Sunday, 31 August 2014

आख्तुंग ५ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

पाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर १४ वर्षं ११ महिने २७ दिवसांनी: १५ नोव्हेंबर २०२८
संकेत चक्रदेवांच्या घरी एक छोटीशी मीटिंग भरली होती:
गम्बादादा भोसले: "चक्रदेव दादा, नवीन "मावशी" आनलिय आपल्या रशियन दोस्तांकडून ज्यास्त रेंजची आख्तुंग बाबासाठी!
मार्केटमदी तीन किलोमीटरच्या वरची रेंज नाय मिळणार तुमाला पण ही एकदम लेटेष्ट हाय!
६ किलोमीटर वरचा डाव आरामात मोड्तीय!
तुमच्यासाठी काय पन!" 

चक्रदेव: "थॅन्क्स गम्बा! पण अंतर जास्त आहे रे... सी लिंक वरून शॉट घेतला तर किंवा होडीवरून?"

गम्बादादा: "नाय सी लिंक वर गाडी थांबवायला अलाउट नाय, बंद पडल्याचं नाटक केलं तरी लगेच आर.  टी.  ओ. वाले धावत यितील सोन्शय यील आनि हूडी लयच डूचमळणार"

चक्रदेव: "आख्तुंग बाळा जमेल इतक्या लांबचा शॉट तुला?
मला माहितीये रे तुझ्यासाठी पण हे अंतर जास्तच आहे… पण वेळ कमी आहे आपल्याकडे. 
अंकुश शिर्के सावध झालाय दादा शिर्के आणि बाबाच्या गेममुळे… पुढच्या आठवड्यात गाशा गुंडाळून तो दुबईला पळतोय अशी नक्की खबर आहे. मग सगळं आणखीच अवघड होईल." 

आख्तुंग खळ्या पडत हसला… हसला की त्याची बुब्बुळं अगदी बारीक व्हायची… मांजरासारखी!
"मामा मी चार किलोमीटरवर प्रॅक्टिस केलीये गम्बादादाच्या नवीन "मावशी"ने!
टार्गेटला थोडा प्रॉब्लेम होतोय पण ठसठशीत लाल रंग असेल तर शॉट घेईन मी!"

महुआ:
"हो म्हणूनच मी त्याला लाल शर्ट गिफ्ट करतेय आणि अक्खी रूम त्याच्या वाढदिवसासाठी व्हाईट रंगात सजवतेय. सो खिडकीत एकच लाल गोष्ट असेल… अंकुश!  तू बिनधास्त शॉट घे. 

आख्तुंग:
"ए महू तू त्या दिवशी लाल लिपस्टिक लावू नको हां, हवंय तर पिवळी वगैरे लाव मस्त दिसशील!"

महुआनी टी व्ही चा रिमोट आख्तुंगला फेकून मारला. 

आख्तुंगने त्याचा पेटंट शेर मारला:
"हाय उन्हे हमारे प्यारपे घुस्सा आता है… और हमे उनके घुस्सेपे… प्यार!"
मग नेहमी प्रमाणे महुआ आणि आख्तुंगची मारामारी चालू झाली!

चक्रदेवांनी दोघांना कष्टाने वेगळं केलं!
"बरं शॉट झाला रे झाला की मी पोलिसांना निनावी फोन मारेन!
'गोळीबार झालाय' म्हणून!
पोलीसांची काळजी नको त्यांच्या दृष्टीने तू फक्त अंकुशचं 'नवीन पाखरू' असशील!
चलो… ऑल दी बेस्ट… टू ऑल ऑफ अस!"
-------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
-नील आर्ते 

No comments:

Post a Comment