तो रात्री हळूच दार उघडून आत आला… पण तिनं त्याला पकडलंच!
ओशाळं हसत त्यानं बूट काढले…
"मजा आली आज?"
"खूप!"
"एक विचारू तुला?"
"बोल ना!"
"तू का नाचतोस"?
तो हलकेच हसला…
म्हणाला,
"मी असा रात्री घरी येतो ना तेव्हा डाव्या हाताचा पंजा पाठून हळूच हुंगतो!
सुंदर फिक्का गंध येत असतो त्याला…
कोणत्या बरं मुलीच्या परफ्युमचा असेल तो? आठवत राहतो मी…
सुंदर लाल ड्रेस घातलेली ती थोडीशी मोटू, हसरी मुलगी… जी साल्सा करताना भिंगरी सारखे टर्न्स घेत होती… तिचा?
की ती किंचित रागीट उंच शिडशिडीत सफेद ड्रेसवाली पोरगी… जिच्याबरोबर वॉल्ट्झ केलं… तिचा?
की हिरव्या चाफ्यासारख्या रंगाच्या हॉट-पॅन्ट्स घातलेली, नूडल्स सारखे केस असलेली मैत्रिण…
जिच्याबरोबर जाईव्ह करताना आम्ही दोघं खिदळत होतो… तिचा?
आय थिंक या वासासाठी नाचतो मी"
ती त्याच्याकडे बघत उमजून हसली!
तो पंजा हळूच हुंगत म्हणाला, "ए तुला मी थोडा क्रॅक वाटतो ना?"
"ते मला तुला जन्म दिल्यापासून माहितीये… झोपा आता वेडोबा!"
-नील आर्ते

अशीच अमुची आई असती
ReplyDeleteवैगेरे वैगेरे
;)
good 1 Leena :)
Delete