पाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर १४ वर्षं ११ महिन्यांनी : १८ ऑक्टोबर २०२८
प्रजा-सेवक पार्टीची उद्घाटन प्रचार सभा
खासदार दादा शिर्के खुर्चीवरून उठले आणि त्यांनी मसिहाच्या थाटात हात वर केले… खाली (पेड) टाळ्यांचा प्रचंड कडकडाट!
दादा शिर्केंनी धत्तुरे द्यायला चालू केले:
…
…
"तुमा सर्वांच्या मासायेब आणि माजी प्रिय पत्नी १४ वर्षांपूर्वी बाळंतपनात हॉफ जाली आनि मला सोडून गेली,
तवापासून माजे कार्यकर्ते आनि मद्दार-संग हेच माजी फ्यामिली हायेत (टाळ्या).
माजं तन मन धन रयतेचं हाये आनि गरज पडल्यास मी जनतेसाठी जीव पण दिऊ शकतो (टाळ्या).
तवा आजपासून मी पर्चाराचा शुबारंब जाल्याचं झाईर करतो" (जोरदार टाळ्या).
लगेच स्टेजवर उजव्या विंगेतून एक छान नटलेली युवती आली… सावळा तरतरीत चेहेरा… टप्पोरे डोळे आणि हंसिनीसारखी लांबसडक मान…
पांढरेशुभ्र दात दाखवत ती हसली आणि दादा शिर्केची नजर तिच्यावर हलकेच रेंगाळली!
तिनं लखलखती तलवार दिली आणि मग तबकातून कुंकवाचा टिळा त्याच्या घामानी चिकचिकलेल्या कपाळावर लावला. टिळा कसला कुंकवानी जवळ-जवळ मळवटच भरला त्याचा (अर्थात दादाला ते कळलं नाही म्हणा…)
दादानी तिला नजरेत पुन्हा एकदा पिउन घेतलं आणि तो परत जन-समुदायाकडे वळला:
लालभडक मळवट भरलेलं कपाळ… जुळलेल्या भिवया… वटारलेले बटबटीत डोळे आणि हातात उगारलेली तलवार!
त्यानं खच्चून आरोळी दिली,
"परजा-सेवक पक्षाचा SSS इजय…"
तितक्यात दोन किलोमीटरवरून सूं सूं करत आलेली गोळी त्याच्या मळवटाचा मधोमध घुसली आणि त्याच्या डोक्याच्या चिंधड्या उडाल्या!
-------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
-नील आर्ते

No comments:
Post a Comment