Thursday, 26 May 2011

An ode to my rock-climbing buddy Sanju :)

मै जानता हूँ एक लडके को ...
उससे पत्थारोसे लगाव है पर वोह पत्थर दिल नहीं.
वोह है मेरा दोस्त हर तरह की भपोटिंगमें...
वोह है मेरा गाईड : जीवनमें ,जंगलमें और जीवनके जंगलमे .
वोह है मेरी दोस्ती के खजाने का एक बेशकीमती हीरा...
लेकिन उसे मैंने यह अब तक बताया नहीं है. 
जब हम दोनों बैठे होंगे सह्याद्रीके और एक शिखरपर...
सर पर करारी धुप लिए और पैरोंतले होगा सारा जहाँ 
तब शायद मै उसे यह बात बता दूंगा !

-नील 


सुख म्हणजे काय असतं ?

सुख म्हणजे काय असतं ?

एक स्वीमिंगची चड्डी आणि खाडी
एक तळलेला मासा आणि माडी :)
मेंढीकोटाचा डाव आणि चीम्बोरीचा बाव
खुर्चीतली झोप आणि भाताचा टोप
समुद्राची गाज आणि केसांतली वाळू
दोस्तीतला वितळता क्षण हळू हळू हळू

-नील
-Pristine beaches of Malavn here I come

Friday, 29 April 2011

असंच काय नाय

खूप बटर म्हणजे टेस्टी पाव भाजी असंच काय नाय
खूप बडे स्टार्स म्हणजे चांगला मूव्ही असंच काय नाय
महागडी गिफ्ट्स म्हणजे चांगला BF असंच काय नाय
दिवसाला १०० कॉल्स म्हणजे चांगली GF असंच काय नाय
टाईट टी शर्ट म्हणजे चांगली बॉडी असंच काय नाय
टाईट जीन्स म्हणजे चांगली फिगर असंच काय नाय
गळ्यात हातात २ किलो सोनं म्हणजे ***त दम असंच काय नाय
कोलांट्या उड्या म्हणजे चांगला डान्स असंच काय नाय

जागो ग्राहक जागो :)

Saturday, 22 January 2011

13 वी रास

म्हणे तेरावी रास ..अरे राशीन्चेच करा तेरावं
ग्रहांना घाबरून जगावं की ताठ मानेने मरावं

"बेजान" चक्रम ज्योतिष्याकडे माझं भविष्य ठरावं
की टाकावेत फासे बेदरकार
आणि मग जिंकावं किंवा हरावं

राशी-बीशी बरया असतात तिच्याशी first time बोलायला
घट्ट मिटल्या ओठांतून मैत्रीचे दरवाजे खोलायला ;)

पण जास्त त्यांना चढवू नये ..
Excuses नी ऊर बडवू नये

तुमचे भविष्य तुमच्या हाती हे तर मुतारीत पण शिकवतात
का मग सगळे भोंदू january त पकवतात ?

जास्तच लिहिले जरा थोडं अशुद्ध पण असणार
पण माझ्याच चुका त्या..तिथं numerologist नसणार

-नील

Thursday, 18 February 2010

ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा

१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात . त्यातही french beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या . काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)






२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)







३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे










* सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टूम्हणतात . त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.







* शुक्रवार रात्र: निघायची तयारी ...ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)







* शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट ...काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)







४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे









* सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय ...नाईलाजाने.






* शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली ... ही trek साठी भेटण्याची जागा.






* शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand




* शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह









५.अन्य विशेष लकबी:








* हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसर्या club बरोबर ट्रेकला जातात :)


* ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत .... साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात . कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . पण किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :) त्यातही त्यांची फारशी चूक नसते . रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)


* बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी


* यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :) यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते . एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :) सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .


६.खाण्या पिण्याच्या सवयी:




* कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)


* काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)


* पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही

७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:

* खणखणित आवाजात पोवाडे गाणे
* जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे
* बैटिंग ला जाणे :)


८.यांची दैवते:

* offcourse शिवाजी महाराज
* रायगडचा जगदीश्वर
* हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर इ . इ .

९.यांची तिर्थस्थळे:

* राजमाचीचा तलाव
* बाण चा ब्लू लगून
* नाणे घाटातील केव्ह
* कोंकण कडा इ . इ .

आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)

१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज

* यांना मुली आवडत नाहीत
* हे बाबासाहेब पुरंदरयाना खुप मानतात
* ??

-------------------------------------------------------------------------------------------------
काही म्हणी आणि वाक्प्रचार :

* खाईन तर तुपाशी नाहीतर......... adjust करेन :)
* वाट पाहीन पण एस टी नेच जाईन
* केव मध्ये "आला वारा गेला वारा" तो कुणाचा सोयरा :)
* An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber !!!

रॉक क्लाईम्बर वरून आठवले "रॉक क्लाईम्बर" हा ट्रेकर्सचाच एक अफलातून उपप्रकार ....पण त्यांच्याविषयी पुन्हा केव्हातरी :)

*

स्साला गुलज़ार

स्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो
बस मधल्या मुलीला पण राणी बनवतो

म्हणे "रोज रोज आँखों तले " , आणि "मेरा कुछ सामान"
स्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो
मस्त strong काळजाचे पाणी बनवतो

"पर्सनल से सवाल " आणि "छई छप्पा छई "
काळजात गुलगुल होते पण मज्जा वाटते लई

"चड्डी पहन के फूल खिला है" अस्सं कोणी बोलतो का
पण खर तर दुसर्यांच्या गाण्यावर इतके कोणी डोलतो का ??

"तुजसे नाराज़ नही हैरान हूँ" मै राजा
सफ़ेद कपडे घालून वाजवतोस आमचा बाजा


"तेरे बिना शिकवा" काळजात कसली कळ देत
पण "ढॅण टॅ ढॅण" ऐकल की १२ हत्तींच बळ येत

त्यात त्याला रहमान भेटला की कल्लाच नुसता
"छैय्याछैय्या" ऐकून कान नुसते गर्रम होतात
आपण किंग असल्याचे खोटेनाटे भरम होतात

स्साला बोललो म्हणून रागावू नका सर
खरे तर तुम्ही आमच्यातलेच वाटता
शब्द घेउन डोळ्यांच्या कुशीतच साठता

स्साला गुलज़ार काय पण शब्द घेउन गाणी बनवतो
शहाण्या माणसाला पण अडाणी बनवतो


- नील आर्ते