Monday 13 November 2023

सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ नावाचा अंडरडॉग

त्या दिवशी अवचित एक थोडी विंडो मिळाली रविवारी रात्री. 

"आत्मपॅम्फ्लेट" बघायचा का "सजनी..." असं चाललं होतं. 

बघायचेत तर दोन्ही. 

पण जगण्याची तारांबळ, इ एम आय, अप्रेझल रेटींग, कुटुंबातल्या कुरबुरी, चाळिशीपारच्या तब्येतीच्या तक्रारी अशा मोठ मोठ्या भूतांशी लढताना "वेळ" ही फर्स्ट वर्ल्ड कमोडिटी होऊन जाते आणि काही सारख्याच वजनाच्या नितांत रेकमेन्डेड गोष्टींसाठी सोफी'ज चॉईस वापरावाच लागतो. 

तर सजनी जिंकला कारण दिग्दर्शक मिखिलची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्याची आई मुसळे काकू ह्या आमच्या शेजारी.

(भारी गोड कुटुंब!!!)  

त्यामुळे हा पिक्चर थोडा घरचाच समजतो मी आणि बायको. 

सो आत्मपॅम्फ्लेट सॉरी भाई भेटू लवकरच. थिएटरला नाही तर ओ टी टी ला _/\_

तर सजनी...

ह्याची मला पात्रं, कथा आणि ट्रीटमेंट (प्रॉडक्शन ? डिझाईन??) हे तिन्ही फार फार आवडलं. 

कमीत कमी स्पॉयलर्स देत ह्या तिन्ही गोष्टींविषयी लिहायचा सायास करतो. 

अर्थात ह्या तिन्ही गोष्टी लव्ह सेक्स आणि धोखा सारख्या एकमेकांत उडक्या मारणारच. 

ते जरा ऍडजस्ट मारा. 

पात्रं:  

राधिका मदन हा कडक अभिनयाचा (छोटा) ऍटमबॉम्ब "मर्द को कभी दर्द नही होता" पासूनच आवडलेला.

मग "रे" मध्ये तर तिच्या राधे माँ चा हार्डकोअर फॅन झालेलो. 

("कुत्ते" मात्र वाईट होता पण तो तिचा दोष नव्हे)    

इकडेही तिनं परफेक्ट उचलेला पुण्यात पी. जी राहणाऱ्या नगरच्या मराठमोळ्या मुलीचं बेअरिंग खास. 

अशा लहान गावातून पुण्यात आलेल्या मराठी मुलींमध्ये बोल्डपणा, व्हल्नरेबिलीटी, स्ट्रीट स्मार्टगिरी, आणि परंपराशरणता ह्याचं फार फार डेडली मिश्रण असतं. 

(आणि अशा काही एक मुलींना मी काहीएक मर्यादेपर्यंत दुखवलंय आणि दुखवून घेतलंय सुद्धा.) 

त्यांचा तोच बोल्डपणा + व्हल्नरेबिलीटी + स्ट्रीट स्मार्टगिरी + परंपराशरणता ह्या मूव्हीच्या मेन इव्हेंटला, जो एक व्हायरल व्हिडीओ आहे त्याला कारणीभूत होतो. 

हे नावातच असल्यामुळे हा स्पॉयलर नव्हे.

त्या व्हायरल व्हिडीओने कोणाचातरी जीव जातो आणि, 

मग व्हू डन इट, व्हाय व्हू डन इट आणि हाऊ व्हू डन इटच्या शक्यतांचा रशियन रोले धूर्तपणे गरागरा फिरत राहतो. 

तपासकाम करणाऱ्या इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये डूबर-मन मॅम निम्रत कौर अर्थातच क्लास.

ह्या ताईसुद्धा लंच-बॉक्सपासूनच आवडत्या. 

बाय अँड लार्ज मराठी लोकांच्या आणि मराठी सेटअपच्या ह्या बॉलीवूड सिनेमात तिचं असणं बाय डिझाईन आहे. 

निम्रत कौर ऍज ऍन ऍक्टर आणि आतलं पात्र सुद्धा परप्रांतीय असणं ह्याची एक खास गम्मत आहे.  

ती ज्या काही आत्मविश्वासाने "कंठाळी सन ऑफ द सॉइल्स"ची टेबलं अलगद उलथवते ते पडद्यावरच बघा.

आता अर्थातच आपले नेहेमीचे यशस्वी मराठी कलाकार जे ह्या चित्रपटात अजिबातच बिनचूक शाईन करायचं थांबत नाहीत. 

तसंही मेन हिरो इन्स्पेक्टरच्या विश्वासू सपोर्टींग पार्टनरचा पार्ट म्हणजे आपल्या गुणी मराठी ऍक्टर्सचं घट्ट होम पीच झालंय.  

मला वाटतं सेक्रेड गेम्सपासून. 

इकडेही त्या रोलमध्ये आपला चिन्मय मांडलेकर फ्लॉ-लेसच.

बाकी सुबोध भावे, अक्षय टंकसाळे, आणि इतर बरेच मराठी लोक्स अर्थातच रॉकींग. 

भाग्यश्री मला आधी थोडी "जड" किंवा "लॉस्ट" वाटली पण नंतर नंतर शेवटाकडे तिचंही इंजिन गरम होत जातं. 

आशुतोष गायकवाडही सजनीच्या भावाच्या रोल मध्ये फार मस्त.

ह्या फ्रेश चेहेऱ्याला मी नक्कीच फॉलो करेन.  

पण मला सगळ्यात आवडलाय तो सजनीचा फियान्से (प्लेड बाय सोहम मुजुमदार)

थोडे जास्त स्पॉयलर्स येथे आहेत. 
>>>    

असा हार्मलेस वाटणारा, चष्म्याआड लुकलुकते डोळे असणारा पण सगळ्यात खंगरी आणि चालू मित्र आपण सगळ्या ग्रुप्समध्ये बघतोच. 

इकडे त्याचं बेरकी पॅसिव्ह ऍग्रेसिव्ह होत फियान्सेला मांजर उंदरासारखं खेळवणं, 

व्हल्नरेबल ते थंड क्लिनिकल आय टी. वाला ह्या दोन टोकांत आंदोळत रहाणं,

मॉडर्न नवतरुण म्हणता म्हणता मांजरीच्या नख्यांसारखं अलगद नकळत शॉव्हनिझम परजणं . 

हे सगळं फार फार कसबीपणे उतरलंय ह्या पात्राकडून.  
>>>

स्पॉयलर समाप्त 

त्याचा टी. व्ही इंटरव्ह्यूचा सीन खास. 

ट्रीटमेन्ट:

पुणे हेही जवळ जवळ एक पात्र म्हणूनच येतं ह्या मुव्हीत. 

मार्झोरीन, मध्यवर्ती पुण्यातली स्वस्तातली पी. जी. देणारी जुनी घरं, नाट्यमंदिरं, प्रसिद्ध ऍटिट्यूडवाल्या खानावळी, चाळीस एक मैलावरची टेमघर डॅम सारखी स्थळं. 

ही  सर्व लोकेशन्स फारच ओळखीची असल्यामुळे बघायला मजा आली. 

पुणेरी अपमान, पुणेरी गुंठा मंत्री स्टाईल गुंडगिरी, आणि निनिर्विष सेन्स ऑफ ह्युमर हे सर्व डायलॉग्ज आणि सीन्स मधून येत रहातं. 

इथंही कडक पोळ्यांविषयीचा एक विनोद पुढे होणाऱ्या घटनेची अभद्र चाहूल देत जीव घाबडवून टाकतो.          

कथा:

चांगली कथा हा अर्थातच चित्रपटाचा गाभा असतो. 

आजकाल बरेच चित्रपट कुठल्या तरी स्पॅनिश / युरोपिअन चित्रपटातून उत्तम कथा अधिकृतरीत्या उचलतात आणि तिला देशी अंगडं टोपडं चढवतात.  

तेही ठीकच. 

पण जेव्हा खास आपल्या मुळांतली, फ्रेश, पहिल्या धारेची, वर्जिनल कथा जेव्हा आपण शून्यातून बनवतो 

तेव्हा तिची ऐट वेगळीच असते. 

(इथे "रेगे"ची आठवण काढल्याशिवाय राहवत नाहीये, "लंचबॉक्स" आणि "मसान"सुद्धा)

"सजनी..."चा मला वाटते दिग्दर्शकही सहलेखक आहे.

लेखकांच्या टीमला खास मिठ्या आणि पाप्या. 

कथा सांगण्याचा वेडेपण अर्थातच मी करणार नाहीये. 

पण नॉन लिनिअर शैली, भयाण सिच्युएशनमधले ऍब्सर्ड विनोद, प्रत्येकाचे आपापले अजेंडे असणं (थोडंसं "अग्ली" सारखं),
हे सगळं इकडे एकमेकांत चपखल बसतं. 

आपली कॅन्सल कल्चरची मानसिकता, प्रत्येक गोष्टं व्हिडिओत शूट करायची वेडी-बिद्री असोशी, मिडीया वापरून जनमत मॅनिप्युलेट करता येणं, परंपराशरणता ह्या सगळ्यावर फार फार बोचऱ्या पध्दतीने हा पिक्चर टिपणी करतो. 

आणि फार फार फार रंजक पद्धतीने. 

जरूर बघा. 

माझ्या अक्षम्य आळशीपणाने हा नॉन-रिव्ह्यू येईस्तोवर हा छोटूला मूव्ही थेटरांतून उतरलाय. 

पण ओ. टी. टी. वर लवकरच येईल तिकडे लक्ष ठेवा. 


- नील आर्ते (डायरेक्टरचा प्राऊड शेजारी) 


        

   


   

  

  

  


     

 




 

Thursday 14 September 2023

बॉम्ब देम

मी ब्लेन्डर्स प्राईडचा एक हलका सिप मारला, चार बॉईल्ड चणे तोंडात टाकले आणि गंमतीत सभोवार नजर टाकली,

मला आमच्या वांद्रे पूर्वच्या उजाला किंवा खरंतर उपनगरातल्या कोणत्याही मध्यममार्गी बारमधील शनिवार संध्याकाळ फारच आवडते. 

एक वेगळीच व्हाइब असते शनवारी आणि वीकेण्ड असूनही ती मजा शुक्रवारी किंवा रविवारी रात्री नसतेच नसते. 

रविवार तर पुढच्या खूनी मंडेच्या चाहुलीने थोडा डागाळलेलाच असतो.

आणि शुक्रवारसुद्धा आधीच्या पाच दिवसांच्या धबडग्यातून पुरेसा फ्री झालेला नसतो. 

पण शनवार रात्र मात्र छान असते... परफेक्ट... २८ च्या पुष्ट बाईसारखी!

मला ड्रिंक्सचं एवढं काही तूफान आकर्षणही नाहीये मी उजालामध्ये ही शनवार रात्रीची आनंदी गर्दी बघायला येतो खरंतर. 

बहुतेक सगळेजण तावातावानी बोलत असतात. काही सुम्मसुद्धा असतात. 

मध्येच ओळखीच्या टेबलावर जाऊन हात मिळवतात, पाठीत थापा मारतात. 

सिगारेट्स, ओल्ड मॉंक, चिकन चिली आणि आनंदाचा एक संमिश्र वास भरून राह्यलेला असतो आख्ख्या बारमध्ये. 

फार छान वाटतं मला हे सगळं. 

लॉलीपॉपसारखं मनातल्या मनात चोखत राहतो मी हा माहौल. 

आख्ख्या विश्वातल्या पुरुषजातीचा एकच मॅस्क्युलाइन गोळा बनलाय आणि त्याचा मी एक छोटासा आनंदी कण झालोय असं काही बाही वाटत राहतं मला. 

त्या खुशीतच मी अजून एक मोठ्ठा सिप मारला. 

पण थांबा! वरचं ते मॅस्क्युलाइन गोळ्याचं वाक्य खोडावं लागेल मला बहुतेक. 

अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या बाजूच्या टेबलावर चक्क एक मुलगी बसलीय. 

आता अर्थातच मुंबईसारख्या कॉस्मो ठिकाणी क्वार्टर बारमध्ये पोरगी दिसणं दुर्मिळ असलं तरी अब्रह्मण्यम किंवा अशक्य नक्कीच नाही... 

पण मग आधी का नोटीस झाली नाही ही?

माझा दुसरा छोटा चालू होता आणि मी तसाही स्लो ड्रिंकर आहे. 

आधीच तुम्हाला सांगीतल्याप्रमाणे माहौलसाठी पितो मी. 

ती लोकांची गडबड बडबड मचमच, चकली आणि शेझवान सॉस, 

ती शेट्टी बारमधली राखाडी योकची उकडलेली अंडी. 

"ही अशी योकची ग्रे शेड फक्त शेट्टी बारमध्येच दिसते. कशी कोण जाणे?"

च्यायला माझ्या मनातलंच वाक्य ती पोरगी मोठ्ठ्यानं बोलत होती? मी थोडा अचंबलो. 

पण प्रतिक्षिप्त क्रियेनी माझ्या तोंडून निघून गेलं,

"हो ना घरी बॉईल केलेला योक पिवळा असतो."

"असेल आहार असोसिएशनचं काहीतरी ट्रेड सिक्रेट", ती हलकेच हसत बोलली. 

ती बाजूच्या टेबलावर अर्धवट काटकोनात वळून माझ्याशी बोलत होती. 

मी तिला थोडं नीट बघितलं आणि मला दोन गोष्टीत सट्टकन आठवल्या,

एक: अनंत सामंतांच्या टॅप देम कथेतल्या मिसेस तारकुंडे 

आणि 

दोन: प्री-डेस्टिनेशन मूव्हीमधली जॉन / जेन

Monday 14 August 2023

(देह-फुलं: ७) लँडींग

त्यानं तिच्या बुझम्समध्ये डोकं घुसळलं. 

डोकं दाबत दाबत आणखी आत आत जाऊ दिलं. 

तिनं आळसावलेले डोळे उघडत ऊं ऊं SSS करत फारसं एन्करेजमेंट नसलं तरी विरोध नक्कीच नसल्याचा सिग्नल देत त्याला एक पापी घेऊ दिली. 

त्यानं तिच्या सुती जुनाट अशक्य कम्फर्टेबल पजामात मागून हात घालत हलकेच दाबलं आणि तो पुटपुटला... 

चांद्रयान पण असंच लँड होऊ देत यार!

मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट!!