Saturday, 29 March 2014

सपना टॉकीज :२

मंगळवारी :
सकाळपासूनच आज नभचा मूड मस्त होता.  साहेब चक्क वीस मिनटं लवकर उठले होते!
लंचसुद्धा आज त्याला 'माणसांच्या' वेळेत करायला मिळाला… आणि बेस्ट पार्ट म्हणजे हरमन आणि मनालीच्या टेबलावर त्याला बसायला मिळालं.
फुल्ल 'दिपिका स्टाइल' वन सायडेड सैल शेपट्यात हरमन खूप गोड दिसत होती आज!

त्यानं ऐटीत स्वत:चा टिफिन-बॉक्स उघडला, नाटकीपणे आतली अदृश्य चिठी काढली आणि डोळे मिचकावत तो म्हणाला, "डीअर इला…!"

हरमन खळाळून हसली आणि त्याच्या छातीत बुगूबुगू झालं!
"फायनली बघितलास वाटते तू लंच-बॉक्स?"

"यस्स बॉस काय मस्त आहे यार, इरफान खान आणि निम्रत कौर दोघंही टू गुड… "
"आणि नवाजुद्दिन पण कसला आहे ना?" हरमन चिवचिवली!

"हो ना शेखचा रोल ढासू केलाय त्यानं… "हेल्लो स sssss र" कसं बोलतो ना तो?
पण सगळ्यात भारी शेवटचा ट्विस्ट!
म्हणजे इला भविष्यकाळातली असते आणि अवकाश-काळाच्या घडीने त्यांचे डबे क्रॉस होतात वगैरे मस्तच!"

पुढे बराच वेळ फक्त नभ बोलत राह्यला आणि हरमन - मनाली अस्वस्थपणे चुळबुळत राह्यल्या!

Wednesday, 26 March 2014

सपना टॉकीज १:

 "लो sss डार्लिंग…"

"गाढवाच्या X%#त घाल तुझं डार्लिंग… आम्ही काय चुत्या आहे काय रे एकसारखा तुला फोन करायला?
भोसडीच्या परत तुला मेलो तरी फोन करणार नाय."

"मेलास तर कसा फोन करशील राजा? इट्स बायोलॉजीकली इम्पॉसिबल!", नभला हसू फुटलं…,
"अरे तिरकू असा काय रागावतो खूप बिझी होतो यार."

"हो ना तू बिझी अगदी मनमोहन सिंगपेक्षा आणि आम्ही इकडे बेकार बसलोय आम्हाला काय कामंच नायत!"

"सॉरी सॉरी सॉरी राजा असा काय मुलींसारखा रुसतो… बोल ना"

तिरक्या थोडा निवला होता… आता नुसताच गुरगुरत होता!
नभूनी ओळखलं साहेबांचा राग शांत व्हायच्या मार्गावर आहे…फायनली!

"काही नाही काल 'लंच-बॉक्स' बघितला… कसला पिक्चर आहे छोट्टे!"

"नभू परत हळहळला, 'नाही यार वेळच नाय मिळाला", आणि त्यानं घाबरून जीभ चावली!

तिरक्या परत उसळला, "अबे तू स्वत:ला खरंच मनमोहन सिंग किंवा केजरीवाल समजतो काय रे? आम्ही काय लल्लू पंजू बसलोय काय इथे? पुण्याला जाऊन जास्तच शाणा झालायस! चांगला पिक्चर वेळात वेळ काढून बघायचा असतो कळ्ळ ना? तुला पिक्चरचं वेड आहे म्हणून सांगतोय."