१४० चा स्पीड,
रात्रीचा भण्ण वारा आणि...
एखाद्या कोड्यासारखा उलगडणारा काळाशार एक्स्प्रेस हायवे.
"दिल्ली बेली" मधलं "तेरे सिवा" लागतं शफलवर!!!
आणि छातीत किंवा पोटात किंवा आतड्यात किंवा फुफुस्सात कसं तरी होतं.
"तेरे सिवा" वितळत जातं कानात...
आणि उतरतं छातीत किंवा पोटात किंवा आतड्यात किंवा फुफुस्सात.
आठवण येते सगळ्याच "क्ष"न्ची.
वाटतं सगळ्या "क्ष"न्ची "क्ष"मा मागून टाकावी
किंवा आपणच माफ करावं त्यांना.
आणि सांगावं "तेरे सिवा" एकट्याने ऐकणं पाप आहे राणी!!!
विसरून जाऊया एकमेकांवर कचाकच केलेले वार.
का केले होते वार ते पण आठवत नाही खरं तर.
करून टाकूया तह या जीवघेण्या गाण्यासाठी.
ठरलं तर मग...इकडे थांबता येणार नाय.
पण एक्स्प्रेस वे संपला कि आधी फोन करायचा...
एक्स्प्रेस वे संपतोच आणि गाणं सुद्धा.
दबकून बसलेला मेंदू...
छाती, पोट, आतडी, फुफ्फुसं सगळ्यांवर थयाथया नाचतो.
'तिनी ५ वार केले होते आणि आपण फक्त ३ च'
तो निक्षून बजावतो.
'इगो बॉस' चा परफ्युम परत परत फसाफसा फवारतो.
तुमच्या "सेन्टी"पणाचं तुम्हालाच खिन्न हसू येतं...
आणि तुम्ही कुठेही न थांबता सरळ घरी जाता.
-नील आर्ते

असली रियलायझेशन्स म्हणजे ’डेथ बाय थाऊझंड कट्स’. एकदम कच्चकन मरता येत नाही, राहिलोच तर सुखाने जगू देत नाहीत साली.
ReplyDeleteखूप वर्षांपूर्वी ’इतना लंबा कश लो यारो’ हे गाणं मला वेड्यासारखा त्रास द्यायचं. तो त्रास नंतर इतका वाढला की नंतर ते शफ़ल मोड तर सोडूनच दे, प्लेयरमधून सुद्धा हद्दपार केलं होतं. तू भलताच धाडसी आहेस याबाबतीत.
तेरे बिना नावाचं 'शापित' मधलं सुंदर गाणं आहे, ’हैद्राबाद ब्लूज 2' मधलं गाणं आहे, 'गुरु'मधलं आहे गेला बाजार तेरे बिना जिंदगी से, तेरे बिना जिया जाये ना वगैरे भरपूर गाणी आहेत. पण मोठी आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तेरे ’सिवा’ नावाचं हे गाणं सोडल्यास दुसरं कुठलं गाणं आठवलं नाही.
तेरे ’बिना’ आणि तेरे ’सिवा’ मध्ये नेमका काय फ़रक असावा?
काहीच नसावा बहुतेक. का असावा?
यो!
Delete"घर" मधलं "तेरे बिना जिया जाये ना" क्लासच आहे, कसले लिरिक्स आहेत!!!
"रंग दे.." मधलं "तू बिन बताये" पण...
"दुश्मन" (संजू बाबा चा ) मधलं "प्यार को हो जाने दो" सुद्धा
ही सगळीच '"तह" वाली गाणी आहेत रे!
'"तह" वाली गाणी ..:)
ReplyDeleteबरीच आहेत नं तशी तर ....:)
मला तेरे सिवा पुन्हा ऐकायला लागेल..पण त्याच हिरोचं, "है क्या ये जो तेरे मेरे दरमियां...अनदेखी अनसुनी कोई दास्ता" कसं वाटतं......मला तर तो चित्रपटच खूप आवडतो म्हणा आणि देल्ली बेली नाही आवडला कदाचित आमिरने जेवढं हाइप केलं होतं त्यामुळे अपेक्षा वाढल्या असतील किंवा असंच काही.....
अपर्णा "तेरे सिवा" बिच्चारं फारसं गाजलं नाही सम-हाउ... अप्रतिम गाणं असूनसुद्धा...
ReplyDeleteहे "अनदेखी अनसुनी कोई दास्ता" कोणत्या पिक्चर मधलं ??
I hate Love story मधलं आहे...त्यातली खरं तर जवळ जवळ सगळीच गाणी छान आहेत..ऐक ...:)
ReplyDeleteहर एक के पास अपना अपना 'इगो बॉस' हय भाय ! :(
ReplyDeleteLayach bhari mitra... Ek number!!! :)
ReplyDeleteThnks mate!!!
DeleteNil, emotional fools and great bloggers think alike. Don't think of anyone else. It's us! :D
ReplyDeleteKaun Kare Upay... is a latest addtion to this list!
Ego Boss, worst yet most used perfume. :(