जेम्सने नेहमी प्रमाणे धसमुसळा गोंधळ घातलाय आणि तिची तार सटकलीय.
डोळे आग ओकतायत,कुप्रसिद्ध इंग्लिश स्टिफ अप्पर लीप रागाने थरथरतोय,
आणि ताड ताड लाह्यांसारखे शब्द फुटतायत!
डोळे आग ओकतायत,कुप्रसिद्ध इंग्लिश स्टिफ अप्पर लीप रागाने थरथरतोय,
आणि ताड ताड लाह्यांसारखे शब्द फुटतायत!
"रागावल्यावर अजूनच सुंदर दिसणं" हे मिथ्थक नाही हे तिच्याकडे बघून पटतंच.
खास इंग्लिश फिटिंग वाला पॅन्ट-सूट,
छोट्या बाबू सारखा गोड बॉय-कट,
ते प्लॅटीनम ब्लॉन्ड चमकदार केस...
तिचा तो साक्षात चौकोनी चेहेरा आणि छान वय झाल्यावर होतात तसे नरम गाल... आजीच्या दुलई सारखे.
बॉन्डला फडाफडा बोलून झाल्यावर एकच गाल कळेल ना कळेलसा किं sss चित वाकडा होतो...राखाडी निळे डोळे एक दशांश क्षणभर बॉन्डच्या मायेने हळवे होतात.
पण लगेचच तिची परत 'M' होते.
-नील आर्ते
So much about 'M'!
ReplyDeleteमी हिच्यात आणि ज्युली ऍंड्र्यूज मध्ये खूप गोंधळ घालते. पण ही दिसायला खूप कडॅक आहे आहे आणि ज्युली ऍंड्र्यूज खूप गोड. मला आजी म्हणून ऍंड्र्यूज चालेल एकवेळ पण ’एम’? नो चान्स.I would love her as my mentor or fierce competitor.
ReplyDeleteतुला ’एम’च आवडते, सरसकट डेंच नाही असं दिसतंय.
S,
ReplyDeleteयो ती कडक आहेच ...खडूस सुद्धा ... but that makes her all the more sexy
त्यातच ते "डेम हूड" वगैरे... म्हणजे देवा किती किती हा 'अपील' चा काळाबाझार??
बाय द वे...मला पण ती आजी बीजी म्हणून नकोय ...मैत्रीण + डेट = चालेल = धावेल
म्हणूनच पोस्टचं नाव 'सेक्सी म्हातारे' आहे ...गोंडस म्हातारे नव्हे !
हा सीन बघ म्हणजे माझा पॉइन्ट कळेल तुला:
http://www.youtube.com/watch?v=ltXhvkGCzbA
मला सरसकट डेंचच आवडते ... पण मी तिचं M शिवाय फक्त शोकोलाट (चॉकलेट ??) बघितलंय
अजून संकुचायचं (कसं वाटल क्रियापद :) ??) म्हणजे या पोस्ट ची बहुतेक ऑ फक्त M + क्रेगच्या बॉन्ड बद्दल आहे (Casino Royale, Quantum of Solace)
अवांतर : क्रेगचा बॉन्ड नुसतं म्हटलं कि माझा पुलंचा टिल्या वस्ताद होतो...ब्रम्हानंदी टाळी आणि रिपीट टेप चालू !!!!
-०००४५१
This comment has been removed by the author.
ReplyDeleteनुस्तं ज्युडी डेंच नाही रे.... डेम... ज्युडी डेंच... जबराट बाई आहे ही.
ReplyDelete