"हो पण रिलॅक्स!
तुझा प्रोब फारसा इनव्हॅजिव्ह नव्हता.
तुझ्या हेडरेस्टमधून एक सूक्ष्म नळी गेली तुझ्या डोक्यात फक्त १० मिनटं...
तुला जाणवलंसुद्धा नाही फारसं."
"का पण", मी कळवळून ओरडलो,
"कारण पुढे बसणारा माणूस जर स्वतः ड्रायव्हिंग करणारा असेल तर त्याचं मनातल्या मनात ड्रायव्हिंग चालू असतं.
त्याचा समोरचा व्ह्यू जवळजवळ ड्रायव्हरसारखाच असतो.
तो मनातल्या मनात ब्रेक मारतो, टर्न मारतो आणि समोरची गाडी जास्त जवळ आली की घाबरतो सुद्धा
आणि हा पॅसेंजरचा पॅसिव्ह ड्रायव्हिंग करणारा मेंदू आणि ड्रायव्हरचा ऍक्टिव्ह ड्रायव्हिंग करणारा मेंदू...
यातला डेल्टा आम्हाला डेस्परेटली हवा होता.
तो आज मिळाला फायनली तुझ्यामुळे."
मी पुढे जाऊन रागाने अल्फाजची कॉलर धरली पण आधीच त्यानं मान टाकली होती आणि तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबडत होता,
"डेटा -- अपलोड -- टायर -- हवा -- उंची -- झाड" असं काहीतरी.
त्याच्या मानेजवळ लाल नंबर्स आता २८ मिनिटांचा काउंट डाऊन दाखवत होते.
मला विलक्षण चीड आली या सगळ्यांची, पावसाची, केतकीच्या न लागणाऱ्या फोनची, पडलेल्या झाडाची सगळ्याचीच...
मी बाइकवाल्याला बोललॊ,
"चलो मेरेको छोडो आगेतक"
तो बावरल्यासारखा झाला,
"लेकिन ये भाईजान का हालत भौत खराब है!"
"तो बैठ उसको पकडके, मै जा रहा हू!", मी वैतागून बोललो आणि झाडाखालून वाकून जायला लागलो...
तेव्हढयात मला काहीतरी क्लिक झालं,
अल्फाज अजूनही बरळत होता, "टायर -- झाड..."
मला रहावेना.
मी परत आलो...
बाइकवाल्याला पोलिसांसाठी थांबायला सांगितलं.
अल्फाजचा पडलेला फोन उचलला, मिष्टीनं लोकेशन पाठवलं होतं.
अल्फाजला पॅसेंजर सीटवर बसवून प्रोसेसरच्या उरलेल्या दोन वायर्स जोडल्या लगेच डेटाचं सिंक चालू झालं.
मग मी माझ्या खिशातलं पेन काढलं आणि टॅक्सीच्या चारही टायर्समधली हवा कमी केली...
पूर्ण नव्हे इंचभराने...
मग मी ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालू केली, गियर टाकला...
आणि गाडी झाडाखालून अलगद बाहेर काढली. (फक्त रेडिओ अँटेना तुटला.)
क्रमश:

No comments:
Post a Comment