Sunday, 5 May 2019

सध्या...

सवतो मी तुला मानाने माझ्या सिंगल काट्याच्या थ्रोनवर.
खेळतो लुटपुट लढाई तुझ्या वत्सल विशाल थॅनोसशी.
मधल्या बोटानी तुझ्या चिंब लोकशाहीला मतदान करतो.
आणि...
शनिवारच्या तप्त दुपारी लिंचिंगविरहीत राज्याची क्लांत स्वप्नं बघत असतानाच माझा एंडगेम होतो.


-नील आर्ते