Monday 19 September 2011

मुंबई कोलाज : दादर इस्ट

स्वामीनारायण मंदीर (इकडे आमचा शैलू आणि शिल्पा पहिल्यांदा भेटले)!
स्टेशन बाहेरच्या इराण्याकडची ट्रेकर लोकांची मैफल.
हिंदू कॉलानीतली गर्द झाडं, शांत गल्ल्या आणि लाकडी जिने.
मुंबई पुणे बस स्टॅन्ड वरचे  चलाख ट्रॅव्हल एजंट्स आणि शिवनेरी वेटिंग रूम मधले सकाळचे प्रसन्न अभंग. रुईयातली तरुणाई, मणी'ज कडची अनलिमिटेड चटणी आणि बालदीतल सांबार.
कैलाशकडची दाट गोड लस्सी.

सगळ्यात अलीकडच्या रुळावर थांबलेल्या सुस्त मेल्स.

४ नंबर प्लॅट्फॉर्मवर सकाळी ७ वाजता येणारी इंटरसिटी आणि सोमवार सकाळची हुरहूर,
१ नंबर प्लॅट्फॉर्मवर शुक्रवारी रात्री ९ वाजता येणारी तीच इंटरसिटी आणि वीकएंडचा जोश! 

कोहिनूर हॉलमध्ये अटेंड केलेली लाखो लग्न आणि विधींनी पकल्यावर गोड जेवणाआधी हळूच मारलेली बिअर. 
एन जी के क्लास मधला रगडून केलेला अभ्यास आणि १० वीचं दडपण! 
गावावरून आल्यावर बाबांनी टॅक्सीवाल्याशी केलेला लफडा आणि प्रवासात विस्कटलेल्या चुकार कुरळ्या केसांत खूप व्हल्नरेबल, गो ssssss ड दिसणारी आई!

असं खूप काही काही!

(उद्या अर्थातच दादर वेस्ट :))

3 comments:

  1. मस्त रे...इस्टातल प्रीतम पण माझ्या कोलाज मध्ये आहे...:) त्यांच्या ढाब्यामधल्या खाटेवर बसून कुठली तरी तंदुरी डिश हाणणाऱ्या आम्ही दोघी.....

    ReplyDelete
  2. लाखो लग्न?
    लाखाशिवाय काय बातच नाही !

    ReplyDelete