शौर्य आणि जमुनाच्या गप्पा रंगत गेल्या...
लंचनंतर आदिलनं त्यांना एकटं सोडत अलगद कल्टी मारली.
ते दोघं उबेर पकडून शौर्यच्या फ्लॅटवर आले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते.
आजूबाजूच्या बिल्डिंग्ज आणि खालच्या झोपडपट्टीतसुद्धा दिवे लागले होते.
जमुना बघत राहिली... उंचावरून दिसणारी ती लखलखती मुंबई... डोळे भरून.
आणि शौर्य तिला बघत राहिला... डोळे भरून.
तिला ते जाणवलंच...
मिस्कील हसत ती म्हणाली,
"तुझ्या फ्रेंडची ओपनिंग लाईन भारी चीप होती...
मी तर चौकडीच मारली होती तुम्हा दोघांवरही... पण मेटालिकाचा फॅन म्हटल्यावर मला रहावेना.
पण काहीही होतं ते, तुझे डोळे जाणार आहेत वगैरे... नॉन्सेन्स."
शौर्य हलकेच उत्तरला,
"पण ते खरं असेल तर"
"चल घटकाभरासाठी मान्य करूया की ते खरं आहे...
काय काय मिस् करशील तू असं काही झालं तर?"
शौर्यनं एकदा आजूबाजूला बघितलं,
"सगळंच...
ही पसरलेली मुंबई... खालची झोपडपट्टी...
विंडसस्क्रीनमधून भर्र उलगडणारा एक्सप्रेस-वे...
पंकज भोसलेचे रविवारचे सिनेमावरचे लेख आणि नंतर जाऊन बघितलेले ते सिनेमे...
चित्रं: चंद्रमोहनची, व्हॅन गॉगची, पॉल क्लीची...
फेसबूकवरल्या रेणुका खोतच्या बेधडक पोस्ट्स...
त्या त्या समोरच्या ज्वेलरीच्या ऍड मधल्या केवड्यासारख्या दिसणाऱ्या श्रुती मराठेचं होर्डिंग...
'पुणे बावन्न'मधले सईचे ते गारुड करणारे डोळे...
माधुरीचं स्माईल...
आणि अर्थातच आयुष्यात आलेल्या खऱ्याखुऱ्या असंख्य बायकांची व्हिजन्स:
विविध वयाच्या जाड्या-बारीक काळ्या-गोऱ्या प्रत्येकीत काहीतरी जीव ओवाळून टाकावं असं...
कुणाची खळी, कुणाच्या हनुवटीवरचा खड्डा, कुणाचे मधाच्या रंगाचे केस...
कोणाचं हसू, कोणाचं रडू,
कुणाचे वेडेवाकडे सेक्सी दात,
कुणाचा पिंपल भरलेला गोंडस चेहेरा,
कुणाच्या ओठांची धनुकली.
कुणाचं पोट... कुणाचं कॅमल टो... कुणाचा मफिन टॉप... कुणाची लव्ह हँडल्स.
कुणाची सालसाची गिरकी,
कुणाचे जीन्समधून अलंग मलंग डुलणारे कुलंग.
कुणाच्या मानेवरचा तीळ.
कुणाची सिग्रेट प्यायची लकब,
कुणाचा चकाकता चष्मा,
कुणाचं रुबाबदार स्टिअरिंग वळवणं.
कुणाची पांढऱ्या लखनवी कुर्त्यातली कलंदर ब्लॅक ब्रा..."
भडाभडा बोलणारा शौर्य गप्पकन थांबला.
त्याची छाती धपापत राहिली.
जमुना दोन क्षण बघत राहिली त्याच्याकडे स्थिर नजरेनं... मग हसली... आईच्या मायेनं.
"तुम्हा पुरुषांचं सगळंच खूप व्हिज्युअल असतं... हो ना? "
शौर्यनं मान हलवली लहान बाळासारखी... आणि जमुनानं तिचा टी-शर्ट काढून टाकला.
जांभळ्या ब्रेसियरमधल्या तिच्या त्या गाभाऱ्यातल्या दिव्यांसारख्या सावळ्या स्तनांकडे शौर्य बघत राहिला कितीतरी वेळ... आणि अचानक त्याला रडू फुटलं.
हमसून हमसून रडत तो तिच्या कुशीत शिरलाआणि त्याच्या अश्रूंनी तिची वत्सल छाती पार भिजवून टाकली.
क्रमश:
(पुढचा शेवटचा भाग लवकरच )

No comments:
Post a Comment