Wednesday, 31 August 2011

किरण येले यांची अप्रतिम कविता : "सुरमई" (मौज दिवाळी अंक 2010)

तुम्हाला सुरमई माहित आहे का ?
बरोब्बर !
चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहित नाही ?
पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल ?
अरे तुम्हाला तर सगळंच माहिती आहे :
तिची चमचमती त्वचा ,
तिचं ताजेपण ओळखण्याची कला,
तिची महागलेली किंमत...
सगळंच.
आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही :
तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते ,
तिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते .
किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.

पण माफ करा ,
तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहित आहे 
असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे :
तुम्हाला सुरमईच समुद्रातलं सळसळण माहित नाही ,
तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहित नाही ,
तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहित नाही ,
आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलाघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही !

एक सांगतो ,
रागावू नका :
तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहीत आहे ,
सुरमई नाही .

आणि जे सुरमईच्या बाबतीत 
तेच-
अगदी 
तेच-
बाईच्याही 


-किरण येले 


6 comments:

  1. निव्वळ अप्रतिम !!

    >> आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलाघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही !

    हे तर सगळ्यात भयंकर !!

    ReplyDelete
  2. खरेच अप्रतिम !!

    ReplyDelete
  3. आगळीवेगळी कविता!One of a kind!

    ReplyDelete
  4. हेरंब , श्रिया , संकेत : किरण येले खूप छान लिहितात , त्यांची स्त्री बद्दल रादर एकूणच माणूसपणाबद्दलची समज अफलातून आहे.

    ReplyDelete
  5. >>आणि जे सुरमईच्या बाबतीत
    तेच-
    अगदी
    तेच-
    बाईच्याही

    अगदी अगदी अगदी

    ReplyDelete