दुसऱ्या दिवशी
डॉ. मोटेंच्या चेकअप रूममध्ये:
डॉक्टर बाबाराव मोटे जागच्या जागी एक्साइटमेन्टनी उसळ्या मारत होते,
"इंटरेस्टींग... इंटरेस्टिंग व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग..."
उपसंहार:
----------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------
-नील आर्ते
डॉ. मोटेंच्या चेकअप रूममध्ये:
डॉक्टर बाबाराव मोटे जागच्या जागी एक्साइटमेन्टनी उसळ्या मारत होते,
"इंटरेस्टींग... इंटरेस्टिंग व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग..."
"अहो डॉक्टर... इंटरेस्टिंग आहे ते कळलं SSS पुढे बोला.",
पार्थसारथींनी वैतागून म्हटलं.
डॉक्टर सांगू लागले,
"गुड न्यूज अशी आहे की बॅक्टेरियांचा काउंट किंचित का होईना कमी झालाय.
म्हणजे वीस मिलियन होता तो अठरा मिलियन झालाय.
ऍंटीडोट बनवण्यासाठी आपल्याला आणखी एक दिवस डेस्परेटली हवा होता... तो मिळालाय.
आता आपण शौर्यचे डोळे वाचवू शकू...
पण मी विचार करतोय की हे झालं कसं?
शौर्य काल दिवसभर काय काय केलंस सांग बघू?"
"विशेष काही नाही, सगळ्या गोष्टी बघून घेतल्या डोळेभरून"
"काही स्पेशल बघितलंस किंवा केलंस?"
शौर्य अडखळत म्हणाला,
"एका छान मुलीबरोबर... रात्री... वुई मेड लव्ह!"
मोटे विचारात पडले,
"हम्म... सेक्सचे फिजिओलॉजिकल फायदे आहेतच... पण डोळ्यांसाठी एवढा फरक पडेल... वाटत नाही... अजून काही?"
शौर्य ओशाळला,
"ढसाढसा रडलो मी काल रात्री."
"रडलास... हम्म ओके... म्हणजे अश्रू... येस्स!",
मोटेंचा चेहेरा उजळला,
"सिम्पल व्हेरी सिम्पल... काय झालं असणार सांगतो:
आपल्या डोळ्यांतून पाझरणाऱ्या अश्रूंचे विविध प्रकार असतात.
एक म्हणजे 'बेसल टिअर्स'. जे मी पहिल्या मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे कायम बाहेरच्या इन्फेक्शन्सशी लढत असतात.
शौर्यच्या डोळ्यांतल्या जिवाणूंचं मुख्यत्वेकरून ह्याच बेसल टिअर्सबरोबर युद्ध चाललं होतं आणि तेव्हातरी जिवाणू जिंकत होते.
पण मग काय मज्जा झाली..."
"दुसऱ्या प्रकारचे अश्रू म्हणजे सायकॉलॉजिकल टिअर्स ज्याला आपण विपिंग किंवा रडणं म्हणतो ते.
जे माणूस खूप दु:खी किंवा चिंताक्रांत किंवा आनंदी झाल्यावर येतात.
त्यांच्यात प्रो-लॅक्टीन, ल्यू-एन्केफेलीन इत्यादी द्रव्यं असतात. जी नॅचरल पेन किलर्सचं काम करतात.
पण कदाचित त्यांच्यातही बॅक्टेरियाजशी लढण्याची शक्ती असावी असं वाटू लागलंय...
किंवा किमान या नवीन प्रकारच्या विचित्र बॅक्टेरियाजशी झगडण्याचं काही रासायनिक अस्त्र या अश्रूंमध्ये असावं.
म्हणजे मूळ बेसल अश्रूंच्या मदतीला हे मानसिक अश्रू धावून आले... शौर्यच्या रडण्यामुळे.
फायटिंगमध्ये अमिताभच्या मदतीला शत्रुघ्न सिन्हा, बॅटमॅनच्या मदतीला रॉबिन किंवा हॅरी पॉटरच्या मदतीला नेव्हिल लॉंगबॉटम धावून जातो तसं.
या सगळ्यामुळे आपल्याला वेळ मिळालाय ऍंटीडोट बनवायला आणि नवी दिशाही."
...
...
...
शौर्यच्या डोळ्यांतून पुन्हा घळाघळा पाणी वाहू लागलं... आनंदाने...
आणि डॉक्टर मोटे धावत जाऊन ते अश्रू टेस्टट्यूबमध्ये गोळा करू लागले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
आदिलच्या फोनवर जमुनाचा मेसेज झळकला,
"पैसे मिळाले... ठरल्यापेक्षा खूप जास्त आहेत. थँक्स :)
होप युवर बिलव्हेड फ्रेंड हॅड अ गुड टाइम ;)"
आदिलनं रिप्लाय केला,
"तुला थँक्स खरंतर... फॉर एव्हरीथिंग :)"
----------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------
-नील आर्ते
Predictable hotey asa watata watata shewatala twist , maja aali . tich warnan katil
ReplyDeleteThanks dude... been a while.
DeleteHows u?
mi ekdum majet re. Hows you been ?
Delete