तुम्हाला कधी असं झालंय? म्हणजे आपण एखादा यम्मी पिक्चर (किंवा नाटक किंवा पुस्तक वगैरे) उगीचच वेळ काढूपणा करत ताजा ताजा गरम असताना बघत नाही.(पुणुलेच्या भाषेत मा sssssss ज)...
आणि मग सवडीने अवचित कधीतरी बघुन झाल्यावर वाटतं...अरे यार इतके दिवस आपण का टाइमपास करत होतो? कसे राहिलो याच्याशिवाय?? कसे जगत होतो?? इ. इ.
(म्हणजे तसं रियलायझेशन मला अंमळ उशीरा ड्रायव्हिंग शिकल्यावरही झालं होतं आणि, तब्बल दहा वर्षांनी हॅरी पॉटर वाचल्यावर सुद्धा).
सो...साई सुट्ट्यो!!! :)

प्रत्येक गोष्टीचा टाईम यावा लागतो हेच खरं.
मुदलात 'माकडाच्या हाती शॅम्पेन' बघू बघू म्हणत राहून गेलेलं...
एकतर मला हटके नाववाल्या 'प्रोटॅगॉनिस्ट्स्'चं भारी फॅसिनेशन...
आणि इकडे तर काय पुस्तक, पेन्सील, चाकू, माकड, काकडी वगैरे...हैदोसच सगळा!
पण फायनली "बदाम राणी गुलाम चोर" बघितला आणि मी काय मिस करत होतो ते कळलं!
आणि इकडे तर काय पुस्तक, पेन्सील, चाकू, माकड, काकडी वगैरे...हैदोसच सगळा!
त्यांची ती फाड-फाड विधानं, दुहेरी लेयर्स वर चालणारा प्लॉट,
आणि रिलेशनशिप्सचा लख्ख आरसा दाखवणारे अफाट सीन्स...मस्तच.
बरेच जण म्हणतात त्या प्रमाणे ती डॉ. विवेक बेळेन्च्या नाटकाचीच मूळ जादू असेल कदाचित,
पण पुस्तक-पेन्सिल च्या रंगीत सीन मधले ब्लॅक अॅन्ड व्हाईट चाकू आणि माकड,
"ह्यो पायजे का तुला त्यो पायजे" चा साउंडट्रॅक इ. नक्कीच सिनेमाध्यमाचे बोनस!
शिवाय क्लोज-अप्स ची सोय असल्याने पुष्कर, उपेंद्र, मुक्ता, आनंद सगळ्यांनाच फटकेबाजीला फुल्ल स्कोप!
उदाहरणार्थ पानवाल्याकडून मोड घेण्याचा सीन...तुफान!
एकंदरीत काय जलसाच...
मागे मी लेडी इन द वॉटर"...च्या निमित्ताने सिनेमावर न लिहीण्याविषयी बोललेलो,
पण 'पेन्सिल' बाइंनी म्हणूनच ठेवलयना, "मी भूतकाळात केलेल्या विधानांची कोणतीही जबाबदारी भविष्यात घेत नाही"सो...साई सुट्ट्यो!!! :)
नोट्स टू मायसेल्फ: "काटकोन त्रिकोण" बघणे...प्रॉन्टो!
-नील आर्ते