Wednesday, 10 August 2011

पुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:

४."सर्किट" सुंदरी: आपल्याकडे देवानं काय ठेवा दिलाय , आपण केवढ्या सुंदर आहोत इ. इ. गोष्टींची बिल्कुल जाणीव नसलेला हा प्रकार ..
चुकीचा हेअर-कट , इल फिटिंग जीन्स , मळके शूज आणि शून्य मेक-अप !
पण या सगळ्यातून तरारून येणारा हट्टी फुलासारखा देखणेपणा !!
यांचं ९८ टक्के वेळा मुलींपेक्षा मुलांशी झकास जमतं , 
toilet ला चक्क जोडीदारीण न घेता एकटा जाणारा हा स्त्री वर्गातील दुर्मिळ उप-प्रकार.


आढळण्याची ठिकाणे : खदखदून हसणाऱ्या पोरांच्या ऑल दांडेकर ग्रुपच्या केंद्रभागी बहुधा सर्किट सुंदरी सापडते , प्रभात रोड वरची Film Institute , University ची library अशा जरा "डीप" आणि intelctual ठिकाणी पण सापडू शकतात.


उद्या: लीनाच्या खास आग्रहावरून "आय. टी. " सुंदरी

8 comments:

  1. हा प्रकार तेव्हढासा ’ऑबव्हियस’ नाही त्यामुळे भयंकर इंटरेस्टींग वाटलेला. बाय द वे, तुला मुलींच्या ए.सी, एम.सी, बी.सी या कॅटेगिरीज माहित आहेत का? आय गेस नॉट.
    नीवेज, यू आर गुड टू गो!

    ReplyDelete
  2. Shraddhs 90 % of these things can fit err ummm welll ...U !!! Except offcourse Non-Pune postal address :P

    ReplyDelete
  3. हा हा हा.. ऑफ़ कोर्स!
    << err ummm welll ...U - केवढी ती हिचकिछाहट (बरोबर आहे ना शब्द?)
    ही पोस्ट लिहीली आहेस तेव्हा मी पुण्यात होते, सो, ’टेक्निकली’नॉन-पुणे पोस्टल ऍड्रेस हा मुद्दा मला लागू होत नाही.
    आणि तुला काय वाटलं, मी सगळ्या सुंदरया सोडून इथेच कमेंट का सोडली? did that, been there. मी उगीचच्या उगीच कुठली गोष्ट करते का?
    असो,
    मुंबईतील सुंदरयांचे प्रकार लिहायची हर्क्युलीअन टास्क केव्हा सुरु करतो आहेस?

    ReplyDelete
  4. :D
    ए.सी, एम.सी, बी.सी ????
    tell me / message me.

    ReplyDelete
  5. तू म्हणालास, ९०% गोष्टी फ़िट होतात नव्हे होऊ शकतात-'Can' वापरला आहेस. त्यातल्या १०% किंवा इतरही कुठल्या होत नाहीत ऑर रादर ’होऊ शकत नाहीत’ ?(तुझ्या convenience करता असं म्हणूयात हवं तर) डेड क्युरीयस.
    tell me / message me. :P

    ReplyDelete
  6. ए.सी म्हणजे अप्सरा कॅटेगिरी
    एम.सी-जाऊ देत. तुझं तोंड वाकडं होईल, मेसेज करते. पण एव्हाना तुझा ’guy brain' चालू झाला असेल तर कल्पना आली असेल.
    बी.सी म्हणजे बायको कॅटेगिरी.
    सरधोपट प्रकार. काही ऑफ़ेन्स बिफ़ेन्स क्रॅपची भानगड नसेल तर यांची विश्लेषणं सुद्धा अफ़लातून ऐकण्यासारखी आहेत. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

    ReplyDelete
  7. शी! कशा फ़्लो मध्ये आल्या होत्या त्या कमेंट्स. आता पुन्हा लिहीताना एकदम फ़ूलिश वाटतंय.
    तुझ्या त्या ’दुसरया आईनस्टाईन’ मधल्या त्या पोपट होणारया, अप्लाईड (का थिअरॉटीकल) फ़िजिक्स शिकवणारया माणसाची फ़ियॉन्से असते त्या समांतर जगात असतील त्या माझ्या वारलेल्या कमेंट्स. तिथून शोधून वाच आता.
    तर, मी तुला सांगत होते की
    ए.सी म्हणजे अप्सरा कॅटेगिरी
    एम.सी चा फ़ुलफ़ॉर्म सांगीतला तर तुझं तोंड वाकडं होईल तेव्हा तो मेसेज करते. पण एव्हाना तुझा ’guy brain' काम करायला लागला असेल तर तुला कल्पना आली असेलच. (होपफ़ुली!)
    आणि बी.सी म्हणजे बायको कॅटेगिरी.
    मी आयुष्यात सर्वात प्रथम ऐकलेलं बायांचं कम स्त्रियांचं कम मुलींचं हे पहिलं वाहिलं सरधोपट वर्गीकरण. मुलींमध्ये कशा वरणभा्त कॅटेगिरी, पु.हो.घा.मु कॅटेगिरी असतात तितकंच सरळसोट.
    ऑफ़ेन्स बिफ़ेन्स नावाच्या क्रॅपची भानगड नसेल तर त्यांचं अफ़लातून विश्लेषण ऐकण्यातही तेव्हढीच मजा आहे. ऍटलीस्ट मला आली होती.
    वर तू म्हणे, की यातल्या ९०% गोष्टीत मी फ़िट होते-नव्हे होऊ शकते. 'can' वापरला आहेस तू.
    मग उरलेल्या १०% किंवा इतरही नेमक्या कुठल्या गोष्टीत मी बसत नाही किंवा बसू शकत नाही?(तुझ्या convenience करता आपण असं म्हणूयात)
    डेड क्युरीयस.
    tell me / message me. :P

    ReplyDelete