तो धावत धावत ऑफिसवर पोचला… १:४०!…२ वाजता लंचची वेळ त्यात आज दिवाळीआधीचा शनिवार म्हणजे बहुतेक हाफ डे.
"येस्स", त्यानं संगतवार लावलेली कागदांची चळत तिच्याकडे दिली.
तिनं सराईतपणे पेपर्स चाळले, "अच्छा आपटे!…"
अहो मॅडम, आपटे नव्हे आ - ट - पे! "आस्तिक आटपे"
"ओह मला वाटलं आपटे" ती हसत म्हणाली!
त्यानं मनातल्या मनात तिचं नाव नु. ल. झा. ठेवून टाकलं: नुक्तंच लग्न झालेली.
"ठीक आहे प्रॉपर्टी टॅक्स आणि ट्रान्स्फर फी आत्ता भरून टाका टोटल ३६१० रुपये!"
त्यानं तत्परतेनं एक्झॅक्ट चेंज काढून पुढे सरकवली आणि रिसीट घेता घेता विचारलं, "किती दिवस लागतील साधारण मॅडम?"
हेडक्लार्क अडफळे तेव्हढ्यात काही कामासाठी बाहेर गेले होते… नु.ल.झा.नं लुकलुकणारे डोळे बारीक केले, माफक मिशीवरनं ओलसर जीभ फिरवली:
"तसं तर एक महिना लागतो पण साहेबांच्या चहा-पाण्याचं बघा जरा… आज ऑफिस बंद व्हायच्या आत करून टाकू तुमचं काम!"
त्याला चटका बसल्यासारखं झालं… कान हळूहळू गर्रर्रम होत होते आणि श्वास फास्ट!
त्यानं दाढा गच्च दाबल्या आणि जबड्याची हाडं बाहेर येउन पुन्हा आत गेली… ए ssss कच क्षण!
मग तो स्वच्छ हसला, "मॅडम आम्हीपण आज-काल "सत्यमेव जयते" बघतो… तुम्ही बघता का हो? त्याच्या अॅडपण छान असतात… बघा कधी यु-ट्यूब वर! थोडक्यात काय तर थांबेन मी महिनाभर… तुम्हीपण कुठे जात नाही आहात आणि मी पण कुठे जात नाहीये!"
नु.ल.झा.चा चेहरा हळूहळू पडत गेला… तिनं फारसं न बोलता रिसीट बनवली, "ठीक आहे या आठवड्यात दिवाळी वगैरे आहे ना सो तुम्ही पुढच्या आठवड्यात चौकशी करा!"
सगळ्या झेरॉक्स पिशवीत गोळा करून तो निघाला तेव्हा त्याची छाती टणाटणा उडत होती.
'हेड-क्लार्क तसा चांगला वाटत होता मग तीच त्याच्या नावावर पैसे मागत असले का? की हेड-क्लार्कनेच तिला मागायला ट्रेन केलं असेल??…
'च्यायला आपण हिरोगिरीमध्ये सांगितलं तर खरं, पण खुन्नस ठेवून या लोकांनी रखडवलं तर???…
नाव मुद्दामहून आपटे लिहिलं तर????…
दिले असते दोन-चारशे तर आत्ता सर्टीफिकेट घेऊन बाहेर पडलो असतो…
परत परत खेटे घालण्यापेक्षा स्वस्त पडलं असतं ते…'
असे हज्जार प्रश्न पिंगा घालत होते त्याच्या डैल्यात.
पण मग त्याला ते मघासचं फिलिंग आठवलं:
बेदरकार… स्वच्छ… उंचावरून पाण्यात उडी मारल्यासारखं… शांत आणि गारगार.
"के सरा सरा… मां की… जे होईल ते बघूया!"…अजून शिफ्टिंगची एक लाख कामं बाकी होती.
----------------------------------------------------------------------------
एक आठवड्यानंतर:
डोळे उघडल्या उघडल्या त्याला आठवलं, आज ट्रान्स्फरचं काय झालं बघायला हवं…
काही खुसपट काढतील का? फार तर काय होईल दोन महिने लावतील किंवा तीन… लागू देत!
आपले पेपर्स तर क्लिअर आहेत सगळे… आणि शिवाय त्या 'सत्यमेव जयते'च्या अॅड्स मनापासून आवडल्या होत्या आपल्याला.
त्यानं झटपट आवरलं… कपडे केले… आवडते कॉम्बॅट बूट्स घातले… असा काही युद्धाचा प्रसंग असला की हटकून घालायचा तो.
थोडी किरकोळ खरेदी करून तो दहा वाजताच ऑफिसमध्ये थडकला दोन-तीनच माणसं होती त्याच्यापुढे.
लगेचच त्याचा नंबर आला, त्यानं रिसीट सरकवली…
खिडकीवर आज अडफळेच होते… नु.ल.झा. बाजूच्या खिडकीत होती.
दाढा गच्च दाबत त्यानं अडफळेंकडे बघितलं…
त्यांनी गुलाबी रंगाचं ट्रान्स्फर सर्टीफिकेट आस्तिककडे सरकवलं.
दाढा सैल सुटल्या… त्यानं झरझर नजर मारली नाव पण पर्फेक्ट होतं आ - ट - पे
तो खुषीत हसला,
"थॅन्क यु सर!"
त्यानं झटपट पेपर्स पिशवीत गोळा केले आणि निघता-निघता तो थांबला,
"एक सांगू का तुम्हाला?" थोडा मोठ्ठ्या आवाजात तो म्हणाला.
अडफळे, नु.ल.झा. आणि खिडकीच्या अल्याड-पल्याडचे इतर लोक त्याच्याचकडे बघत होते…
"तुम्ही खूप एफीशियंटली काम करताय… असंच करत रहा…
आणि प्लीज ही चॉकलेट्स इकडच्या सगळ्यांना वाटा! हॅप्पी दिवाली"
त्यानं "फरेरो रोशेर" चा मोठ्ठा डबा अडफळेंकडे सरकवला.
निघताना नु.ल.झा.नी त्याला एक स्वच्छ स्माइल दिलं आणि तिच्या गालांना खळ्या पडतायत हे त्याला आजच लक्षात आलं.
************************ समाप्त ************************
-नील आर्ते
समोरच एक क्लार्क बसली होती… नवीनच लग्न झालं असावं: लख्ख कुंकू, हातात भरलेला चूडा… दात किंचित बाहेर डोकावणारे… पण त्याला तिचे डोळे नाही आवडले… थोडे बिलंदर होते ते.
बाजूलाच एक शांत ऋजू माणूस बसला होता, समोर पाटी होती 'हेडक्लार्क अडफळे' म्हणून…
धाड-धाड पायऱ्या चढून लागलेला दम शांत करत त्यानं विचारलं, "नवीन घर घेतल्यावर म्युन्सिपालिटीचा टॅक्स माझ्या नावावर ट्रान्स्फर करायचाय… तो इथेच होईल ना?"
"हो हो" ती क्लार्क उत्तरली, "पण सोसायटीची एन. ओ. सी., जुन्या मालकाचे डिटेल्स, सेल अॅग्रीमेन्ट्ची कॉपी, भरलेला फॉर्म… आणलंय का सगळं?"
"येस्स", त्यानं संगतवार लावलेली कागदांची चळत तिच्याकडे दिली.
तिनं सराईतपणे पेपर्स चाळले, "अच्छा आपटे!…"
अहो मॅडम, आपटे नव्हे आ - ट - पे! "आस्तिक आटपे"
"ओह मला वाटलं आपटे" ती हसत म्हणाली!
त्यानं मनातल्या मनात तिचं नाव नु. ल. झा. ठेवून टाकलं: नुक्तंच लग्न झालेली.
"ठीक आहे प्रॉपर्टी टॅक्स आणि ट्रान्स्फर फी आत्ता भरून टाका टोटल ३६१० रुपये!"
त्यानं तत्परतेनं एक्झॅक्ट चेंज काढून पुढे सरकवली आणि रिसीट घेता घेता विचारलं, "किती दिवस लागतील साधारण मॅडम?"
हेडक्लार्क अडफळे तेव्हढ्यात काही कामासाठी बाहेर गेले होते… नु.ल.झा.नं लुकलुकणारे डोळे बारीक केले, माफक मिशीवरनं ओलसर जीभ फिरवली:
"तसं तर एक महिना लागतो पण साहेबांच्या चहा-पाण्याचं बघा जरा… आज ऑफिस बंद व्हायच्या आत करून टाकू तुमचं काम!"
त्याला चटका बसल्यासारखं झालं… कान हळूहळू गर्रर्रम होत होते आणि श्वास फास्ट!
त्यानं दाढा गच्च दाबल्या आणि जबड्याची हाडं बाहेर येउन पुन्हा आत गेली… ए ssss कच क्षण!
मग तो स्वच्छ हसला, "मॅडम आम्हीपण आज-काल "सत्यमेव जयते" बघतो… तुम्ही बघता का हो? त्याच्या अॅडपण छान असतात… बघा कधी यु-ट्यूब वर! थोडक्यात काय तर थांबेन मी महिनाभर… तुम्हीपण कुठे जात नाही आहात आणि मी पण कुठे जात नाहीये!"
नु.ल.झा.चा चेहरा हळूहळू पडत गेला… तिनं फारसं न बोलता रिसीट बनवली, "ठीक आहे या आठवड्यात दिवाळी वगैरे आहे ना सो तुम्ही पुढच्या आठवड्यात चौकशी करा!"
सगळ्या झेरॉक्स पिशवीत गोळा करून तो निघाला तेव्हा त्याची छाती टणाटणा उडत होती.
'हेड-क्लार्क तसा चांगला वाटत होता मग तीच त्याच्या नावावर पैसे मागत असले का? की हेड-क्लार्कनेच तिला मागायला ट्रेन केलं असेल??…
'च्यायला आपण हिरोगिरीमध्ये सांगितलं तर खरं, पण खुन्नस ठेवून या लोकांनी रखडवलं तर???…
नाव मुद्दामहून आपटे लिहिलं तर????…
दिले असते दोन-चारशे तर आत्ता सर्टीफिकेट घेऊन बाहेर पडलो असतो…
परत परत खेटे घालण्यापेक्षा स्वस्त पडलं असतं ते…'
असे हज्जार प्रश्न पिंगा घालत होते त्याच्या डैल्यात.
पण मग त्याला ते मघासचं फिलिंग आठवलं:
बेदरकार… स्वच्छ… उंचावरून पाण्यात उडी मारल्यासारखं… शांत आणि गारगार.
"के सरा सरा… मां की… जे होईल ते बघूया!"…अजून शिफ्टिंगची एक लाख कामं बाकी होती.
----------------------------------------------------------------------------
एक आठवड्यानंतर:
डोळे उघडल्या उघडल्या त्याला आठवलं, आज ट्रान्स्फरचं काय झालं बघायला हवं…
काही खुसपट काढतील का? फार तर काय होईल दोन महिने लावतील किंवा तीन… लागू देत!
आपले पेपर्स तर क्लिअर आहेत सगळे… आणि शिवाय त्या 'सत्यमेव जयते'च्या अॅड्स मनापासून आवडल्या होत्या आपल्याला.
त्यानं झटपट आवरलं… कपडे केले… आवडते कॉम्बॅट बूट्स घातले… असा काही युद्धाचा प्रसंग असला की हटकून घालायचा तो.
थोडी किरकोळ खरेदी करून तो दहा वाजताच ऑफिसमध्ये थडकला दोन-तीनच माणसं होती त्याच्यापुढे.
लगेचच त्याचा नंबर आला, त्यानं रिसीट सरकवली…
खिडकीवर आज अडफळेच होते… नु.ल.झा. बाजूच्या खिडकीत होती.
दाढा गच्च दाबत त्यानं अडफळेंकडे बघितलं…
त्यांनी गुलाबी रंगाचं ट्रान्स्फर सर्टीफिकेट आस्तिककडे सरकवलं.
दाढा सैल सुटल्या… त्यानं झरझर नजर मारली नाव पण पर्फेक्ट होतं आ - ट - पे
तो खुषीत हसला,
"थॅन्क यु सर!"
त्यानं झटपट पेपर्स पिशवीत गोळा केले आणि निघता-निघता तो थांबला,
"एक सांगू का तुम्हाला?" थोडा मोठ्ठ्या आवाजात तो म्हणाला.
अडफळे, नु.ल.झा. आणि खिडकीच्या अल्याड-पल्याडचे इतर लोक त्याच्याचकडे बघत होते…
"तुम्ही खूप एफीशियंटली काम करताय… असंच करत रहा…
आणि प्लीज ही चॉकलेट्स इकडच्या सगळ्यांना वाटा! हॅप्पी दिवाली"
त्यानं "फरेरो रोशेर" चा मोठ्ठा डबा अडफळेंकडे सरकवला.
निघताना नु.ल.झा.नी त्याला एक स्वच्छ स्माइल दिलं आणि तिच्या गालांना खळ्या पडतायत हे त्याला आजच लक्षात आलं.
************************ समाप्त ************************
-नील आर्ते
छान लिहिलंय. उगाच आक्रस्ताळेपणा न दाखवता संयमानं गाठ सुटलेली दाखवलीय, हे विशेष. हिरोगिरी करायची म्हणजे नेहमी युद्धच झालं पाहिजे असं नाही, बरोबर ना?
ReplyDeleteएक्झॅक्टली मन्दार :)
Deleteनु.ल.झा. :)
ReplyDeleteपां. झु. :)
Deleteमस्तच :-)
ReplyDeleteतुझा सगळा ब्लॉग वाचला, तुझ्या लिवण्यातला बिनधास्तपणा आवड्या , लिहित रहा
Thanks brother for encouraging feedback... trust me it's worth a moon for budding writer :)
Deleteडेफिनिटली!! इंटरनेट सर्फिंग करताना तुझा ब्लॉग सापडावा, अजून काय पायजे शेट? :-)
Delete