तुम्ही कधी दुपारची झोप तीन्हीसांजेपर्यंत ताणलीये?
बाहेर काळोख दाटत असतो आणि कुठच्या तरी घाणेरड्या स्वप्नाने तुम्हाला दचकून जाग येते.
"आपल्याला जीवापाड आवडणारी ती दुसर्या कोणाशी तरी रत होताना दिसते"
नाहीतर...
"ट्रकने उडवलेल्या कुत्र्याचा रक्त मांसाचा लगदा"
...
"तुम्ही त्या गरीब चेहेर्याच्या पोराला पाकीट मारल्याच्या संशयावरून कुत्र्यासारखं मारत असता"
किंवा दिसतं आपलं ते मेलेलं माणूस...आपल्याबरोबर नेहेमीसारखं वावरताना...पण खूप खिन्न चेहेर्याने.
जाग आल्यावर जाणवते घश्याला पडलेली प्रचंड कोरड आणि गळ्याजवळ जमा झालेला मुंबईचा चिकट घाम.
आई थकून भागून ऑफिस मधून घरी येते आणि डुकरासारखं झोपल्याचा गिल्ट कुरतडत राहतो.
निस्त्राण मन आणि देह झडझडून तुम्ही उठता!
आईनं पर्स टाकून बाबांच्या फोटोपुढे छान वासाची उदबत्ती लावलेली असते...
आणि तुम्हाला उगीचच खूप बरं वाटतं!
-नील आर्ते
टीप : ही मुक्त कविता मला सौमित्रच्या "जॉइन्ट" कवितेवरून सुचली (कवितासंग्रह: "आणि तरीही मी")
हे म्हणजे थोडंसं भजीच्या वासाने चहाची तल्लफ येण्यासारखं...चहा आणि भजी म्हटलं तर सारखे पण वेगवेगळे सुद्धा.
भजी बेस्टच...चहा झक्कास झालाय की पांचट ते मात्र तुम्ही ठरवा.
--------------------------------------------------------------------
जनरली, गोष्टी ’sleep it off' करायच्या असतील तर हा अवेळी झोपेचा काळ खूप लाभदायक, असं माझं आपलं वैयक्तिक मत.
ReplyDeleteअशावेळी उठलं की मला माझं नाव आठवण्यापासून सुरुवात करावी लागते. मग आपण सकाळी उठतोय की अवेळी झोपून उठतोय याबद्दलही काही क्लू नसतो त्यामुळे याचा आजूबाजूचा अदमास घेऊन ठरवायला लागतं. कधीही शांतपणे आपोआप डोळे उघडलेत असं होत नाही, दचकूनच उठायला होतं, त्यामुळे डोकं भण्ण होतं आणि कपाळ आठ्यांनी भरलेलं असतं. आपण उगीचच सुजून पाण्यावर तरंगतोय असंही वाटतं एकेकदा.
थोडक्यात काय तर सौमित्रची जगाच्या परंपरागत चांगल्या वाईट संज्ञामधली येडझवी सकाळ असते तर आपली संध्याकाळ!
चहा-भजी उगीचच. चहा आणि भजी indivisually सुद्धा चांगले लागतात. चहा-बटाटवडा, चहा-सिगरेट ही कोणातरी नतद्रष्टाने उगीचच बनवलेली कॉंबिनेशन्स आहेत. लोकंही त्याला काहीतरी एस्थेटीक असल्यासारखं ट्रीट करतात.
बी गुड!
जनरली, गोष्टी ’sleep it off' करायच्या असतील तर हा काळ लाभदायक असतो हे माझं आपलं वैयक्तिक मत.
ReplyDeleteअशा अवेळी झोपून उठलं की मला माझं नाव काय आहे हे देखील सांगता येईल की नाही ह्याबद्दल मला शंकाच वाटते. मग थोडा काळ थांबून झर्रकन फ़्लॅशबॅकसारखं काय? कुठे? कसं? आणि केव्हा? आठवतं. मी सकाळी उठतेय की दुपारी झोपून संध्याकाळी? याचाही जाम पत्ता लागत नाही. आजूबाजूचा अदमास घेऊन ते ठरवायला लागतं. दुपारी झोप काढली आणि झोप झाल्याने आपोआप डोळे उघडले आहेत असं कधीच होत नाही त्यामुळे डोकं भण्ण होतं आणि कपाळावर आठ्यांचा बुजबुजाट.
आपण सुजून पाण्यावर तरंगतो आहे की काय असंही वाटतं एकेकदा!
थोडक्यात काय तर- सौमित्रची चांगल्या-वाईत संज्ञामधली येडझवी सकाळ तर आपली संध्याकाळ!
ते चहा-भजी उगीच. ते indivisually सुद्धा चांगलेच लागतात.कुणीतरी नतद्रष्टाने ही चहा-वडा, चहा-सिगरेट, चहा-भजी ही कॉंबो बनवलियेत. लोकंही त्याला हैला! काय भारी करत एस्थेटीकलच मानतात.
चहाने मरगळ जाते, मग तो कसाही बनवा. भजी हा वेगळाच मुद्दा आहे (काय बोलतेय मी!)
stumbled upon your blog looking for Grace. You write wonderfully. Plz keep writing. I have a question for you though. How come you dont have even a single poem of Grace like say patronage? You have your blog named after one of his poems afterall. You dont have to have it, just curious.
ReplyDeleteSaumitra is alright. Having Saumitra is better than the galli poets like sandeep.