आधी याचा उच्चार मी 'मकाब्र' करायचो पण मग कळलं की तो 'मकाबर्' असा आहे.
म्हणजे खास पुण्यातले लोकं बरं म्हणताना ... 'बर्' म्हणतात... 'र' ला जास्त भाव नं देता.
(फॉर दॅट मॅटर कशालाच जास्त भाव नं देता पण ते 'Pun'plicit च :))
ह्यातही 'र' तेवढाच ठेवावा.
तर 'मकाबर्'
मराठीत याच्या जवळपास जाणारे शब्द आहेतच: भीषण, अघोरी वगैरे.
पण याचा शेवटचा पोट फुटका 'ब' आणि पाय तुटका 'र्' माझी जास्तच फाडतात.
धारपांच्या गोष्टींतले ते खुसूखुसू हसणारे बागुलबुवे आठवायला लागतात...
रोआल्ड डालच्या गोष्टीतली ती मृत नवऱ्याच्या जिवंत मेंदूसमोर सिग्रेट फुंकणारी मेरी...
म्हणजे कश्यप/नायरचा शैतान ठीक होता.
पण 'पांच'...
ते एकमेकांना बोचकारणारे रक्तबंबाळ करणारे मित्र...
ती अंधारी कोंदट मुंबई...
ती कचाकच हिंसा...
आणि यु-ट्यूब वरची ती ग्रेनी, धुरकट कधीच थिएटरचा उजेड न पाह्यलेली नल्ला प्रिंट!
साक्षात 'मकाबर्'!
-नील आर्ते

No comments:
Post a Comment