आज्जी पिक्चर खरं तर एका असाइनमेन्टचा भाग म्हणून बघितलेला.
स्वतःबरोबरच डेट करायची असाइनमेन्ट... धम्माल करायची, स्वतःला पॅम्पर करायचं अशी ती असाइनमेन्ट होती.
आणि त्यासाठी 'आज्जी'ला गेलो.
ते चुकलंच जरासं...
काही पिक्चर एवढे अंगावर येणारे आणि ब्रिलियंट असतात की त्यांना अप्रतिम, सिनेमॅटिक जेम, ढासू स्क्रिप्ट वगैरे वगैरे म्हणणंही खूप एक्सप्लॉईटेटिव्ह वाटू शकतं.
म्हणजे कौतुक तर करायचंय पण त्यातला कन्टेन्टच इतका खरागर्द, काळाशाsssर आहे की स्तुतीचे या मितीतले सगळे शब्द भंपक वाटू शकतील...
अशी गोची झालीय माझी.
पण रहावत तर नाहीयेच.
हायवेवरून निवांत चाललेली आपली आरामशीर ए.सी. कार कुणीतरी अचानक थांबवून आपल्याला बाहेर खेचावं...
आणि बळजबरीनं दाखवावा समोरचा रक्ता-मांसाचा चिख्खल... हायवेवर रोड-कीलमध्ये मारल्या गेलेल्या ढोराचा.
तशी घट्ट मानगूट पकडली या मूव्हीनं.
मी तसा स्वतः:ला बऱ्यापैकी स्ट्रॉंग वगैरे समजणारा पण इकडे मात्र मला क्षणोक्षणी पळून जावंसं वाटत होतं.
आणि त्याचवेळी समोर काय चाललंय ते खिळवून सुध्दा ठेवत होतं... सापाच्या तोंडातल्या उंदरासारखं.
सगळा मूव्ही बघताना ओटीपोटातून चालू होऊन आख्ख्या शरीरात पेटके पसरत होते...
भयाचे, रागाचे, दु:खाचे, वेदनेचे (आणि एक आनंदाचासुद्धा).
फार काही रिव्हील करणार नाहीये मी पण तो एक मॅनिक्वीनचा सीन... नो फकिंग वर्ड्स!
आणि सुषमा देशपांडे...
या बाईंना मला एकदा भेटायचंय आणि फक्त त्यांचे दोन्ही हात घट्ट हातात घेऊन कपाळाला लावायचेत...
आणि खुप सारं थँक्स म्हणायचंय...
अजून काय सांगू?
आता मूव्ही भडक आहे, बीभत्स आहे किंवा गिमिकी आहे असं काही जणांचं आर्ग्युमेण्ट असू शकतं.
पण पर्सनली मला तरी ते सगळं प्रचंड रिलेव्हन्ट वाटलं.
असं होऊ शकतं (किंवा काही प्रसंगांबाबत व्हावं) असं वाटण्याचं श्रेय आपल्या समाजाकडे आणि या चित्रपटाकडे परफेक्ट विभागून जातंच
आणि शेवटी चित्रपट अनुभवणं ही पर्सनल गोष्टच असते मुदलात.
घरी आलो तेव्हा आईला, बहिणीला, जिवाभावाच्या मैत्रिणींना छातीजवळ घट्ट पकडून त्यांच्या कपाळाचे मुके घेत रहावे अशी काहीतरी खूप खूप माया दाटून आलेली.
'रेगे' आणि 'सैराट' बघितल्यावर सुद्धा असंच काय काय विचित्र वाटत राह्यलेलं... हा मराठी सिनेमाचा विजयच.
तर लोकहो,
प्लीज बघा हा मूव्ही.
तुम्ही माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये असाल आणि नाही आवडला 'आज्जी' तुम्हाला तर...
तिकीट दाखवा आणि माझ्याकडून रिफंड घेऊन जा...
प्रॉमिस!
-नील आर्ते

Apratim
ReplyDeleteNakki baghem me nil.
Yes please watch.
ReplyDelete