आपला राजेंद्रनाथ उर्फ पोपटलाल कुठल्यातरी पिक्चरमध्ये (गुमनाम बहुतेक) हिरॉइनीला ''भयानक सुंदर' म्हणतो तेव्हा गडगडून हसलेलो... पण आज मात्र असं काही खरंच असतं याची खात्री पटायलोय!
पाऊलवाटेवर चालता चालता त्याला जग्याने स्पॉट केलान… ह्या मालवणी लोकांची नजर म्हणजे…(मला आधी न दिसल्याबद्दल नेहमीप्रमाणे वैषम्य वगैरे वाटलेलं).
कसला देखणा होता तो! आफ्रिकन योद्ध्यासारखा…
तस्साच कॅमाफ्लॉजमधे लपलेला… सावध तल्लख आणि रुथलेस.
गोंडस वगैरे अजिबात नसेलला!
त्याचं ते मोहॉकवालं डोकं, रागीट डोळे आणि डोक्यावरचं पिवळं पाईपिंग… आम्ही खिळून राह्यलेलो!
आणि मग रागावून त्यानं डौलदार बॅक फ्लिप मारली आणि अजून आत लपला!
नाकतोडे-सिंग राजपूत, प्राण्यांच्या ३०० मध्ये तुम्हाला किंग लिओनिडसचा रोल दिला असता आपण… १०१ टक्के!!!