Sunday, 22 April 2012

सेक्सी म्हातारे: २

तो खळ्या पाडत हसला कि त्याचे पांढरे शुभ्र वेडेवाकडे दात चमकतात!
काष्ठ शिल्पासारखं ते टिपिकल आफ्रिकन नाक...
जॅक डॅनिअल व्हिस्की सारखा आवाज...

आणि ते बोलके डोळे:
'ब्रूस ऑल मायटी' मधल्या मिस्कील जगन्नियन्त्याचे...
'अन-फर्गीव्हन' मधल्या सच्च्या साथीदाराचे...  
'सेवन' मधल्या रिटायर होता होता परत रक्ता मासाच्या खातेर्यात खेचला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे...
'वॉन्टेड' आणि 'लकी नंबर स्लेवीन' मधल्या हलकट बॉसचे...
'मिलिअन डॉलर बेबी' मधल्या एका डोळ्याने अधू बॉक्सरचे ...


मॉर्गन फ्रीमन सौंदर्याच्या बोअरिंग कन्व्हेन्शनल व्याखेत बसत नाही.
पण काहीतरी खास आहे त्याच्यात...यम्मी, नो फ्रिल्स, आणि प्रचंड सकस...आदिवासी पाड्यावरची नाचणीची भाकर असते तसं!

खरं तर तो सुद्धा एक मळकं धोतर नेसवलं तर आरामात आपला आदिवासी म्हणून खपून जाईल!
'जैत रे जैत : भाग २' मध्ये "मार्गू"  म्हणून ??? :D


-नील आर्ते





5 comments:

  1. बेस्टच... पण राजे मॉर्गन फ्रीमन बद्दल लिहिताना शॉशांक रीडिंप्शन बरे विसरलात ! :)

    ReplyDelete
  2. एर्र उम्म्म्म ...आता कसं सांगू...पण मी मूढाने 'शॉशांक रीडिंप्शन' अजून बघायचाय :(

    ReplyDelete
  3. हेरंबशी सहमत....:)
    अवांतर, बाकी तुझ्या पिढीतल्या लोकांनी एस इ एक्स वाय शब्दाची व्याख्या बदललीय त्यामुळे तू या म्हातार्‍यांना तसं बिनदिक्कत म्हणू शकतोस नाही?? मी तर आता माझ्या छोट्या मुलाच्या मनावर वैट परिणाम होऊ नये म्हणून कुठेही या शब्दाचं स्पेलिंगच वापरते ब्वा....:)

    ReplyDelete
  4. >>>> 'शॉशांक रीडिंप्शन' अजून बघायचाय :(

    निषेध ....

    ReplyDelete
  5. ऑल,
    माहितीये मी प्रचंड छान मूव्ही मिस करतोय...पण योग जुळत नाहीये

    ReplyDelete