विज्ञानकथा मला नेहेमीच एखाद्या छान कॉकटेल ड्रिंक सारखी वाटत आलीये.
म्हणजे कॉकटेलमध्ये कसं अल्कोहोल असतं आणि बाकी सरबत, सजावट वगैरे...
आता 'विज्ञान-कथे'तलं विज्ञान म्हणजे अल्कोहोल समजा आणि बाकी "काल्पनिक, सामाजिक संदर्भ" वगैरे नॉन अल्कोहोलिक भाग.
आणि मजा काय आहे माहितीये का कॉकटेलसारखीच सायफायची सुद्धा "अल्कोहोलच्या" बदलत्या प्रमाणानुसार असंख्य लोभस रूपं आहेत :)
उदाहरणार्थ:
काही लेखकांच्या कथेत विज्ञान अगदी तपशीलवार असतं, त्याचं प्रमाणही अधिक.
कडक स्कॉच ऑन द रॉक्स सारखं.
(पहा: आशिष महाबळ यांच्या गणिती अॅल्गोरिदम्सवर आधारित कथा )
काही कथांमध्ये विज्ञान आणि फिक्शनचं प्रमाण सम-समान:
मस्त रम आणि थम्सअप सारखं
(पहा: बाळ फोंडके सरांच्या कौशिक-अमृतराव कथा)
तर काही कथांमध्ये लेखनाची नजाकत जास्त असते आणि विज्ञान थोडं पार्श्वभूमीला.
एखाद्या छान छत्री-बित्री लावलेल्या 'पिना-कोलाडा' कॉकटेलसारखं
(पहा: प्रसन्न करंदीकर यांची मी... माधव जोगळेकर ही कथा!)
पण विज्ञान कथा आणि कॉकटेल्स मधलं साम्य इथेच संपतं:
कारण कॉकटेल्स मेंदू सैलावतात तर विज्ञानकथा बहुधा मेंदूला झडझडून जाग आणतात.
'बहुधा' म्हणण्याचं कारण की भविष्यातल्या विज्ञानामुळे होणारे सामाजिक नैतिक पेच विज्ञान कथा
आपल्यापुढे बरेचदा मांडते,
तिच्यातून वैज्ञानिक संकल्पनांची ओळख बरेचदा होत असते,
पण तो तिचा "सोल पर्पज" नसतो आणि नसावाही.
याचं उत्तम आणि सर्वदूर पोचलेलं उदाहरण म्हणजे "हिच हायकर्स गाईड टू गॅलेक्सी" ही कादंबरीमाला:
ती विज्ञान कथा आहे पण ढोबळमानातच:
आपल्याच मस्तीत जगण्याच्या असंबद्धतेची वैश्विक खिल्ली उडवत, 'इंग्लिश' विनोदाचे चिमटे काढत ती पुढे जाते.
आणि जगभरातल्या वाचकांच्या गळ्यातला ताईत होऊन बसते.
किंवा आपल्या अंगणातील सुबोध जावडेकर यांची 'कलावंताचा जन्म' ही कथा:
जी चित्रकाराची प्रतिभा, टॅलंट जन्मजात असतं की जीवापाड मेहनत करून मिळवत येतं?
सर्जनाच्या त्या लख्ख चार-दोन क्षणांसाठी आख्ख्या जीवनाची किंमत द्यावी का आणि ती तशी देता येते का?
अशा अनेक अडनिड प्रश्नांचा ती धांडोळा घेते.
या आणि इतर अनेक चांगल्या विज्ञान कथा...
मुद्दा इतकाच की विज्ञानकथा ही मुदलात कथा असते.
कथेच्या निखळ आनंदासाठी वाचक ती वाचतात आणि आमच्यासारखे होतकरू लेखक त्या सोनसळी क्षणांसाठी लिहितात!
-नील आर्ते