चिमण्या पावलांची चाहूल लागल्या पासून तो तिला जीवापाड जपत होता.
डोहाळेजेवण, वनभोजन सगळं अगदी साग्रसंगीत झालं होतं ...तिचे डोळे तृप्तीने जडावले होते.
थोडं हिमोग्लोबीन कमी होतं पण डॉक्टर म्हणाले ,'फारसं काळजीचं कारण नाही'....
आणि तो दिवस उजाडला!
आणि तो दिवस उजाडला!
त्याला ऑफिसमध्ये ती गोड बातमी कळली.
नऊ महिन्यांपूर्वी केलेल्या अर्जाचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले होते.
उद्या त्यांचं बाळ कर्जतच्या अनाथाश्रमातून घरी येणार होतं.
-नील आर्ते
तू छान गोष्टुल्या लिहतोस रे.. :)
ReplyDeleteमस्त!
ReplyDeleteफक्त अर्जाचे सोपस्कार पूर्ण व्हायला तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागतो आपल्याकडे :)
संकेत, गौरी ब्लॉगवर स्वागत.
ReplyDeleteगौरी, ९ महिने वेळ लागतो का? मग तर अजून मस्त!
अर्रे मस्तच!
ReplyDeleteनोप्प.. किमान दोन ते अडीच वर्षं :(
ReplyDeleteगोष्टूली गोडुली आहे .
ReplyDeleteThanks :) it's one of my very early ones!
Delete