Wednesday, 26 March 2014

सपना टॉकीज १:

 "लो sss डार्लिंग…"

"गाढवाच्या X%#त घाल तुझं डार्लिंग… आम्ही काय चुत्या आहे काय रे एकसारखा तुला फोन करायला?
भोसडीच्या परत तुला मेलो तरी फोन करणार नाय."

"मेलास तर कसा फोन करशील राजा? इट्स बायोलॉजीकली इम्पॉसिबल!", नभला हसू फुटलं…,
"अरे तिरकू असा काय रागावतो खूप बिझी होतो यार."

"हो ना तू बिझी अगदी मनमोहन सिंगपेक्षा आणि आम्ही इकडे बेकार बसलोय आम्हाला काय कामंच नायत!"

"सॉरी सॉरी सॉरी राजा असा काय मुलींसारखा रुसतो… बोल ना"

तिरक्या थोडा निवला होता… आता नुसताच गुरगुरत होता!
नभूनी ओळखलं साहेबांचा राग शांत व्हायच्या मार्गावर आहे…फायनली!

"काही नाही काल 'लंच-बॉक्स' बघितला… कसला पिक्चर आहे छोट्टे!"

"नभू परत हळहळला, 'नाही यार वेळच नाय मिळाला", आणि त्यानं घाबरून जीभ चावली!

तिरक्या परत उसळला, "अबे तू स्वत:ला खरंच मनमोहन सिंग किंवा केजरीवाल समजतो काय रे? आम्ही काय लल्लू पंजू बसलोय काय इथे? पुण्याला जाऊन जास्तच शाणा झालायस! चांगला पिक्चर वेळात वेळ काढून बघायचा असतो कळ्ळ ना? तुला पिक्चरचं वेड आहे म्हणून सांगतोय."


"हो यार माहितीय मला पण सोमवार ते शुक्रवार फटे काम असतं रे त्यात दोन दिवस डान्स क्लास आणि तीन दिवस मी ते 'निवान्त' वृद्धाश्रमात आजी आजोबांना वाचून दाखवायला जातो ना!
शनिवार रविवार मुंबईला येतो पण वीक-एंडचा काय ना काय सीन असतोच. 
गांडू परत वीक-एन्डला तुला नाय भेटलो तर तू रुसायला तयारच!"

तिरक्या नुसताच गुरगुरला! 

"तरी एखादा पिक्चर टाकतो अधून मधून पण खूप सारे राहूनच जातात यार… 
'गॅन्ग्ज ऑफ वासेपूर' बघितला आपण पण 'डी-डे' राहूनच गेला… 
'रांझणा' बघितला पण 'क्लाउड अ‍ॅटलास' आणि 'बी. ए. पास' राह्यलाच. 
'बालक पालक' सुद्धा राह्यला… 'दुनियादारी'सुद्धा आत्ताआत्ता केबलवर बघितला.    
आत्तासुद्धा 'भाग मिल्खा भाग' , लंच-बॉक्स राह्यलेत… 'राम-लीला'चीपण सिनेमॅटोग्राफी भारी आहे असं ऐकलं, दिपिकानी एकदम बिनधास्त रोल केलाय ना?
शी यार! कॉलेज मध्ये असताना कसले पिक्चर बघायचो आपण…. मुंबईवरून पुण्याला खास फिल्म फेस्टीवल साठी जायचो! पुण्याला जॉबसाठी आलो तेव्हा काय काय प्लॅन केले होते; प्रभातची फिल्म सोसायटी जॉईन करायची, स्क्रिप्ट रायटिंगचा पार्ट टाईम कोर्स करायचा नी काय काय!
पण घंटा कशाला टाईम मिळत नाय!"

"ह्म्म्म', तिरक्या थोडा गंभीर झाला, 'शहाण्या झोपतोस किती तास?"

"हे हे हे … ९/१० तास… माझ्या फ्लॅटवर मस्त गार असतं यार आणि उठवायला पण कोण नाय ना! थकून घरी येउन एक वाजता झोपलो की डायरेक्ट दहालाच डोळे उघडतात… खिक्क!"

"ह्म्म्म", तिरक्या आता सिरीयसली थिंकिंग मोडमध्ये घुसला होता,
"आमच्या कंपनीच्या नवीन प्रॉडक्टचं टेस्टिंग चालू आहे… एक काम कर वीकेन्डला भेट, कदाचित तुला हेल्प करू शकेन मी!"

पुढच्या सोमवारी रात्री:
नभूनं शेवटचा कस्टमर इशू फिक्स करून मेल पाठवली आणि कडकडून आळस दिला.
त्याचे डोळे गपागप मिटायला लागले होते.
डोक्याच्या मागच्या बाजूला किंचित दुखत होतं पण तिरक्या म्हणाला होता ते तीन चार दिवसांत पूर्णपणे थांबेल.

त्यानं 'सपना टॉकीज' ची  वेबसाईट उघडली.
'हम्म कोणता पिक्चर स्वप्नूयात  आज?'
'स्व - प्नू - या - त' आवडला शब्द त्याला… स्वत:वरच खुष झाला तो!
गुणगुणत त्यानं  'द लंच-बॉक्स' सिलेक्ट केला!
गणेश मतकरी, करण अंशुमान, राहुल देसाई आणि खुद्द तिरक्या साहेबांनी खूप नावाजला होता पिक्चर.

युज वाय-फाय स्ट्रिमिंग - क्लिक!
स्टार्ट मूव्ही आफ्टर आर. इ. एम. स्लीप सायकल सेट्स इन - क्लिक!
लॅपटॉपमध्ये पुरेशी बॅटरी - चेक!
अशी मनासारखी तयारी झाल्यावर तो समाधानाने पांघरुणात घुसला.

....क्रमश:

4 comments:

  1. बढीया !!

    "Lucia" नामक एक कन्नड मुव्ही आहे (with subtitles). जरूर पहा. आवडेल.

    ReplyDelete
    Replies
    1. लिना, नक्की बघेन …. खरंच सपना टॉकीज असलं पायजे होतं... सगळा मूव्हीज चा backlog पुरा करायला!
      काल फायनली क्वीन बघितला …. 'वेड' पिक्चर आहे 'वेड' !!!!

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete