दोस्तांनो तुम्ही कधी त्या "अंधाराची चव" नावाच्या हॉटेलात गेलतात का?
आपल्या टुमदार पेन्शनर शहरात ते चालू झालं तेव्हा प्रचन्ड हाइप झालं होतं आठवतंय?
म्हणजे त्यांचा मेन सेलींग पॉईंट होता की ते आपल्या गिऱ्हाईकांना चक्क आंधळेपणाचा तात्पुरता आणि थरारक अनुभव देऊ करायचे वगैरे...
आयडीया तशी सिम्पल होती त्यांची, की रेस्टॊरंटमध्ये शिरताना तुम्ही तुमचे फोन्स, लॅपटॉप्स वगैरे डिजिटल लळालोम्बा बाहेरच ठेवून आत जायचं...
कम्प्लीट काळ्याशार अंधारात.
त्यांचा स्टाफ तुम्हाला हाताला धरून घेउन जाणार...
आणि तेव्हाच माझ्या लक्षात आली ग्यानबाची मेख:

बसायला मदत करणार...
तुमची जी पण काय ऑर्डर असेल ती बनवणार...
जेवण सर्व्ह करणार...
सगळ काही किर्र-मिच्च अंधारात!
सगळ काही किर्र-मिच्च अंधारात!
तुमचं ते अंधार-जेवण झालं आणि बडीशेप-बिडीशेप चघळत तुम्ही लख्ख प्रकाशात बाहेर आलात की मग ते तुम्हाला सांगायचे की,
हॉटेलचा आख्खा स्टाफ: वेटर्स, ऑर्डर घेणारा कॅप्टन, मॅनेजर आणि शेफसुद्धा सगळे अंध आहेत खरोखरचे!
म्हणजे आयडीया तशी मुदलात चांगली होती पण या सगळ्यात एक मेजर उणीव होती...
म्हणूनच बहुतेक त्या हॉटेलनं फारसं न चालता मान टाकली...
आणि मग मी...
पण थांबा!
पहिल्यांदा तुम्हाला मी थोडीशी बॅकग्राउंड सांगतो:
मी एक प्रचंड टॅलंटेड (असं लोक म्हणतात) शेफ आहे.
पण माझा बाप फुलटू अंडरवर्ल्ड टच होता.
एका क्षणी त्याला कायतरी उपरती झाली आणि सगळे वाईट धंदे सोडून तो माफीचा साक्षीदार बनला.
अर्थात अंडरवर्ल्ड म्हणजे काय तुमचं नेटफ्लिक्स सब्स्क्रिप्शन नाय की वाटलं नको आणि केलं कॅन्सल.
बाहेर यायची किम्मत त्याला चुकवावी लागलीच आणि त्याचे डोळे गेले.
(तो किस्सा इथे: आ दा पा दा)
गम्मत म्हणजे डोळे गेल्यापासून त्याचा चवीचा सेन्स हजारपटीनी वाढला असं तो छाती ठोकून सांगायचा.
म्हणजे उदाहरणार्थ पाणीपुरी त्याची फेव्हरेट...
आधीही खायचा तो आवडीनी.
पण...
आंधळा झाल्यापासून पाणीपुरी खाताना चवीचे अक्षरश: स्फोट व्हायचे त्याच्या मस्तकात...
मुलायम रगडा, गोडूस चटणी, ठसकेदार पाणी, कुरकुरीत पुरी...
या सगळ्यांचे एकाचवेळी एकत्र आणि स्वतंत्र उत्सव चालायचे..,
त्याच्या जिभेवर, घशात, गालांत, ओठावर, पोटात, छातीत, मेंदूत.
आनंदानी डोळे मिटून झेलपांडत नाचायचा तो.
आणि तेव्हाच माझ्या लक्षात आली ग्यानबाची मेख: