Saturday, 18 June 2011

एपिफनी

ती आली आणि म्हणाली ,
"तू काहीच कामाचा नाहीस , संस्कृत 'कामाचा' सुद्धा 
इतकी वर्ष झाली मुंबईत एक घर घेऊ शकला नाहीस ...
डान्स सुद्धा चुकीचा करतोस आणि गीझर बंद करत नाहीस!!!"

खूप वाईट वाटलं त्याला ते ऐकून,
तीन दिवस तो भेलकांडत राहिला, 
दादर platform नं. ३ वरील दारुड्यासारखा,

आणि एका लख्ख सकाळी त्याला कळलं:
"कामाचा" असला-नसला तरी तो एक नम्बरचा किसर होता,
घर पुण्यातही घेऊ शकतो,
आणि डान्स आला नाही तरी धमाल करता येतेच म्युझिकवर 
..........
गीझर मात्र आता तो आठवणीने बंद करतो , लाईट गेले असले तरीसुद्धा!!!

-नील आर्ते

6 comments:

  1. भावा, लय भारी लिहलस बघ.
    आपण फ्यान आलो तुझा. सगळ्या पोस्ट वाचून काढल्या बघ.

    ReplyDelete
  2. आयच्या गावात !! लयच भारी..

    >> संस्कृत 'कामाचा'

    हा शब्दप्रयोग आता आयुष्यात विसरता येणार नाही !! :P

    ReplyDelete
  3. सचिन,

    जवळ जवळ वर्षाने रिप्लाय करतोय , सॉरी

    पण खुप सारे आभार...



    हेरम्ब,

    ;)

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. संस्कृत 'कामाचा' सुद्धा , hahahaha :D

    ReplyDelete