स्वस्त रुचकर जेवण, पाट्या आणि ऍटिट्यूडसाठी (इन दॅट ऑर्डर) साठी प्रसिद्ध असलेल्या सदाशिव पेठेतल्या "बादशाहीची" एक ब्रँच बाणेर मध्ये आलीय हे मस्तच.
त्यानिमित्तानं...
मला बरेच दिवसांपासून हे बोलायचं होतंच.
फॉर द लास्ट फकिंग टाइम पीपल,
आमचं (हो आमचंच) पुणे कधीच बदललंय...
खालील काही ठळक मिथ्स प्रचन्ड क्लिशेड आणि इनव्हॅलिड होऊन जमाना झालाय रे बाबांनो!
१. आमची कुठेही शाखा नाही:
वाचा बादशाहीबद्दलची पहिली ओळ.
एकुणातच पुण्यातली नामांकित दुकानं आणि हॉटेलं 'लेफ्ट-राईट-सेंटर' शाखा काढतायत.
चितळ्यांच्या तर पुण्यातल्या प्रत्येक मेजर एरियात शाखा आहेत.
आणि हो माझ्या मुंबईकर मित्रांनो, त्या प्रत्येक शाखेत तितक्याच ताज्या बाकरवड्या मिळतात यार...
सो बाणेरवरून लक्ष्मी रोडला मरवत जायची गरज खरंच नाहीये, ट्रस्ट मी!
२. एक ते चार:
मी जे जे बाणेर / विमाननगर / वानवडी सारखे कॉस्मो एरियाज बघितलेयत तिकडे प्रॉपर सगळी दुकानं रणरणत्या दुपारी चालू असतात आणि आत्ता बहुतेक चितळे सुद्धा ...
आणि झोपले चितळे तर झोपू देत थोडे दुपारी... सकाळी लवकर उठतात ते कळलं!
आमचा परममित्र मुंबईचा 'पार्ले बिस्कीट' मधला इंजिनिअर अवीसुद्धा दुपारी हळूच पार्किंगमध्ये जाऊन गाडीत डुलकी काढतो.
सो बिग डील!
३. रात्री दहा वाजता सामसूम:
अजिबात नाही किमान अकरापर्यंत सगळं चालू असतं.
आणि मुंबईत सुद्धा अकरावाजता झाकपाक चालू होतेच प्लीज.
रात्री दोन वाजताही जेवण मिळू शकणारे अड्डे पुण्यातही आहेतच फक्त तुम्हाला माहिती पाहिजे.
(उदा: वानवडीचं 'जशन', टिळक रोडवरचं 'जयश्री', चांदणी चौकातलं सी सी डी वगैरे)
४. लोक पत्ता नीट सांगत नाहीत, चुकवतात:
यात खरंच काही दम नाहीये आणि तसंही गूगल मॅप्समुळे हे रिडंडंट झालंय आधीच.
५. रिक्षा मिळता मिळत नाहीत:
त्या मुंबईत बांद्रा वेस्टला किंवा बी. के. सी. ला ही नाही मिळत.
शिवाय उबरमुळे सगळीकडे ऑप्शन आलेयतच.
६. पुण्यात करण्यासारखं फारसं नाहीय तुम्ही मुंबईचे लोकं बोर व्हाल:
हे सगळ्यात इरीटेटींग आणि खोटं आहे.
ते पुण्यातलं सुदर्शन, नी नाटकं नी गाणी नी कविता वगैरे तर गिव्हनच.
पण तुम्ही पुण्यातला साल्सा -बचाता सोशल डान्सिंग सीन बघितलाय का कधी?
लॅटिनो डान्सेसचा प्रचंड उत्साही सीन आहे पुण्यात.
किंवा बुधवारी लेडीज नाईटला तयार होऊन कायनेटिक वरून भुर्र्र जाणाऱ्या मादक यक्षिणी?
थोडक्यात इकडेही लेट नाईट जेवणाचाच रुल लागू:
सगळी धमाल चालू असते फक्त तुम्हाला थो SSS डीशी माहिती पाहिजे.
अर्थात ही सगळी जुनीपानी मिथ्स अजूनही चढवून सांगणारे लोकल महाभाग आहेतच.
पण ते म्हणजे...
एक रॉकस्टार ५० मिलिग्रॅम हेरॉईन करायचा आणि फक्त इमेजसाठी पत्रकारांना ३०० मिलिग्रॅम सांगायचा.
तसंच ते.
तर आहे हे असं आहे:
आणि हो एक अट्टल मुंबईकर पुण्याच्या इतक्या प्रेमात पडतो याला लव-जिहाद म्हणा, गद्दारी म्हणा किंवा काय हवंय ते म्हणा.
पण दोन किंवा अधिक शहरांवर तितकंच जीव तोडून प्रेम करता यावं बहुतेक...
खरं तर दोन किंवा अधिक माणसांवरसुद्धा.
ते काय ते 'पॉलीअमोरी' वगैरे!
-एक (कन्व्हर्टेड (आणि म्हणूनच जास्त कट्टर)) पुणेकर

खरं पुण्याबद्दल असं सगळं वाचून वाटतं की या वीस वर्षे जुन्या बातम्या अजून सरसकट असल्यारखं कोण पसरवतं...
ReplyDeleteअगदी अगदी!
Delete