अक्खा दिवस आणि अक्खी संध्याकाळ ड्राईव्ह करून पश्मिनचं शरीर आंबून गेलं होतं. इतका वेळ त्यानं कटाक्षानं झोपेला दूर ठेवलं होतं पण आता मात्र रात्र झाली होती. त्याचं गात्र न गात्र थकलं होतं. लवणाऱ्या पापण्या मिटताना किंSSSSSचित जास्त वेळ घेत होत्या...मन हळूहळू निवांत होत होतं आणि दिवसभराच्या ड्राईव्हचा पिक्चर त्याच्या डोळ्यापुढून सरकत होता.
एक्स्प्रेस-वे वरची ती काळी डौलदार ऑडी आणि त्यातल्या त्या स्टडनं बाहेर फेकलेली प्लास्टीकची बाटली...कार थांबवून तीच बाटली त्याच्या स्पाईक्स काढलेल्या डोक्यावर तीनदा टणाटणा आपटाविशी वाटली होती पश्मिनला. क्यू-सेवन चालवत होता पण झाटूची चिंधीगीरी काय सुधारत नव्हती.
'दादा-पादा' च्या नंबर प्लेट्सवाल्या गाड्या,
'बघतोस काय मुजरा' कर आणि 'नाद नाय करायचा' वाल्या माजोर्ड्या पाट्या...
कुठे कुठे 'झर्याची मैना' वाली गोंडस पाटी!
नीता फूड मॉल वरचा गोटी एवढा इवलुसा वडा (किंमत फक्त वीस रुपये).
असं काय काय आठवत राहिलं त्याला!
समोरून स्साप्प स्साप्प येणारे गाड्यांचे दिवे...पिवळे लाल!
त्याची विचारांची वीण थोSSSडी सैल झाली...मग आणखीन थोडी:
रांचीच्या केसांचा तो वेडावणारा वास...नवीन कुठचातरी शाम्पू आणलाय वाटते तिनं...
हवा थोडी कमी वाटतेय का पुढच्या टायरमध्ये?...
नीता फूड मॉल वर चौकडी आतापासून...वीस रुपये?...चोर साले...
आपला लाल चौकडीचा शर्ट कुठे गेला काय माहित...
स्साप्प स्साप्प येणारे गाड्यांचे दिवे...पिवळे लाल!...
त्याच्या पापण्या अलगद मिटल्या...एक सेकंद...दोन सेकंद...चार सेकंद
विचार अजून उसवले आणि मग विरायला लागले!
स्साप्प स्साप्प येणारे गाड्यांचे दिवे...पिवळे लाल!
मग त्याच्या मेंदूचा कुठला तरी खट्याळ भाग अलगद कुजबूजला, "पश्मिSSSन राजाSS ड्राईव्ह करताना कोणी झोपतं का कधी वेडोबा?...खिक्क!!!"
आणि त्यानं राप्पकन डोळे उघडले, त्याची छाती थाडथाड उडत होती...डुलकी किती वेळ लागली होती कोण जाणे...पण वरती पंखा गरगरत होता!
रांचीनं त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांची 'च्युइंक-च्युक' आवाज करत झकास पापी घेतली आणि मिस्किलपणे विचारलं, "झोपेत पण स्टिअरिंग-व्हील सारखे हात काय फिरवत होतास रे?
पश्मि SSSन राजाSS झोपताना कोणी ड्राईव्ह करतं का कधी वेडोबा?...खिक्क !!!"
-नील आर्ते

Wowwwww :) Fundu lihila aahe. :D Vatla atta jaate gadi ghatat ki nantar. Dhak dhuk hot hoti. Bare jhale dole ughadale te. :) Sahich.
ReplyDelete-Vidya.
:-) मला वाटलं आता 'अपघात'.
ReplyDeleteकहानीमे ट्विस्ट ..आवडला.
विद्या आणि अतिवास,
ReplyDeleteगोष्टुली आवडल्याचं वाचून खूप छान वाटलं अशीच ब्लॉगला भेट देत रहा!
मला त्या दिवशी चक्क असं झालं होत,
म्हणजे दिवसभर ड्रायव्हिंग करून रात्री फ्लॅटवर झोपताना...रस्ताच डोळ्यापुढे आला.
द्राइव्ह करताना झोपलो नाही पण झोपेत शिरताना ...जागेपणा आणि झोपेच्या सीमेवर ड्रायव्हिंगचं स्वप्न बघितलं आणि बिचार्या मेंदूची मेजर फाटली!
तो हबका विसरणं कठीण आहे.
>>>>>>>>>>>
"पश्मिSSSन राजाSS ड्राईव्ह करताना कोणी झोपतं का कधी वेडोबा?"
आणि
पश्मि SSSन राजाSS झोपताना कोणी ड्राईव्ह करतं का कधी वेडोबा?
>>>>>>>>>>>
हे म्हणजे थोडंसं "AATIVAS" आणि "SAVITAA" सारखं वाटतय का? :)
ये ब्बात बेट्या नील... बहू दिन बाद पढे आपको... :)
ReplyDelete"मला त्या दिवशी चक्क असं झालं होत,
म्हणजे दिवसभर ड्रायव्हिंग करून रात्री फ्लॅटवर झोपताना...रस्ताच डोळ्यापुढे आला."
सेम विथ मी. झोपेची पहिली काही मिनीटं ड्राईव्ह करण्याची स्वप्न बघण्यात जातात...
'Alls', what can I say..great people 'dream' alike!!!
Deleteक्या बात है! चक्क माझा ठोका चुकला... :) मग पुढले वाचून हायसे वाटले बघ. गोष्टुलीतही पुढली कहानी झेपली नसती...
ReplyDelete>>>>>>>
Deleteचक्क माझा ठोका चुकला.
>>>>>
Thanks भानस , taking it as compliment :)
Akkha diwas ani aakhi sandhyakal driving???..evadha kuthe gela hota ha bhai...possibly Hyd or Banglore...?? I have exp of driving like this from Hyd to Mum. Hence asked :-)..btw, Pune - Solapur rastya sarkha kantalvana rasta nahi. but never dozzed off on Ex-Hi. rather didnt feel like.
ReplyDeleteSach...ya locations are bit vague in my mind & in story but it is intentional:)
Delete"Poetic Liberty" you see :)
hahaha..hey mhanje SuShi chya eka pustakat lihilya sarkhe..."Opera House varun left turn ghetla ani saral Pali Hill la laglo.."...:-))
ReplyDeleteYou should write about Movies or create a blog for Movies? Btw..did you visit my List on IMDB?
It's a big list n I have gone through it partially bro...will update you
DeleteI liked your comments about the number plates..lollzzz..
ReplyDeleteMast avadale!!!!!!!!! pan mitra aahes kuthe!!!!!!!!!!
ReplyDeleteSahich ekdum!!!!! :)
ReplyDelete