Sunday, 24 August 2014

आख्तुंग ३ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

पाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर १४ वर्षं ११ महिने १५ दिवसांनी: ३ नोव्हेंबर २०२८
'चमत्कारी' बाबा फ़ुल्ल फॉर्ममध्ये होते!
बऱ्याच दिवसांनी नवीन शिष्या गळाला लागली होती.
कसली मादक होती ती आणि तितकीच हुशारसुद्धा शिवाय प्रचंड बोल्ड!

अघोरी पंथ, त्याची मुळं, मंत्र-तंत्र विद्या, जारण-मरण आणि कायकाय तासंतास चर्चा चालायची तिच्याबरोबर!
पण अजूनपर्यंत अंगाला हात लावू दिला नव्हता तिनं.
बाबा त्यानं अजुनच कासावीस झाले होते.

पण आज चक्क लॉटरी लागली होती! नवीन शिष्या त्यांना तांत्रिक सेक्स शिकवणार होती:
सुखाचा डोंगर चढायचा अगदी हळू-हळू… लहान सहान गोष्टी पूर्ण करत… आणि मग गाठायचं उत्कट शिखर आणि तरंगत रहायचं तिथेच तीन तास, चार तास, तासंतास!



कर्जतला एका भक्ताच्या निवांत रिसॉर्टवर दोघे आले होते पहिल्या-वहिल्या सेशनला.

बाबांचाच पांढरा सैल कुर्ता तिनं घातला होता आणि त्यातून दिसणारी खट्याळ वळणं!
बाबांची तर लाळच गळायला लागली होती पण शिष्येनी त्याला चलाखपणे आवरून धरलं होतं.

तिनं झटपट तयारी केली… उदबत्त्या पेटवल्या… जीव वेडावणारा वास होता त्यांचा हिरव्या चाफ्याचा.
लांबसडक केसांचा बुचडा बांधला हंसिनीसारख्या मानेवर… मुद्दामून आळोखे पिळोखे देत!
दोन ग्लास मध्ये वाईन ओतली.
एकात व्हाईट वाइन: "शार्दोने" आणि दुसर्यात रेड वाईन: "कियांती".
बाबाच्या जिभेवर अलगद एक्स्टसीची टॅब्लेट ठेवली.
मग एक आपल्या जिभेवर!

"झालं आता शेवटचे फक्त दोन विधी:
आपण दोघांनी एकमेकांना एक खट्याळ प्रश्न विचारायचा. आधी तुम्ही मग मी:
त्याची न लाजता खर्रीखर्री उत्तरं द्यायची.
हे आपल्यातलं खट्याळ 'वूल्बा' तत्व जागृत करायला.
मग या फ्रेंच विंडोबाहेर पसरलेल्या अफाट निसर्गाला वाइनचे ग्लास उंचावून अभिवादन करायचं.
आधी तुम्ही मग मी:
तुम्ही नर, तुमची रेड वाइन आणि मी मादी, माझी व्हाईट वाइन!

आणि मग बेडवर!!!"

पहिली तुमची पाळी विचारा प्रश्न:"

बाबाच्या डोळ्यात वासना तरळली,
"कुर्त्याच्या आत काय घातलंयस?"

"काहीच नाही!"

बाबा उकळायला लागला होता!

"आता माझी पाळी"

"आतापर्यंत बऱ्याच बायकांना गर्भदान दिलंय तुम्ही… हो ना?"

बाबा माजोर्डं हसला,

"होय! समाजसेवा गं ती!"

"दादा शिर्केंच्या बायकोला सुद्धा दिलीत ना तुम्ही 'समाजसेवा'? "

एक्स्टसीच्या धुक्यावर बाबाच्या चलाखीनं मत केली!

"हा 'दुसरा' प्रश्न झाला बेटा"

ती पांढरे शुभ्र दात दाखवत खट्याळ हसली.

"ठीक आहे पश्चिमेच्या खिडकीतून वाइन दाखवा निसर्गाला"

बाबा खिडकीत गेला आणि त्यानं ग्लास उंचावला…  
मावळत्या सुर्याची किरणं गॉब्लेट ग्लास मधून आरपार गेली… 
ग्लासात माणकं वितळत होती लालचुटूक लखलखती!
दोन किलोमीटरवरच्या आंब्याच्या झाडावरून सूं सूं करत आलेली गोळी ग्लासात घुसली… 
आणि ग्लासाबरोबर बाबाचा चेहरा एकदमच फुटला! 


-------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
-नील आर्ते 

No comments:

Post a Comment