त्यानं कथा संपवून शेवटचं 'समाप्त' टाईप केलं आणि खुशीत कडकडून आळस दिला!
हाताची बोटं कटाकट मोडली… मान डावी उजवीकडे वाकवली आणि कथेकडे एक नजर टाकली.
छान जमली होती कथा… या वेळचं त्यांच्या ऑनलाइन सायन्स -फिक्शन कट्ट्याचं चॅलेंज होतं "लाल रंग"…
काय काय टाकलं होतं त्यानं कथेत: मर्लॉट वाइन, रासबेरी आईस्क्रीम, व्हॅलन्टाइन डे, ठिबकणारं रक्त आणि बरंच काय काय!
मनासारखं लिहून झाल्यावर त्याला नेहमीप्रमाणे सह-कट्टेकरी आणि खास दोस्त प्रसन्ना करंदीकरची आठवण आली आणि त्यानं फोन लावला,
"अरे पैलवान आहेस कुठे? गायबच झालास तू तर!"
"अरे इकडे मालवणच्या आतल्या भागात नेटवर्क नाय मिळत. पण एक मस्त सुमसाम पठार शोधलंय… कुडाळपासून १६ किलोमीटरवर! आपली लोकं पुढच्या वेळी लॅन्ड करतील तेव्हा त्यांना उतरायला आयडियल जागा आहे. तुझं काय चाललंय?"
"आत्ताच आपल्या या वेळच्या चॅलेंजची कथा लिहिली, लाल रंगावर!"
"आईल्ला भारी आहेस तू तर… मी तर यावेळचं चॅलेंज पास ओव्हर करायच्या विचारात होतो. आपली कंडीशन कळली तर कट्ट्यावरच्या लोकांना संशय येईल रे!"
"मी पण पास ओव्हरच करणार होतो पण मग विचार केला प्रयत्न तर करूया!
शिवाय ही कंडीशन इकडच्या पण १ टक्के पुरुषांत असते. तेव्हा फक्त प्रोटॅनोपिया असला म्हणून लगेच काही पकडले नाही जात आपण!
पण खरं सांगू का, या लोकांमध्ये 'पॅशन' हा काहीतरी भन्नाट कन्सेप्ट आहे रे.
तो अनुभवायचा होता ,मला या कथेच्या निमित्ताने."
"हे पॅशन काय असतं?"
"अरे देहाची, निसर्गाची, परिस्थितीची साथ नसताना सुद्धा कधी कधी अचाट कामं करतात ही लोकं केवळ एखाद्या गोष्टीच्या-माणसाच्या प्रेमापायी!
माझा नवीन मित्र झालाय जग्गू, त्याची बायको प्युअर व्हेज आहे पण फर्स्ट क्लास नॉन वेज जेवण बनवते
जग्गुला आवडतं म्हणून… चव सुद्धा न घेता!
कालच एका ठिकाणी कर्ण बधीर मुलांचा नाच बघायला गेलो होतो… काय सुंदर नाचत होती रे ती पोरं!
एक बीट चुकत नव्हता त्यांचा!
आजसुद्धा पेपर मध्ये बातमी आलीये राजाभाऊ साळुंकेनी प्रोस्थेटिक लेगवर एव्हरेस्ट सर केल्याची!
कधी कधी वाटतं ना आपल्या 'करंदी' ग्रहावर सगळं खूप जास्तच रॅशनल आहे… अति लॉजिकल!
आपल्या 'शक्यन्त्रा'ने ७० टक्क्यांपेक्षा जास्त यशाचा अंदाज दिल्याशिवाय आपण कुठलं काम हातात घेतलच नाहीय गेली काहीशे वर्षं.
एव्हढी प्रगती करून सुद्धा म्हणूनच आपला ग्रह संपत चाललाय कदाचित!
इकडची माणसं बघ भांडतात, हेवेदावे करतात, चुकतात, पडतात पण आय थिंक हा पॅशन त्यांना तगवेल, पुढे घेऊन जाईल!"
"आयला तू तर ह्या ग्रहाचा फॅनच झालायस, आडनावसुद्धा अगदी बरोबर घेतलयस: अर्थ - आर्थे - आर्ते!"
"हाहा हा, हो ना आणि तू आपल्या मातृग्रहाचं 'करंदीच'च आडनाव ठेवलयस!
पण सिरीयसली तू सुद्धा ट्राय कर "लाल" वर कथा लिहायची… रेफरन्सेस तर काय मित्रांशी गप्पा मारल्या तरी मिळतात हवे तितके. आणि नेटोबा आहेच!"
"यस बॉस ट्राय करतो नक्की!
शिवाय दोन तीन महिन्यांत या नवीन पठारावर आपलं रसद यान येईल तेव्हा आर्टीफिशियल 'एल' कोन्स मागवतो. टाकून देऊया रेटिनामध्ये हाय काय नाय काय!
चल ठेवतो फोन…संडासचा नळ थरथरतोय करंदीवरून मेसेज येतोय! "
"बाय…वन्दे करंदी!"
नीलनं फोन ठेवला आणि परत आळस देत गॅलरीत नजर टाकली,
भण्ण उन्हात फुललेला काळाशार गुलमोहर त्याच्याकडे बघून हसत होता!
-नील आर्ते
>>अर्थ - आर्थे - आर्ते
ReplyDeleteअशक्य आहेस तू नील :)
:) It was our sci-fi katta challenge story...Topic ws...an alien joins our online katta1
Delete"3rd Rock from the Sun"ish but in Marathi..nice try but my suggestion would be to rework on this and tie it nicely :-).
ReplyDeletegot it bro!
Deleteआता तुझ्या आडनावाचा 'अर्थ' कळला ;-)
ReplyDelete;)
Delete