एका आठवड्याने:
मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला, सगळे पेपर्स घेतले...
केतकी आणि बाळाला घेऊन खाली उतरलो...
केतकी अजूनही घुश्श्यातच होती...
मागच्या आठवड्याचा राग अजून गेला नव्हता.
आम्ही गेटवर जाऊन रिक्षा शोधणार...
तितक्यात एक सोनसळी आणि काळ्या रंगाची मिनी कूपर सुळ्ळकन येऊन आमच्या समोर थांबली...
तिला सुंदर गिफ्ट बो बांधला होता.
आतून पटकन एक चटपटीत पोरगा उतरला आणि त्यानं गाडीची डिजिटल चावी आणि एक छानसा लिफाफा माझ्या हातात दिला.
केतकीचे डोळे बशीएवढे मोठे झाले होते.
मला काही कळेना...
मी लिफाफा उघडला,
आतमध्ये लिहिलं होतं:
"थँक्स फॉर एव्हरीथिंग"
आणि खाली अल्फाजची लफ्फेदार सही होती.
झप्पकन बाजूनी एक टॅक्सी गेली आणि ड्रायव्हरनी मला हात दाखवल्याचा भास झाला.
---------------------------------------- समाप्त ----------------------------------------
तळटीपा:
*रासबेरी पाय*
हा छोटासा साधारण क्रेडिट कार्डाएवढा कम्प्युटर प्रोसेसर असतो.
अधिक माहिती:
https://www.raspberrypi.org/help/what-%20is-a-raspberry-pi/
*बिटकॉइन मायनिंग*
बिटकॉईन्स हे इलेक्ट्रॉनिक चलन (Cryptocurrency) आहे.
१ बिटकॉइन = साधारण सव्वासात लाख रुपये (आजचा रेट)
बिटकॉइन मायनिंग ही बिटकॉईन्स मिळवण्याची पद्धत आहे.
त्यासाठी जास्तीत जास्त प्रोसेसर स्पीड असलेले कम्प्युटर्स आवश्यक असतात.
अधिक माहिती:
https://en.wikipedia.org/wiki/Bitcoin
https://www.youtube.com/watch?v=GmOzih6I1zs

No comments:
Post a Comment