Saturday, 3 September 2011

तो एक ब्लॉगर होता

तो एक ब्लॉगर होता ....रोज ब्लॉग टाकायचा आणि चेक करायचा एकसारखा ...
नवथर प्रेमिकाच्या उत्साहाने...
कोणाला आवडले कोणी कमेंट्स टाकल्या ...कोण फॉलो करतेय का ?
नवी कमेंट आली की तो तरारून यायचा .
आणि ६ चे ७ फॉलोअर झाले तेव्हा तर नाचता नाचता त्याचा टॉवेल सुटला .

तो एक ब्लॉगर होता ...पण त्याला भूकही लागायचीच आणि त्यामुळे अर्थातच कामही  करावं लागायचं.
पण प्रोग्राम लिहिता लिहिता ....एक्लिप्स आणि rally च्या गुंत्यात आणि...बोअरिंग मिटींग्समध्ये..
तो laptop अर्धवट झाकून साळसूदपणे टाईप करायचा ...
पावसाच्या थेंबांची गाणी ...प्रेमभंगाची तडफड आणि दही हंडीची नशा !!!

तो एक ब्लॉगर होता....त्याला सिरीअसली वाटायचं की लोकांनी दिवसभर त्याचा ब्लॉग चेक करायला हवा किमान फेसबुकवर लाईक तरी,
पण वेडे लोक मुलांची admission , कर्जाचे हप्ते , आजारपण वगैरे क्षुल्लक गोष्टींतच अडकून राहायचे ,
आणि त्याचा ब्लॉग तसाच राहायचा ....नटून छान तयार होऊनही बॉय-फ्रेंड ने टांग दिलेल्या पोरीसारखा ....वाट बघत.


पण तो फारसं वाईट वाटून घेत नसे ....कारण तो एक ब्लॉगर होता .
सकाळी उठून त्याने नव्या उत्साहाने ब्लॉग उघडला आणि ...
३ नवीन कमेंट्स होत्या ...मनापासून लिहिलेल्या ...
त्याचं पुन्हा फुलपाखरू झालं कारण तो एक ब्लॉगर होता....आणि ते तिघंसुद्धा :)

-नील 



6 comments:

  1. तो एक चक्रम ब्लॉगर असावा अगदी तुझ्या आणि माझ्या सारखा :) मस्त वाटला वाचून...
    http://chakramblogger.wordpress.com

    ReplyDelete
  2. छान लिहिलं आहे!!! :-)

    ReplyDelete
  3. हाहा.. बेस्टच.. अरे मस्त मस्त पोस्ट्स टाकल्या की कमेंट्स येणारच :))

    ReplyDelete
  4. चक्रम , हेरंब , रोहन ...अशा कमेंट्सच त्याचं फुलपाखरू बनवतात :)
    thanks !!!

    ReplyDelete
  5. हेरम्ब +१ ..
    हे एक चक्र आहे : चांगल्या पोस्ट >> कमेंटस >> अधिक चांगल्या पोस्ट्स >> अधिक आणि चांगल्या कमेंट्स >> अधिकाधिक चांगल्या पोस्ट्स :D

    तुला आलेला अनुभव मी पण घेतलाय निलभौ ! :)

    ReplyDelete
  6. आणि ते तिघंसुद्धा...:)

    ReplyDelete