Saturday, 29 March 2014

सपना टॉकीज :२

मंगळवारी :
सकाळपासूनच आज नभचा मूड मस्त होता.  साहेब चक्क वीस मिनटं लवकर उठले होते!
लंचसुद्धा आज त्याला 'माणसांच्या' वेळेत करायला मिळाला… आणि बेस्ट पार्ट म्हणजे हरमन आणि मनालीच्या टेबलावर त्याला बसायला मिळालं.
फुल्ल 'दिपिका स्टाइल' वन सायडेड सैल शेपट्यात हरमन खूप गोड दिसत होती आज!

त्यानं ऐटीत स्वत:चा टिफिन-बॉक्स उघडला, नाटकीपणे आतली अदृश्य चिठी काढली आणि डोळे मिचकावत तो म्हणाला, "डीअर इला…!"

हरमन खळाळून हसली आणि त्याच्या छातीत बुगूबुगू झालं!
"फायनली बघितलास वाटते तू लंच-बॉक्स?"

"यस्स बॉस काय मस्त आहे यार, इरफान खान आणि निम्रत कौर दोघंही टू गुड… "
"आणि नवाजुद्दिन पण कसला आहे ना?" हरमन चिवचिवली!

"हो ना शेखचा रोल ढासू केलाय त्यानं… "हेल्लो स sssss र" कसं बोलतो ना तो?
पण सगळ्यात भारी शेवटचा ट्विस्ट!
म्हणजे इला भविष्यकाळातली असते आणि अवकाश-काळाच्या घडीने त्यांचे डबे क्रॉस होतात वगैरे मस्तच!"

पुढे बराच वेळ फक्त नभ बोलत राह्यला आणि हरमन - मनाली अस्वस्थपणे चुळबुळत राह्यल्या!



शनिवारी संध्याकाळी :
तिरक्या डोकं पकडून बसला होता आणि नभ नखं चावत चावत विचार करत होता ,

"आयला म्हणजे लंच-बॉक्स मध्ये ते ईला आणि फर्नांडीस वेगवेगळ्या काळातले नसतात?"

"नाय! आजच्या काळातलेच असतात ते."

"आणि 'भाग मिल्खा' मध्ये मिल्खा सुसाट धावून ऑलिंपिकमध्ये गोल्ड नाय मिळवत?"

"नाय! मिल्खानी मागे वळून बघितलं आणि त्याचं मेडल हुकलं हे तुला माहितीय ना गाढवा?"

"तरी मला वाटलंच इतिहास एवढा कसा फिरवतील हे लोकं आणि पिक्चरपण लवकर संपल्यासारखा वाटला!
पण मज्जा आली असती ना मिल्खाला खरंच मेडल मिळालं असतं तर?"

तिरक्याला हसावं की रडावं कळत नव्हतं!

"मग राम-लीलामध्येपण बा शेवटी येउन राम आणि लीलाला वाचवत नसेलच?"
नभ थोडा हिरमुसला!

"नाय मरतात ते…"

"तरीच हरमन दोन तीन दिवस मला विचित्र लुक्स देत होती! अरे देवा तिला मी सायको वाटलो असणार!"

"हम्म…अजुन एका चित्रकाराने सुद्धा असे भलतेच क्लायमॅक्स बघितलेत.
आय थिंक,  काही लोकं स्वप्नात पिक्चर बघता बघता स्वत:चं इंटरप्रिटेशन किंवा विशफुल थिंकिंग मूळ कथेत मिसळतायत!
मिल्खाला मेडल मिळालं पायजे होतं असं तुला अगदी शाळेपासून वाटायचं माहितीये ना?"

"हो ना!…
शिवाय ते 'एक दुजे के लिये' मध्ये वासू-सपना मरतात तेव्हा लहानपणी हमसा-हमशी रडलो होतो मी.
मला वाटलं आता राम -लीला तरी सुखाने एक झाले… फूल्टू खुश झालो होतो मी!"

"थोडक्यात काय तर प्रोजेक्ट "सपना टॉकीज" टेस्टिंग मध्येच फेल झालंय. लोकांना स्वप्नात पिक्चर दाखवणं वाटलं तितकं सोपं नाहीये स्पेशली जे लोक क्रिएटीव आहेत त्यांच्यासाठी तर नाहीच नाही."

"है ना? म्हणजे तू मान्य करतोस मी क्रिएटीव आहे…ये sss य!", नभ तिरक्याच्या पोटात ढुश्या देत म्हणाला!'

"हो बाबा हो माकड म्हणतं माझीच लाल…"

"एकंदरीत काय सध्यातरी मला थेटरातच जावं लागणार पिक्चर बघायला"

"होय… झोप जर कमी कर आळशा!"


उपसंहार: (काही दिवसांनी)

"हॅलो… कुठे आहे बे?"

''क्वीन' बघायला चाललोय!"

"एकटाच?"

"एकटाच कशाला… झकास डेट आहे माझ्याबरोबर!"

"कोण रे? हरमन?"

"नाय! तिला उद्या भेटणार… आम्ही दोघांनी पार्टटाईम स्क्रिप्ट रायटिंगच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतलीये."

"सही है बॉस!… मग आज कोण?"

"निवान्तमधल्या साठे आज्जी… वीकली रिडींगच्या तीन दिवसांतला एक दिवस आम्ही पिक्चर बघणार आहोत!
चल पळतो पिक्चर चालू होतोय"…

"साठे आज्जी, पॉपकोर्न कोणते? चीज की कॅरामल'?"


************************ समाप्त ************************
-नील आर्ते

9 comments:

  1. पहिला भाग वाचल्यावर मी विचार केला कि ह्याने ह्याच भागात सगळं उघड केलं मग अजून काय राहील....
    पण क्रिएटीव वाला ट्विस्ट आवडेश!!

    ReplyDelete
  2. Very engaging..could picture you all through the story :-)

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Doll!
      I have started getting that a lot!
      Honest answer: Yes & No both!
      (Like some fuzzy state of particles)
      You never know:

      Lines between real life, wishful thinking & pure flight of fancy are very blurred.
      That's the fun part ;)

      Delete
  3. Source Code baghitlas ka?? You would find it interesting..!!

    ReplyDelete
  4. "धनंजय"मध्ये वाचलेलं... खरंच सपना टॉकीज हवं होतं... कित्ती मूव्हीज, short films लिस्टवरच आहेत अजून... तुम्ही मातीमाय, देवराई, नितळ, अहल्या पाहीले असतीलच. "परमा" जरूर बघा. बंगाली चित्रपट. हिंदीमध्ये डब केलेला यू ट्युब वर मिळेल. राखी फारशी आवडली नाही कधी पण यात कमाल दिसलेय.

    ReplyDelete
    Replies
    1. थँक्स 'सपना' आय मीन स्वप्नाली :)
      तू सांगितलेले वरचे कुठचेच पिक्चर बघितले नाहीयेत :(
      पण बघतो नक्की: खास करून परमा आणि देवराई.

      Delete