सकाळी थंड पाण्याचा पहिला तांब्या डोक्यावर ओतला की 2 गोष्टी होतात:
- मंगल चिन्ह बघून धारपांच्या कथेतल्या अभद्र भूतांनी कल्टी खावी तसा आळस पार पळून जातो.
- मला शहाणपण आणि लॉजिकचे रॅन्डम पण प्रचंड प्रोफाउंड साक्षात्कार होतात. (असंच एकदा मी सहा वर्ष वाढवत असलेल्या कमरेपर्यंत लांब केसांना कापायचं ठरवलं होतं.)
या वेळेस मला अचानक क्लिक झालं की आपल्या तुफान लोकप्रिय (तब्बल 19 फॉलोअर्स... आहात कुठे?)
ब्लॉगचं नाव चक्क अनएथिकल आहे.
म्हणजे मान्य "चंद्रमाधवीच्या प्रदेशात" हे खूप सुंदर नाव आहे आणि ग्रेसच्या ह्या कविता-संग्रहाचं नाव मला खूप म्हणजे खूप जिनिअस वाटतं...
पण ते ग्रेसना सुचलं होत आपल्याला नव्हे (करपलो सालाबादप्रमाणे!)
आणि "मेमसाब हम गरीब है मगर चोर नही"!!!
सो अंघोळ झाल्या झाल्या अंगही न पुसता...पुण्यात मेच्या दुपारी बारा वाजता जितकं कुडकुडता येईल तितकं कुडकुडत पापक्षालन करतोय:
चंद्राचा सूर्य झाला इतकंच:
बाकी ब्लॉगची व्यामिश्रता, अभिजातता, खुसखुशीतपणा, जीवनाचं समग्र दर्शन, मानवी मनाचे हळुवार उलगडणारे पापुद्रे, विचारांची खोली वगैरे-वगैरे कायम राहीलच ;)
...अवांतर... बारीक कापलेले ओले केस टॉवेलने खसाखसा पुसल्यावर फक्त पुढची दहा मिनिटंच सेक्सी दिसतात...आणि नंतर वॅक्स, जेल् किंवा जगातलं कुठलंही प्रॉडक्ट लावलं तरी तसे रहात नाहीत असं का बरं?
-एक स्वच्छ आणि गरीब पण चोर नसलेला मुलगा.
गुड मार्निंग....नाही म्हणजे लवकर आठवलं आणि नावही विंग्रेजी म्हणजे (अंतु बर्वा स्टाईल) विंग्रजीत बोलणार की काय आता.... :D
ReplyDeleteकाही नाही रे सहज लिहिलंय हे वरचं वाक्य...थोडं सुचलं म्हणून टाकलंय लगेच.....:)
आणि हो आपण गव्हर्मेंट कॉलनीतून मुक्काम कधी हलवला?? हाय !!!माझ्या मुंबईच्या छान छान पोस्ट्स टाकायचा म्हणून किती अभिमान होता मला..तू पण आता पुण्याला जाऊन मिळालास काय?? (अवांतर - इतक्यात माझे प्रचंड चांगले मित्र कामानिमित्ताने पुण्याला गेलेत...काय योगायोग आहे माहीत नाही...सगळे परतून या रे एकदाचे (मी धरून पण मी पुण्यात नाहीय़े) एकदा पार्कात भेटायला हवं सगळ्यांना....आणि नेब्युलाच्या बाहेर थोड्या चकाट्या पण पिटायला मिळायला हव्यात....)
आई ग्ग...किती मोठ्ठी कमेंट.....डिलिटावी का???
नील,
ReplyDeleteआज तुमच्या ब्लॉग ची लिंक अवचितपणे सापडली अन पहिल्याच पोस्ट मध्ये तुमची भाषा आवडून गेली. प्रत्येक गोष्टीच बारकाईने केलेलं निरीक्षण, योग्य शब्द त्यामुळे आलेला मस्त फील आवडला.
मुंबई कोलाज, गव्हर्नमेंट कॉलनी, पुण्यातल्या मुलींचे नमुने, गोष्टुली, एस इ एकस वाय म्हातारे आवडले. तुमची आणि माझी वेव्हलेन्थ कुठेतरी जुळतीये.
आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण, सहज सोप्या पण हटके शब्दात विचार मांडायची हातोटी, फार गुडीगुडी नाही कि फार चिडलेला/ बंडखोर भाव नाही.
असेच लिहित रहा.
आपला,
अनिकेत वैद्य.
अनिकेत,
ReplyDeleteखूप सारे आभार
कोणाशी तरी लिखाण/वाचना मार्फत वेव्हलेन्थ जुळणं हे तर मस्तच!!!
>>>>
फार गुडीगुडी नाही कि फार चिडलेला/ बंडखोर भाव नाही.
>>>>>
हे परफेक्ट वर्णन आहे माझ्या एकंदरीतच सध्याच्या फेजचं :)
"बाकी ब्लॉगची व्यामिश्रता, अभिजातता, खुसखुशीतपणा, जीवनाचं समग्र दर्शन, मानवी मनाचे हळुवार उलगडणारे पापुद्रे, विचारांची खोली वगैरे-वगैरे कायम राहीलच ;)"
ReplyDeleteअरे ब्बापरे... कसं काय जमतं लोकांना! :D
wink wink ;)
ReplyDelete>> पाइनॅपल सन्
ReplyDeleteआवडलं बॉस नाव आपल्याला.. रच्याक, 'मगर चोर नाही' हे ऐकून अतीव आनंद जाहला आहे ! ;)
पर्णा ,
ReplyDelete(मस्त नाव ना :) ?? माझ्या पुढच्या गोष्टुलीत एका पोरीला नक्की हे नाव देणार ),
नशीब मी आज सहज स्पॅम कमेंट्स बॉक्स उघडला आणि मला तुझी कमेंट मिळाली..
गुगल पण कुजकटपणा करतं कधी कधी!!!
माझी आता पुणे मुंबई ड्युएल सिटीझन-शिप आहे
आम्हा बर्याच आय टी वाल्यांची असते तशी!
वांद्रे आहेच शनिवार रविवार आणि सोम ते शुक्र पुणे
...
खर सांगू का मला तर ज्याम धमाल येते
मुंबई इज...वेल मुंबई!
पण पुणं पण खूप गोड आहे ...येस्स ..
अगदी पेन्शनरांच पुणे राहिल नसलं तरी
ऑलमोस्ट मुंबई इतकं चटपटीत झालंय ..पण कमी गर्दी आणि जास्त झाडं!
सो माझा तर 'जलसा'च
म्हणजे ती 'एम आर' कॉफीची आड यायची ना
"डबल मजा और काम दाम" म्हणत त्या मिश्यावाल्या लकी माणसाला दोन बाजूंनी दोन फटका मुली बिलगायच्या...तसं काहीतरी !!!
बाकी पार्क आपलं आहेच ...बहुतेक शनिवारी माझी चक्कर असतेच स्वीमिन्गच्या निमित्ताने
पुढल्या वेळी गेलो कि तुझं लव्ह देईन त्याला!!!
मला वाटलं की ती कमेंट टाकताना माझाच गोंधळ झाला की काय...आणि ब्लॉगर महाराजांना त्यात काय स्पॅम दिसलं देव जाणे..असो..
Delete"पर्णा"...हो छान आहे की.....मला ओव्हन फ़्रेशमध्ये पार्टी मिळणारे असं गृहित धरून मी नावावरचा स्वामीत्व हक्क तुझ्या नव्या गोष्टूलीसाठी सोडतेय...:) you can even book it for your (unborn) daughter..:P
ड्युअल सिटीझनशीप....:D :D सही भिडू...लोळतेय मी वाचता वाचता...:D
पुण्यातले ड्युअल सिटीझन असं काही लिहिताना बघून आता ही बातमी माझ्या नॉन ब्लॉगर मित्रमंडळींना देते की..."एम आर कॉफ़ी" धन्य रे बाबा तू.. :D :D
आता एक टोटल अवांतर पण इंपॉर्टेंट...ब्लॉगरने ती Reply नावाची लिंक दिलीय ती वापरून बघ....नाही कळलं तर माझ्या किंवा हेरंबच्या ब्लॉगवर बघ...मग तुला कमेंटना री करायची गम्मत आवडेल...:)
आणि एक पायनॅपल सन झोपला की काय??? मला वाटलं आता रोज उगवणार...(म्हणून आम्ही खूश नावासाठी....:)
यो डन!
Deleteपार्टी ड्यू!
ओव्हन फ्रेश स्पेशल नाचोज खाल्लेयत तू? मस्त असतात : सोअर क्रीम + चीज आणि तीन चार वेगवेगळ्या धान्यांचे नाचोज!
म्हणजे खाल्ल्यावर एकदम "नाचोज" "गाओज", आनंदाने उड्या "मारोज" वगैरे वगैरे !
...लवकरच काहीतरी नवीन टाकायचा प्रयत्न करेन नक्की !!!