्ट्रक हे गाणं आहे.   

गाण्याची लिंक:
https://youtu.be/v2AC41dglnM?si=n6pO_HtEhh-2Lide

  




 

  

 


    

  

 



 







 





 



 

















Saturday, 12 July 2025

सांगली साताऱ्यातला शेरलॉक

हे एक चांगलं डिटेक्टिव्ह पुस्तक फारसं नोटीस झालं नाहीय बहुतेक. 

आपल्या सगळ्यांच्याच कलेक्टिव्ह अनुत्साहाचं थोडं क्षालन करण्यासाठी ही जुजबी ओळख:

अगदीच अनोळखी लेखकांचं पुस्तक मीही उचलत नाही शक्यतो. 

पण ह्याची प्रस्तावना चाळतानाच, "एक वाचक म्हणून मला हे लांबण प्रस्तावना आवडत नाहीत सो कीपिंग इट शॉर्ट" 

किंवा तत्सम अर्थाचं लेखकाचं वाक्य वाचलं आणि ह्या लेखकाशी आपली नाळ जुळू शकेल असं वाटलं...

अदमास चुकला नाही आणि मजा आली. 

लेखक त्यानेच सांगितल्याप्रमाणे शेरलॉकचा (आणि 'सुशी'चा सुद्धा ) प्रचंड फॅन आहे 

आणि तो प्रभाव फार चांगल्या मार्गाने ह्या छोटेखानी पुस्तकात सुरस झिरपलाय. 

त्याचा मानसपुत्र डिटेक्टिव्ह अल्फा (ह्या नावामागची कथा पुस्तकातच कळेल) ची ही पहिली ओरिजिन्स नॉव्हेला. 

अगदीच मेनस्ट्रीम झालेली मुंबई - पुणे शहरं सोडून निवडलेला सांगली-साताऱ्याचा सेटअप मला फार आवडला. 

शेरलू अण्णांसारखेच पण आपल्या मातीतले निरीक्षण - निष्कर्षाचे मनोहारी माग अल्फा त्याचा मित्र प्रभवच्या साथीने काढत जातो. 

शैली थोडी अधिक रंजक आणि वेल्हाळ कदाचित करता आली असती पण आहे ते ही छानच. 

ऑर्थर कॉनन डॉयलचीही शैली मला अशीच वाटते.  

तोही फार काही इमोशन्स किंवा कथाबाह्य अदाकारीच्या (उदाहरणार्थ स्टीफन राजा किंग ) फंदात पडत नाही.  आणि शेरलू अण्णांच्या ऍडव्हेंचर्सच्या खुमारीत त्यामुळे फार काही फरक पडत नाहीच. 

मीही ह्या सिरीज मधील बाकी ऍडव्हेंचर्स वाचणारे. 

तुम्ही वाचल्या नसतील तर जरूर वाचा. 

ता. क. 

मी थोडं नेटवर सर्च केलं आणि ही सिरीज थोडीफार लोकप्रियता बाळगून आहे. 

तसं असल्यास छानच. लोकप्रियता अजून वाढो. 

लेखकाला आणि क्राईम-थ्रिलर जॉनरला खुप प्रेम आणि शुभेच्छा !!!

 


    

       




 



Wednesday, 2 July 2025

जारण्ण सॉरी जारण

मी शनिवारी रात्री स्विमींग केल्यावर बरेचदा युफोरिक म्हणता येईलशा आनंदी अवस्थेत असतो. 

त्याचं सविस्तर कारण सवडीने लिहीनच. 

पण ह्या शनिवारी तसंच उत्साहात ८: ३० ला पूल बाहेर पडता पडता बुक माय शो चेक केलं.  

९ चा हब मॉलला "जारण"चा शो दाखवत होता. 

अगदीच कट टू कट होतं पण सॉर्ट ऑफ उन्मादातच बुक केलं आणि रिक्षा शोधू लागलो. 

नशीबाने एका भैय्याजीने जोगेश्वरीच्या ट्रॅफिकमध्ये सुद्धा सेक्सी रिक्षा चालवून डॉट ९ ला मॉलच्या दारात टच केलं. 

त्याचे आभार!

धाकधूक करत स्क्रीनला पोचेपर्यंत ९:५ झाले पण सुरुवात बहुतेक चुकली नाही.  

सो थँक गॉड आणि सॉरी भारतमाता (जन गण चुकवल्याबद्दल)   

फार फार फार मजा आली. 

हृषीकेशच्या लिखाणाचा फॅन मी आहेच आता डायरेक्शनचा सुद्धा झालो. 

खास करून त्याची बरीच दृश्यं तुम्हाला कथेला पुढे नेणाऱ्या सच्च्या-फसव्या हिंट देऊ पहातात ते मस्तच. 

कसं ते तुम्हाला पाहूनच कळेल. 

सगळ्यांची ऍक्टिंग सुद्धा टॉप क्लास. 

अमृता लाजवाब. आमचा पिनकोड बहुतेक सेम आहे सो मी उगीचच कॉलर एक्स्ट्रा टाईट करून घेतली. 

अनिता दाते तुंबाडमध्येच आवडलेली इथेही छोट्या पण क्रिटिकल रोलमध्ये तूफान 

बाय द वे सेमी अवांतर तिच्या गेटअपला चंद्रमोहन कुलकर्णींचं हे चित्र रेफरन्स म्हणून वापरलं असावं असं मला आपलं वाटत राहिलं. 

फार आवडतं चित्रं आहे हे माझं. 

चित्रपटातले आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या धारपांचे आणि त्याहूनही लाडक्या व्यकीचे (विंक विंक) आणि तिच्या काही ऍक्शन्सचे रेफरन्सेसही चपखल. 

इंटरव्हलसुद्धा गणेश मतकरीने म्हटल्याप्रमाणे नॅरेटिव्हची गरजच असल्यासारखं अचूक वेळी येतं. 

सो समोसे खायला गिल्टी नाही वाटलं,     

तो एक्स्ट्रा n मात्र मला काही झेपला नाही. 

पण असतील काही गणितं.  

मी आपलं मनात जारण्णचं  "जारण" केलं आणि मगच पिक्चरची मजा घेतली.    

तुम्हीही जरूर घ्या.  






Friday, 28 February 2025

"कोलाहल"विषयी

निखिल घाणेकर माझा मित्र आणि फार मस्त मुलगा. 

चांगला लिहिणारा-वाचणारा, मराठी साहित्याविषयी चांगल्या अर्थाने कन्व्हिक्शन असणारा तरीही भाबड्या कल्पना ना बाळगणारा. 

त्याचं हेच कन्व्हिक्शन कोलाहल ह्या त्याच्या कादंबरीतून मिळतं. 

म्हणजे एक तर कादंबरी लिहिणं हे एक मोठ्ठं कन्व्हिक्शन आणि ती कादंबरी नेटाने वाचकांपर्यंत पोचवणं हे दुसरं मोठ्ठं कन्व्हिक्शन. सो पहिलेतर निखिलला सलाम आणि अंगठा-तिसरं-चौथं बोट मिटवत केलेली हेवी मेटलची हॉर्न साइन!

कारण ह्या दोन गोष्टींत तो बऱ्यापैकी यशस्वी झालाय असं म्हणता येईल. 

(दुसरी आवृत्ती संपली)

आता कादंबरीविषयी थोडं:

काहीतरी विचित्र योगायोगाने ही कादंबरी माझ्याकडे साधारण मे-जूनमध्ये २०२४ मध्ये आली. 

तेव्हा व्यक्तीश: मी थोडा ट्रिकी म्हणता येईल अशा मनस्थितीत होतो. 

आता कदाचित ते कादंबरीविषयी न होता निलाजरेपणे माझ्याविषयी होईल. 

बट व्हू द फक वी आर किडींग?
एव्हरीथिंग इज अबाऊट "मी ओन्ली" खरं तर. 

रिप-रिप वाले मेसेजेससुद्धा. 

स्पॉयलर वॉर्निंग:

पुढे कादंबरीविषयी स्पॉयलर्स असू शकतील सो सावधान. 

वाटल्यास कादंबरी वाचून परत इथे येऊ शकता. 

कादंबरी चांगल्या अर्थाने माईल्ड आहे. 

त्यातली (बहुतेक) पात्रं बऱ्यापैकी समंजस आहेत. म. म. व. आहेत. त्यांना खायच्या भ्रांतीसारखे मोठे प्रश्न नाहीत. 

पण हातपाय न हलवता बसून खायची श्रीमंती सोय नक्कीच नाही. 

जगण्याचे, पैसे कमावण्याचे आणि त्यासाठी लढतानाच नाती फुलवण्या-निभावण्याचे ताण ह्यात आहे. 

पण आधीच म्हटल्याप्रमाणे कादंबरीत बहुतेकवेळा माईल्ड प्लेझंटनेस आहे. 

आणि माझ्या भिरभिर मनस्थितीला असंच काहीतरी हवं होतं. 

टॉमेटो सूप सारखं फारसं विद्रोही विदारक रॅडिकल वगैरे नसणारं तरीही सुरस. 

माझी मन:स्थिती भिरभिर का होती त्याबद्दल थोडंसं. 

मागल्या वर्षी माझा जीव सखा मित्र एका अभद्र अपघातात अकाली गेला. 

कोलाहल मधल्या नायकाच्यासुद्धा एक अतिशय जवळचा थोड्या चांगल्या पण बऱ्याचश्या वाईट अँगलने वाईट अल्फा-मेल म्हणता येईल अशा मित्राचा अवचित मृत्यू झालाय आणि त्याची सावली कादंबरीभर पडत रहाते. 

माझा एक जीवा सखा मित्र वारला जो काही अल्फा वगैरे नव्हता. आणि दुसऱ्या एका सुपर डुपर अल्फा मित्राशी माझं एकमेकांची तोंडं न बघण्याइतपत ब्यक्कार वाजलेलं. 

आणि माझ्या आयुष्यातले हे दोन फार महत्वाचे पुरुष वरद (कोलाहलचा नायक) च्या मित्रात एक-मिसळ झालेले. 

त्यामुळे मला खूपच जास्त रिलेट होता आलं असं म्हणेन मी. 

कादंबरीनं मला वाचतं ठेवलं पण... 

असा खूप कोलाहल मला काही जाणवला नाही. 

नायक बहुतेक वेळा शहामृगी वृत्तीने कॉन्फ्लिक्ट टाळतो. 

तेही ठीक. ते आपलं म.म.व. डिफॉल्ट सेटींग असतं हेही मान्य. 

पण त्या शहामृगी वृत्तीनेही कथा फार पुढे किंवा मागे किंवा वळणावर जाते असं काही होत नाही. 

असं मला वाटलं. 

नायक नायिकेचं जेवणं, आईस्क्रीम खाणं, यु ट्यूब बघणं, पावभाजी-पुलावच्या च्या हार्मलेस पार्ट्या करणं 

हे थोडं रिपीटेटिव्ह होत जातं माझ्या मते. 

ते बाय डिझाईन असेल बहुतेक पण माझ्या कथे-कादंबरीकडून अपेक्षा ओल्ड स्कूल आहेत. 

त्या अपेक्षांचे वजन अर्थात माझ्याकडेच पण त्या पूर्ण झाल्या असं मी म्हणणार नाही. 

त्यात शेवटही आला. 

पण निखिलच्या प्रवाही शैलीने हे पुस्तक मी तीन-चार महिने तब्येतीत वाचलं आणि आधी सांगितल्याप्रमाणे माझ्या सटपटलेल्या मनाला सावरण्यात कोलाहलची मदत हंड्रेड पर्सेंट झाली. 

(पण मग शांतवणाऱ्या कादंबरीचं नाव कोलाहल का? सॉरी निखिल ब्रो फॉर बीइंग अ बीच हिअर :) पण निखिल तेवढा समंजस नक्की आहे) 

एकुणात कोलाहल मी जरूर रेकमेंड करेन.  

खास करून तरुणाईसाठी.  

माझ्या पर्सनल अडनिड्या कारणांपेक्षा ते नक्कीच जास्त सरळसोट रिलेट करतील. 

ब्राव्हो निखिल आणि तिसरी आवृत्ती लवकर येऊ दे. 




 

   

    




Saturday, 6 April 2024

पुस्तक परिचय: घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा

ह्या पुस्तकाविषयी बोलायचं तर आधी थोडं लेखक आशिष महाबळविषयी बोलावं लागेल. 

आणि आशिषविषयी बोलायचं तर आधी थोडं आमच्या साय-फाय कट्ट्याविषयी. 

तर ह्या साय-फाय कट्ट्यावर मराठीतले बरेच हौशी आणि अनुभवी विज्ञानकथा लेखक मंथली चॅलेंजेस वर हिरहिरीने कथा लिहितात. 

एकमेकांच्या आणि जगातील उत्कृष्ट सायन्स फिक्शन्सविषयी चर्चा करतात वगैरे. 

आशिषची आणि माझी ओळख आणि मैत्री तिथलीच. 

आता गंमत काय आहे ना की कोणत्याही जोड शब्दात बसणारी माणसं किंवा कलाकृती ह्या शब्दाच्या अल्यापल्याड ५०-५० टक्के विभागलेल्या कधीच नसतात. 

(उदाहरणार्थ सोशिओ-पॉलिटिकल,  ट्रॅजी-कॉमिक वगैरे)

ती नेहेमीच एका सायडीला जास्त किंवा बहुतेकदा बरंच जास्त वजन टाकून असतात. 

तसंच साय-फायचं ही. 

साय-फाय मला नेहेमीच एखाद्या छान कॉकटेल ड्रिंकसारखी वाटत आलीये.

म्हणजे कॉकटेलमध्ये कसं अल्कोहोल असतं आणि बाकी सरबत, सजावट वगैरे...
आता 'विज्ञान-कथे'तलं विज्ञान म्हणजे अल्कोहोल समजा आणि बाकी "काल्पनिक,
सामाजिक संदर्भ" वगैरे नॉन अल्कोहोलिक भाग.
आणि मजा काय आहे माहितीये का कॉकटेलसारखीच सायफायची सुद्धा "अल्कोहोलच्या"
बदलत्या प्रमाणानुसार असंख्य लोभस रूपं आहेत :)

हेच रूपक पुढे रेटायचं झालं तर घोस्ट रायटर मधील बहुतेक कथा कडक स्कॉच ऑन द रॉक्स सारख्या म्हणता येतील. 
काही थोडंसच थम्स-अप असलेल्या रम सारख्या 
आणि थोड्या काही लॉन्ग आयलंड आईस्ड टी वगैरेसारख्या 

Monday, 13 November 2023

सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ नावाचा अंडरडॉग

त्या दिवशी अवचित एक थोडी विंडो मिळाली रविवारी रात्री. 

"आत्मपॅम्फ्लेट" बघायचा का "सजनी..." असं चाललं होतं. 

बघायचेत तर दोन्ही. 

पण जगण्याची तारांबळ, इ एम आय, अप्रेझल रेटींग, कुटुंबातल्या कुरबुरी, चाळिशीपारच्या तब्येतीच्या तक्रारी अशा मोठ मोठ्या भूतांशी लढताना "वेळ" ही फर्स्ट वर्ल्ड कमोडिटी होऊन जाते आणि काही सारख्याच वजनाच्या नितांत रेकमेन्डेड गोष्टींसाठी सोफी'ज चॉईस वापरावाच लागतो. 

तर सजनी जिंकला कारण दिग्दर्शक मिखिलची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्याची आई मुसळे काकू ह्या आमच्या शेजारी.

(भारी गोड कुटुंब!!!)  

त्यामुळे हा पिक्चर थोडा घरचाच समजतो मी आणि बायको. 

सो आत्मपॅम्फ्लेट सॉरी भाई भेटू लवकरच. थिएटरला नाही तर ओ टी टी ला _/\_

तर सजनी...

ह्याची मला पात्रं, कथा आणि ट्रीटमेंट (प्रॉडक्शन ? डिझाईन??) हे तिन्ही फार फार आवडलं. 

कमीत कमी स्पॉयलर्स देत ह्या तिन्ही गोष्टींविषयी लिहायचा सायास करतो. 

अर्थात ह्या तिन्ही गोष्टी लव्ह सेक्स आणि धोखा सारख्या एकमेकांत उडक्या मारणारच. 

ते जरा ऍडजस्ट मारा. 

पात्रं:  

राधिका मदन हा कडक अभिनयाचा (छोटा) ऍटमबॉम्ब "मर्द को कभी दर्द नही होता" पासूनच आवडलेला.

मग "रे" मध्ये तर तिच्या राधे माँ चा हार्डकोअर फॅन झालेलो. 

("कुत्ते" मात्र वाईट होता पण तो तिचा दोष नव्हे)    

इकडेही तिनं परफेक्ट उचलेला पुण्यात पी. जी राहणाऱ्या नगरच्या मराठमोळ्या मुलीचं बेअरिंग खास. 

अशा लहान गावातून पुण्यात आलेल्या मराठी मुलींमध्ये बोल्डपणा, व्हल्नरेबिलीटी, स्ट्रीट स्मार्टगिरी, आणि परंपराशरणता ह्याचं फार फार डेडली मिश्रण असतं. 

(आणि अशा काही एक मुलींना मी काहीएक मर्यादेपर्यंत दुखवलंय आणि दुखवून घेतलंय सुद्धा.) 

त्यांचा तोच बोल्डपणा + व्हल्नरेबिलीटी + स्ट्रीट स्मार्टगिरी + परंपराशरणता ह्या मूव्हीच्या मेन इव्हेंटला, जो एक व्हायरल व्हिडीओ आहे त्याला कारणीभूत होतो. 

हे नावातच असल्यामुळे हा स्पॉयलर नव्हे.

त्या व्हायरल व्हिडीओने कोणाचातरी जीव जातो आणि, 

मग व्हू डन इट, व्हाय व्हू डन इट आणि हाऊ व्हू डन इटच्या शक्यतांचा रशियन रोले धूर्तपणे गरागरा फिरत राहतो. 

तपासकाम करणाऱ्या इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये डूबर-मन मॅम निम्रत कौर अर्थातच क्लास.

ह्या ताईसुद्धा लंच-बॉक्सपासूनच आवडत्या. 

बाय अँड लार्ज मराठी लोकांच्या आणि मराठी सेटअपच्या ह्या बॉलीवूड सिनेमात तिचं असणं बाय डिझाईन आहे. 

निम्रत कौर ऍज ऍन ऍक्टर आणि आतलं पात्र सुद्धा परप्रांतीय असणं ह्याची एक खास गम्मत आहे.  

ती ज्या काही आत्मविश्वासाने "कंठाळी सन ऑफ द सॉइल्स"ची टेबलं अलगद उलथवते ते पडद्यावरच बघा.

आता अर्थातच आपले नेहेमीचे यशस्वी मराठी कलाकार जे ह्या चित्रपटात अजिबातच बिनचूक शाईन करायचं थांबत नाहीत. 

तसंही मेन हिरो इन्स्पेक्टरच्या विश्वासू सपोर्टींग पार्टनरचा पार्ट म्हणजे आपल्या गुणी मराठी ऍक्टर्सचं घट्ट होम पीच झालंय.  

मला वाटतं सेक्रेड गेम्सपासून. 

इकडेही त्या रोलमध्ये आपला चिन्मय मांडलेकर फ्लॉ-लेसच.

बाकी सुबोध भावे, अक्षय टंकसाळे, आणि इतर बरेच मराठी लोक्स अर्थातच रॉकींग. 

भाग्यश्री मला आधी थोडी "जड" किंवा "लॉस्ट" वाटली पण नंतर नंतर शेवटाकडे तिचंही इंजिन गरम होत जातं. 

आशुतोष गायकवाडही सजनीच्या भावाच्या रोल मध्ये फार मस्त.

ह्या फ्रेश चेहेऱ्याला मी नक्कीच फॉलो करेन.  

पण मला सगळ्यात आवडलाय तो सजनीचा फियान्से (प्लेड बाय सोहम मुजुमदार)

थोडे जास्त स्पॉयलर्स येथे आहेत. 
>>>    

असा हार्मलेस वाटणारा, चष्म्याआड लुकलुकते डोळे असणारा पण सगळ्यात खंगरी आणि चालू मित्र आपण सगळ्या ग्रुप्समध्ये बघतोच. 

इकडे त्याचं बेरकी पॅसिव्ह ऍग्रेसिव्ह होत फियान्सेला मांजर उंदरासारखं खेळवणं, 

व्हल्नरेबल ते थंड क्लिनिकल आय टी. वाला ह्या दोन टोकांत आंदोळत रहाणं,

मॉडर्न नवतरुण म्हणता म्हणता मांजरीच्या नख्यांसारखं अलगद नकळत शॉव्हनिझम परजणं . 

हे सगळं फार फार कसबीपणे उतरलंय ह्या पात्राकडून.  
>>>

स्पॉयलर समाप्त 

त्याचा टी. व्ही इंटरव्ह्यूचा सीन खास. 

ट्रीटमेन्ट:

पुणे हेही जवळ जवळ एक पात्र म्हणूनच येतं ह्या मुव्हीत. 

मार्झोरीन, मध्यवर्ती पुण्यातली स्वस्तातली पी. जी. देणारी जुनी घरं, नाट्यमंदिरं, प्रसिद्ध ऍटिट्यूडवाल्या खानावळी, चाळीस एक मैलावरची टेमघर डॅम सारखी स्थळं. 

ही  सर्व लोकेशन्स फारच ओळखीची असल्यामुळे बघायला मजा आली. 

पुणेरी अपमान, पुणेरी गुंठा मंत्री स्टाईल गुंडगिरी, आणि निनिर्विष सेन्स ऑफ ह्युमर हे सर्व डायलॉग्ज आणि सीन्स मधून येत रहातं. 

इथंही कडक पोळ्यांविषयीचा एक विनोद पुढे होणाऱ्या घटनेची अभद्र चाहूल देत जीव घाबडवून टाकतो.          

कथा:

चांगली कथा हा अर्थातच चित्रपटाचा गाभा असतो. 

आजकाल बरेच चित्रपट कुठल्या तरी स्पॅनिश / युरोपिअन चित्रपटातून उत्तम कथा अधिकृतरीत्या उचलतात आणि तिला देशी अंगडं टोपडं चढवतात.  

तेही ठीकच. 

पण जेव्हा खास आपल्या मुळांतली, फ्रेश, पहिल्या धारेची, वर्जिनल कथा जेव्हा आपण शून्यातून बनवतो 

तेव्हा तिची ऐट वेगळीच असते. 

(इथे "रेगे"ची आठवण काढल्याशिवाय राहवत नाहीये, "लंचबॉक्स" आणि "मसान"सुद्धा)

"सजनी..."चा मला वाटते दिग्दर्शकही सहलेखक आहे.

लेखकांच्या टीमला खास मिठ्या आणि पाप्या. 

कथा सांगण्याचा वेडेपण अर्थातच मी करणार नाहीये. 

पण नॉन लिनिअर शैली, भयाण सिच्युएशनमधले ऍब्सर्ड विनोद, प्रत्येकाचे आपापले अजेंडे असणं (थोडंसं "अग्ली" सारखं),
हे सगळं इकडे एकमेकांत चपखल बसतं. 

आपली कॅन्सल कल्चरची मानसिकता, प्रत्येक गोष्टं व्हिडिओत शूट करायची वेडी-बिद्री असोशी, मिडीया वापरून जनमत मॅनिप्युलेट करता येणं, परंपराशरणता ह्या सगळ्यावर फार फार बोचऱ्या पध्दतीने हा पिक्चर टिपणी करतो. 

आणि फार फार फार रंजक पद्धतीने. 

जरूर बघा. 

माझ्या अक्षम्य आळशीपणाने हा नॉन-रिव्ह्यू येईस्तोवर हा छोटूला मूव्ही थेटरांतून उतरलाय. 

पण ओ. टी. टी. वर लवकरच येईल तिकडे लक्ष ठेवा. 


- नील आर्ते (डायरेक्टरचा प्राऊड शेजारी) 


        

   


   

  

  

  


     

 




 

Thursday, 14 September 2023

बॉम्ब देम

मी ब्लेन्डर्स प्राईडचा एक हलका सिप मारला, चार बॉईल्ड चणे तोंडात टाकले आणि गंमतीत सभोवार नजर टाकली,

मला आमच्या वांद्रे पूर्वच्या उजाला किंवा खरंतर उपनगरातल्या कोणत्याही मध्यममार्गी बारमधील शनिवार संध्याकाळ फारच आवडते. 

एक वेगळीच व्हाइब असते शनवारी आणि वीकेण्ड असूनही ती मजा शुक्रवारी किंवा रविवारी रात्री नसतेच नसते. 

रविवार तर पुढच्या खूनी मंडेच्या चाहुलीने थोडा डागाळलेलाच असतो.

आणि शुक्रवारसुद्धा आधीच्या पाच दिवसांच्या धबडग्यातून पुरेसा फ्री झालेला नसतो. 

पण शनवार रात्र मात्र छान असते... परफेक्ट... २८ च्या पुष्ट बाईसारखी!

मला ड्रिंक्सचं एवढं काही तूफान आकर्षणही नाहीये मी उजालामध्ये ही शनवार रात्रीची आनंदी गर्दी बघायला येतो खरंतर. 

बहुतेक सगळेजण तावातावानी बोलत असतात. काही सुम्मसुद्धा असतात. 

मध्येच ओळखीच्या टेबलावर जाऊन हात मिळवतात, पाठीत थापा मारतात. 

सिगारेट्स, ओल्ड मॉंक, चिकन चिली आणि आनंदाचा एक संमिश्र वास भरून राह्यलेला असतो आख्ख्या बारमध्ये. 

फार छान वाटतं मला हे सगळं. 

लॉलीपॉपसारखं मनातल्या मनात चोखत राहतो मी हा माहौल. 

आख्ख्या विश्वातल्या पुरुषजातीचा एकच मॅस्क्युलाइन गोळा बनलाय आणि त्याचा मी एक छोटासा आनंदी कण झालोय असं काही बाही वाटत राहतं मला. 

त्या खुशीतच मी अजून एक मोठ्ठा सिप मारला. 

पण थांबा! वरचं ते मॅस्क्युलाइन गोळ्याचं वाक्य खोडावं लागेल मला बहुतेक. 

अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या बाजूच्या टेबलावर चक्क एक मुलगी बसलीय. 

आता अर्थातच मुंबईसारख्या कॉस्मो ठिकाणी क्वार्टर बारमध्ये पोरगी दिसणं दुर्मिळ असलं तरी अब्रह्मण्यम किंवा अशक्य नक्कीच नाही... 

पण मग आधी का नोटीस झाली नाही ही?

माझा दुसरा छोटा चालू होता आणि मी तसाही स्लो ड्रिंकर आहे. 

आधीच तुम्हाला सांगीतल्याप्रमाणे माहौलसाठी पितो मी. 

ती लोकांची गडबड बडबड मचमच, चकली आणि शेझवान सॉस, 

ती शेट्टी बारमधली राखाडी योकची उकडलेली अंडी. 

"ही अशी योकची ग्रे शेड फक्त शेट्टी बारमध्येच दिसते. कशी कोण जाणे?"

च्यायला माझ्या मनातलंच वाक्य ती पोरगी मोठ्ठ्यानं बोलत होती? मी थोडा अचंबलो. 

पण प्रतिक्षिप्त क्रियेनी माझ्या तोंडून निघून गेलं,

"हो ना घरी बॉईल केलेला योक पिवळा असतो."

"असेल आहार असोसिएशनचं काहीतरी ट्रेड सिक्रेट", ती हलकेच हसत बोलली. 

ती बाजूच्या टेबलावर अर्धवट काटकोनात वळून माझ्याशी बोलत होती. 

मी तिला थोडं नीट बघितलं आणि मला दोन गोष्टीत सट्टकन आठवल्या,

एक: अनंत सामंतांच्या टॅप देम कथेतल्या मिसेस तारकुंडे 

आणि 

दोन: प्री-डेस्टिनेशन मूव्हीमधली जॉन / जेन