स्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो
बस मधल्या मुलीला पण राणी बनवतो
म्हणे "रोज रोज आँखों तले " , आणि "मेरा कुछ सामान"
स्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो
मस्त strong काळजाचे पाणी बनवतो
"पर्सनल से सवाल " आणि "छई छप्पा छई "
काळजात गुलगुल होते पण मज्जा वाटते लई
"चड्डी पहन के फूल खिला है" अस्सं कोणी बोलतो का
पण खर तर दुसर्यांच्या गाण्यावर इतके कोणी डोलतो का ??
"तुजसे नाराज़ नही हैरान हूँ" मै राजा
सफ़ेद कपडे घालून वाजवतोस आमचा बाजा
"तेरे बिना शिकवा" काळजात कसली कळ देत
पण "ढॅण टॅ ढॅण" ऐकल की १२ हत्तींच बळ येत
त्यात त्याला रहमान भेटला की कल्लाच नुसता
"छैय्याछैय्या" ऐकून कान नुसते गर्रम होतात
आपण किंग असल्याचे खोटेनाटे भरम होतात
स्साला बोललो म्हणून रागावू नका सर
खरे तर तुम्ही आमच्यातलेच वाटता
शब्द घेउन डोळ्यांच्या कुशीतच साठता
स्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो
शहाण्या माणसाला पण अडाणी बनवतो
- नील आर्ते
mast aahe re..aaila me hyachya aadhi ka nahi vachlya kavita..
ReplyDeleteThanks Sach !
ReplyDeleteस्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो
ReplyDeleteहा रे...
रहमान आणि गुलजार किलिंग कॉम्बो आहे.
"हौले हौले मारवा की राग
मीर की बात हो..."
हा तर माझा ड्रीम रोमान्स आहे साला!
स्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो
ReplyDeleteहा रे...
रहमान आणि गुलजार किलिंग कॉम्बो आहे.
"हौले हौले मारवा की राग में
मीर की बात हो..."
हा तर माझा ड्रीम रोमान्स आहे साला!
आज पहिल्यांदाच आलो तुझ्या ब्लॉगवर, आणि संपलो!
ReplyDeleteएक-एक अफलातून पोस्ट्स. खूप आवडल्या :)
"शब्द घेउन डोळ्यांच्या कुशीतच साठता" - जियो!
मंदार खूप सारे आभार !!!
ReplyDeleteप्रसून जोशीचे लिरिक्स पण टू गुड असतात. (रंग दे बसंती मधलं रु ब रु मस्तच )
"मुझसे फ्रॅन्डशिप करोगे" चे (टायटल साँग) लिरिक्स पण धमाल आहेत. (अन्विता दत्त गुप्ता)
एजंट विनोद मधलं "दिल मेरा ले जा मुफ्त का" चे लिरिक्स पण सही आहेत (अमिताभ भट्टाचार्य )
जबरी जबरी जबरी बॉस !! गुलजारबद्दल मला हे सगळं सेम असंच वाटतं.. आज शब्दांत पकडता आलं. म्हणजे तू पकडलेलं वाचता आलं :)
ReplyDeleteहेरम्ब , गुलझार मस्तच ....
ReplyDeleteसेमि अवान्तर: अमित त्रिवेदिचा सुद्धा मी प्रचन्ड वेगाने फॅन व्हायला लागलोय.
"हन्टर" ऐकल का ?? कसल ब्रिलियन्ट गाण आहे...
"भय्या" गोड्वा + कॅलिप्सो र्हिदम + झिणझिण्या आणणारे पण क्लेव्हर लिरिक्स ... लिरिसिस्ट कोण आहे शोधला पाहिजे
नज़्म उलझी हुई है सीने में
ReplyDeleteमिसरे अटके हुए हैं होंठो पर
उड़ते फिरते हैं तितलियों की तरह
लफ्ज़ कागज़ पे बैठते ही नहीं
नज़्म उलझी हुई है सीने में
कब से बैठा हुआ हूँ' मैं जानम
सादा कागज़ पे लिख के नाम तेरा
बस तेरा नाम ही मुकम्मिल है
इससे बेहतर भी नज़्म क्या होगी
~ गुलझार
वाह!
Deleteसेमि अवान्तर: अमित त्रिवेदीची 'लुटेरा ' ची सगळी गाणी खल्लास होती .
ReplyDeleteAmit Trivedi & Sneha Khanvikar are tooo good:
DeleteShaitan, GOW, Dev D, David, Queen ...every song from these albums is brilliant...
Sneha's Byomkesh Bakshi soundtrack is also dope!
Loved your poem
ReplyDeleteThanks Sayali...we ll talk more in class.
Delete