माझी एक खडूस मैत्रीण काल मला "दादाजी" म्हणाली (#$%@#)
आणि मला वेड्यासारखे एकामागोमाग एक सेक्सी म्हातारे आठवायला लागले:
पहिला आठवला अर्थातच "इफ्तेकार"! कसला होता तो!!
उंच शिडशिडीत,
भव्य कपाळाला शिस्तीत इमानदारीत जागा करून देणारे पाठी वळवलेले केस,
उंचावलेली चीक-बोन्स,
पेरेनिअल पोलीस ऑफिसरला शोभणारे ते करारी पण आधार देणारे डोळे,
दमदार आवाज,
आणि त्याची ती जगप्रसिद्ध पातळ जिवणी!
फुल खाकी शर्टाच्या त्या कोपराच्या वर पर्यंत दुमडलेल्या बाह्या,
(हीच स्टाइल नंतर 'शत्रू'ने 'मेरे अपने', 'कालीचरण' वगैरे मध्ये उचलली),
पातळ जिवणीतून लोंबणारी ती सिगरेट,
आणि हातातली ती केन ...
मार डाला!
डॉन, जंजीर, शोले आणि एक लाख इतर पिक्चर मधला पोलीस ऑफिसर किंवा 'दीवार' मधला दिलदार स्मगलर बॉस...
ही वॉज जस्ट टेलर-मेड!
लहानपणी कधीतरी 'इत्तेफ़ाक़' बघितला आणि त्याच्यात हा 'इफ्तेकार'
माझ्या चिमुकल्या मेंदूत 'इत्तेफ़ाक़' आणि 'इफ्तेकार' मध्ये भारी कन्फ्युजन व्हायचं!
(तसं ते परवीन बाबी आणि झीनत अमान मध्ये पण व्हायचं;
अनिल कपूर आणि राज किरण मध्ये सुद्धा )
पण मी तेव्हापासूनच ठरवून टाकलं होतं म्हातारं व्हायचं तर 'इत्तेफ़ाक़' आपलं...चुकलो 'इफ्तेकार' सारखं!मला नेहमी वाटायचं की तो खऱ्या आयुष्यात ही एकटाच असणार आणि रोज रात्री आरामखुर्चीत बसून जुनी हिंदी गाणी नाहीतर क्लासिक वेस्टर्न म्युझिक ऐकत सुंदर कट-वर्कवाल्या ग्लासातून स्कॉच पीत असणार...
कुणास ठाऊक खरं काय होतं?
पण माझा मात्र तो "सेक्सी म्हातारा" होता; शेलाटा, क्लासी आणि एलीगंट!
-नील आर्ते
gr8 boss.....
ReplyDeleteYo thnx Hard!
ReplyDeleteइफ्तेकार खरंच ग्रेट होता..
ReplyDeleteरच्याक, परवीन बाबी आणि झीनत अमान हे ग्लोबल कन्फ्युजन आहे !! :)
Nil .... Mastach Lihilas ! Tuzya Matashi Mi 101% Sahamat Aahe.
ReplyDeleteरच्याक, परवीन बाबी आणि झीनत अमान हे ग्लोबल कन्फ्युजन आहे !!...ditto..
ReplyDelete