Sunday 20 January 2019

ऍन ओड टू...

खातो मी मोत्यांची खिचडी
आणि साबुदाण्यांचे मिरवतो हार!

घेतो ओली चुंबनं तलवारींची
ओठांचे मी सोसतो वार!

लावतो नेलपेन्ट बोटांना
आणि जातो पौरुषाच्या पार!

टेकवतो बोचा रीतीभातीच्या निखाऱ्यांवर
आणि वाटून घेतो मस्त गाSSS र गाSSS र

...
...
...
सकाळपासून आज विंदांची...
आठवण येतेय फार! 
आठवण येतेय फार!!  

-नील आर्ते